PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


लॉकडाऊन चा निर्णय वेळेत घेतल्यामुळे रुग्णसंख्येच्या आलेखावरची वक्ररेषा सरळ होऊ लागली. अज्ञात रुग्ण असल्याबाबत भीती बाळगण्याचे कारण नाही - अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 1

अहमदाबाद, सुरत, हैदराबाद आणि चेन्नई साठी चार आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथके गृहमंत्रालयाकडून स्थापन, मुंबई पथकाकडे ठाण्याची जबाबदारी

Posted On: 24 APR 2020 7:20PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, April 24, 2020

Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from field offices, and Fact checks undertaken by PIB)

 

राष्ट्रीय पंचायती राज्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील सरपंचांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इ-ग्रामस्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲपचा तसेच स्वामित्व योजनेचा प्रारंभ केला. "कोरोना साथरोगामुळे लोकांची कार्यपद्धती बदलली आहे आणि एक चांगला धडाही शिकायला मिळाला आहे. सदैव स्वयंसिद्ध असण्याची शिकवण या आजाराने दिली आहे" असे पंतप्रधानांनी देशभरच्या सरपंचांशी बोलताना सांगितले.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

राष्ट्रीय आजार नियंत्रण कक्षाचे संचालक, एस के सिंग, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी कोविड-19  घडामोडींवरील माहिती दिली. 

संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भाव आणि इतर गोष्टींविषयी माहिती मिळवण्यासाठी निरीक्षण यंत्रणेचा वापर करुन त्यानुसार, आवश्यक उपाययोजना कशा केल्या जात आहेत, हे स्पष्ट करणारे सादरीकरण राष्ट्रीय आजार नियंत्रण कक्षाचे संचालक, एस के सिंग यांनी केले.

  • एखाद्या कंपनीचा कर्मचारी कोविड19 चा पॉझिटिव्ह आढळल्यास, कंपनीच्या सीईओच्या कायदेशीर जबाबदारीविषयी नियमांच्या चुकीच्या अर्थामुळे  अवाजवी भीतीबाबत गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे– गृह मंत्रालय
  • कोविड 19 च्या मुकाबल्यासाठी आधी स्थापन केलेल्या 6 आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकांव्यतिरिक्त  अहमदाबाद, सुरत, हैदराबाद आणि चेन्नई येथे आणखी चार पथके गृहमंत्रालयाकडून स्थापन, प्रत्येक पथकाचे नेतृत्व अतिरिक्त सचिव-स्तरीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. याअगोदर मुंबई पुण्यासाठी स्थापन केलेल्या पथकाचे कार्यक्षेत्र वाढवून त्याच्याकडे ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
  • इंदोरच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार: इंदूरमध्ये 171 नियंत्रित क्षेत्र असून त्यापैकी 20 क्रिटिकल आहेत. पुरेशा प्रमाणात किट्स, PPEs, मास्क्स आणि इतर संरक्षक उपकरणे उपलब्ध आहेत. लॉकडाऊन उपाययोजनांचा योग्य प्रकारे अवलंब होत आहे
  • इंदोरच्या पथकाने दिव्यांग व्यक्ती, विलगीकरण कक्ष, रेशनची दुकाने, स्थलांतरित कामगार या सर्वांची तपासणी केली व सर्व हितसंबंधी गटांशी चर्चाही केली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना बाजारात न जाताच हमीभावाने धान्य विकण्याची सुविधा दिली असून बाजारात होणारी गर्दी टाळली आहे- गृहमंत्रालय
  • मुंबईत धारावी येथे सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवण्यासाठी पोर्टेबल शौचालये बसवण्याची सूचना आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाने केली आहे. मुंबईत आलेल्या आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाने 2000 ते3000 लोकांची सोय करण्यासाठी संस्थात्मक विलगीकरणाची सूचना केली आहे, त्याशिवाय चाचण्यांची क्षमता वाढवणे आणि स्वयंसेवकांच्या मदतीने निरीक्षणाची व्याप्ती वाढवण्याची सूचना केली आहे. कोविड-19 ग्रस्त नसलेल्या रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाने चर्चा केली.
  • आतापर्यंत देशात कोविड-19 च्या एकूण रुग्णांची संख्या 23,077 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत- 1684 नवे रुग्ण तर 491 जण बरे झाले आहेत. वैद्यकीय देखरेखीखाली असलेल्या लोकांची संख्या- 17,610 बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,748 इतकी असून बरे होण्याचा दर 20.57% - आरोग्य मंत्रालय
  • गेल्या 28 दिवसात देशातील 15 जिल्ह्यात एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही (3 नव्या जिल्ह्याची भर पडली आहे.) 23 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातील 80 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकाही नव्या रुग्णाची नोदं झालेली नाही.
  • आपल्याला हे बघायचे आहे की एकही रुग्ण नसलेल्या या जिल्ह्यात नवे रुग्ण येणार नाहीत आणि या यादीत आणखी नव्या जिल्ह्यांची भर पडेल.
  • कोविड-19 च्या व्यवस्थापनाबाबत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सर्व राज्यांचे आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि आरोग्य सचिवांशी संवाद साधला - सह सचिव, आरोग्य मंत्रालय
  • ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर वेगवान आहे किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये मृत्यूदर जास्त आहे त्या जिल्ह्यांवर भर देण्याची आरोग्य मंत्र्यांनी राज्यांना सूचना केली आहे.
  • कोविड-19 शी संबंधित अवाजवी भयगंड जनतेमध्ये पसरणार नाही, याची काळजी घेण्याचे आरोग्य मंत्र्यांचे सर्व राज्यांना निर्देश; आरोग्य विषयक मानसिकतेसाठी समाजात जागृती करावी जेणेकरुन लोक त्वरित तपासणीसाठी पुढे येतील.
  • आरोग्य मंत्र्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली आणि भारताने या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.समुदायाशी संवाद आणि प्रतिबंधात्मक प्रयत्न या दोन तत्वांवर भारताचे प्रयत्न सुरू असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
  • रेड क्रॉस सोसायटीने कोविड-19 च्या आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तींशी संपर्क साधून ते रक्तदानास तयार असतील तर त्यांच्या रक्तातून कॉन्व्हल्सट प्लाज्मा काढण्याचा प्रयत्न करावा, ज्याचा उपयोग कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी करता येईल-  आरोग्य मंत्र्यांची विनंती
  • पंतप्रधानांनी आज देशभरातील सरपंचांशी संवाद साधला, या आपत्तीच्या काळात आपल्याला खरी शिकवण मिळाली आहे आणि सध्याच्या काळात  मिळालेली सर्वात मोठी शिकवण आहे स्वयंपूर्ण बनणे, असे त्यांनी सांगितले.
  • संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भाव आणि इतर गोष्टींविषयी माहिती मिळवण्यासाठी निरीक्षण यंत्रणेचा वापर करुन त्यानुसार, आवश्यक उपाययोजना कशा केल्या जात आहेत, हे स्पष्ट करणारे सादरीकरण राष्ट्रीय आजार नियंत्रण कक्षाचे संचालक, एस के सिंग यांनी केले.
  • ही निरीक्षण यंत्रणा जिल्हा पातळीवर देखील तयार करण्यात आली असून,  त्यांद्वारे, घरोघरी सर्वेक्षण, क्लस्टर कंटेंनमेंट योजनेनुसार विलगीकरण आणि अलगीकरण केले जात आहे- संचालक  NCDC
  • सध्या सुमारे 9.45 लाख लोक देखरेखीखाली आहेत, लक्षणे आढळल्यावर या लोकांचे तातडीने नमुने गोळा करण्यात येतात- संचालक, NCDC
  • भारतात पहिला  कोविड-19 रुग्ण सापडण्यापूर्वीच आम्ही आमच्या देखरेख यंत्रणेची सुरुवात केली होती, या यंत्रणेने हा संसर्ग रोखण्यासाठी आम्हाला साहाय्य करण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली – संचालक, NCDC
  • लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग वाढला कारण ज्यांना संसर्ग झाला होता, अशा लोकांना शोधले जात होते, नंतर, तो सुधारला कारण लॉकडाऊन मुळे संक्रमण आटोक्यात येऊ शकले- संचालक, NCDC
  • गेल्या एक महिन्यात देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात कोविड-19 ला भारताने कशा प्रकारे प्रभावी पद्धतीने तोंड दिले त्याबाबत अधिकारप्राप्त  गट-1 च्या अध्यक्षांनी सादरीकरण केले.
  • 21 मार्च ला आपला रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी~ 3 दिवस इतका होता. प्रवास आणि वाहतुकीवर आगोदर लावलेल्या निर्बंधांचे परिणाम  आपल्याला 23 मार्चला दिसू लागले. लॉकडाऊनमुळे 6 एप्रिलपर्यंत दुपटीचा कालावधीचा दर आणखी कमी झाला-अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 1
  • भारतातील रुग्णसंख्येच्या वाढीच्या कक्षेत बदल होऊ लागला असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला देशव्यापी लॉकडाऊनचा मोठा निर्णय अतिशय योग्य वेळी घेतलेला आणि फायदेशीर निर्णय असल्याचे सिद्ध झाले आहे.
  • राष्ट्रव्यापी लॉकडाऊन मुळे आपल्याला कोविड-19 च्या संसर्गाच्या मोठ्या वाढीचा आलेख कमी करता आला. म्हणजेच आपल्याला रुग्णसंख्या आटोक्यात आणता आली-अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 1
  • लॉकडाऊन चा निर्णय वेळेत घेतल्यामुळे रुग्णसंख्येच्या आलेखावरची वक्ररेषा सरळ होऊ लागली. लॉकडाऊन प्रभावी ठरत असल्याचे देशाने सिद्ध केले आहे, जीव वाचवणे,  संक्रमण साखळी तोडणे व रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात आपल्याला यश येत आहे. या लाभांचा आपण उपयोग करुन घ्यायला हवा. –अध्यक्ष
  • कोविड-19 चा प्रतिबंध करण्यामध्ये देखरेख हे सर्वात मोठे सामर्थ्य ठरले आहे. फैलावाला प्रतिबंध, चाचण्यांच्या संख्येत वाढ, सज्जतेमध्ये सुधारणा याबरोबरच एका लोकचळवळीच्या माध्यमातून देशाने वर्तनामध्ये एक मोठा बदल घडवून आणला आहे.
  • जर आपण देशव्यापी लॉकडाऊन चा निर्णय घेतला नसता, तर आतापर्यंत देशात कोविड-19 चे 1 लाख रुग्ण असते, असा अंदाज आहे- अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट-1
  • चाचण्यांबाबतचे आमचे धोरण काळाच्या कसोटीवर खरे ठरले आहे. चाचण्यांची संख्या पुरेशी आहे. चाचण्यांची संख्या वाढवूनही पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढले नाही. त्यामुळे अज्ञात रुग्ण असल्याबाबत भीती बाळगण्याचे कारण नाही, आजार नियंत्रणात आहे- अध्यक्ष, गट 1

 

वरील पत्रकार परिषदेचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

  इतर अपडेट्स :

महाराष्ट्र अपडेट्स

काल एका दिवसातल्या सर्वात जास्त केसेसची संख्या नोंद झाल्यानंतर महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने नमूद केले की सातत्यपूर्ण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचणी आणि संसर्गाचा धोका असलेल्या लोकांचे विलगीकरण यामुळे केसेसची संख्या जास्त दिसत आहे. 23 एप्रिल पर्यंत महाराष्ट्राने 96,369 चाचण्या केल्या ज्यातल्या 55,000 म्हणजेच 57.07% चाचण्या केवळ मुंबईत केल्या गेल्या. हे देशातल्या कुठल्याही शहरापेक्षा जास्त आहे

***

DJM/RT/MC/SP/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1617918)