गृह मंत्रालय
एकल मॉल आणि बहुविध ब्रान्ड मॉल वगळता विशिष्ट श्रेणीतली दुकाने सुरु करण्यासाठी परवानगी देण्यासंबंधात केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना आदेश जारी
लॉक डाऊनच्या नियमातली ही शिथिलता हॉट स्पॉट आणि प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू नाही
प्रविष्टि तिथि:
25 APR 2020 12:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2020
केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना आदेश जारी करून त्यांच्या दुकाने आणि प्रतिष्ठाने कायद्या अंतर्गत नोंदणीकृत सर्व दुकाने खुली ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. निवासी संकुलातली दुकाने, नजीकची आणि एकल दुकाने यांचा यात समावेश आहे. लॉक डाऊनच्या नियमातली ही शिथिलता हॉट स्पॉट आणि प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू नाही याची दखल घेणे महत्वाचे आहे.
https://www.mha.gov.in/sites/default/files/MHA%20order%20dt%2015.04.2020%2C%20with%20Revised%20Consolidated%20Guidelines_compressed%20%283%29.pdf
ही परवानगी महानगर पालिका आणि नगर पालिका हद्द सोडून, बाजारपेठ संकुलातली दुकाने खुली ठेवण्यासाठी आहे. एकलमॉल आणि बहुविध ब्रान्ड मॉल मधली दुकाने कोठेही उघडण्याची परवानगी नाही.
परवानगी देण्यात आलेल्या सर्व दुकानांनी केवळ 50 टक्के कर्मचाऱ्यांसह दुकाने खुली ठेवायची आहेत तसेच मास्क वापरणे अनिवार्य असून सोशल डीस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे.
शासकीय माहितीसाठी इथे क्लिक करा-
G.Chippalkatti/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1618080)
आगंतुक पटल : 394
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam