PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


78 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. गेल्या 28 दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण न आढळलेले जिल्हे 12: आरोग्य मंत्रालय

लॉकडाऊनच्या काळात कोविड हॉस्पिटल्सच्या संख्येत 3.5 पट वाढ करण्यात आली तर अलगीकरण खाटांच्या संख्येत 3.6 पट वाढ

Posted On: 23 APR 2020 7:04PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 23 एप्रिल 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांच्याशी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि दोन्ही देशांनी आरोग्यविषयक आणि आर्थिक परिणामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

कोविड-19 च्या बऱ्याच रुग्णांचे प्राण निव्वळ ऑक्सिजनचा पुरवठा करून वाचवता येऊ शकतात; जर त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही तर त्यामुळे इतर अनेक  समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळेच ऑक्सिजनच्या पुरवठ्यात वाढ करण्याचे आमचे धोरण आहे  असे एम्स चे प्रवक्ते म्हणाले. ते कोविड-19 संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अधिकारप्राप्त गट 2 चे अध्यक्ष सी के मिश्रा, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव एम्स संचालक रणदीप गुलेरिया यांनी यावेळी माहिती दिली. 

यावेळी कोविड-19 शी लढण्यासाठी गेल्या महिन्याभरात केलेल्या उपाययोजनांची समीक्षा करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे:

  • ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी मदतनीस, प्रीपेड मोबाईल रिचार्ज आणि शहरी भागातील अन्नप्रक्रिया उद्योग या सर्वांना लॉकडाऊन मधून सूट देण्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना कळवले आहेगृह मंत्रालय
  • त्याशिवाय, काही अतिरिक्त कृषी आणि वन कामे, शैक्षणिक साहित्याची दुकाने आणि इलेक्ट्रिक फॅनची दुकाने यांनाही लॉकडाऊन मधून सूट देण्यात आली आहे.
  • भारतीय खलाशी कुठे अडकले असल्यास आणि/ किंवा ते आपल्या कामावर येऊ शकत नसल्यासइतर देशातील खलाशी भारतीय खलाशांच्या जागी कामावर येऊ शकतात. गृहमंत्रालयाने अशा भारतीय खलाशांसाठी भारतीय बंदरे आणि त्यांच्यावरील वाहतुकीसाठी नियमावली(SOP) जारी केली आहे.
  • एप्रिल 2020 मध्ये 22 एप्रिल 2020 पर्यंत 1.5 कोटी श्रम दिवसापेक्षा जास्त रोजगाराची नोंद झाली आहे. जे भाग हॉट स्पॉट्स नाहीत आणि जे भाग नियंत्रित भाग नाहीत त्या भागात  राज्यांकडून गृहमंत्रालयाच्या निर्देशांनुसार व्यावसायिक कामकाज सुरू करण्यात येत आहे.
  • गृह सचिव आणि वाणिज्य सचिव यांनी उद्योग प्रमुखांशी आणि हितधारकांशी   व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून चर्चा केलीज्यात काही आर्थिक कामांना गती देणे आणि काही औद्योगिक कारवायांना परवानगी देणे यावर चर्चा झाली.
  • गृहमंत्री अमित शाह यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या काही डॉक्टर्स आणि वरिष्ठ प्रतिनिधींशी चर्चा केली, कोविड19 च्या या लढ्यात त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
  • वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबतची जबाबदारी चोखपणे पार पाडली जावी, असे निर्देश गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्थानिक शाखांसोबत काम करुन, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या  सूचना दिल्या आहेत.
  • कोविड-19 रुग्णांची एकूण संख्या -21,393. वैद्यकीय देखरेखीखाली असलेल्या कोविड-19 रुग्णांची संख्या- 16,454. गेल्या 24 तासात- 1,409 नवीन रुग्ण, 388 रुग्ण बरे झाले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या - 4,257, रुग्ण बरे होण्याचा एकूण दर - 19.89%
  • आता देशात गेल्या 28 दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण न आढळलेले 12 जिल्हे आहेत,( या यादीत 8 नव्या जिल्ह्यांची भर पडली आहे) तर 78 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. (या यादीत, 9 राज्यातील 33 नव्या जिल्ह्यांची भर पडली आहे)
  • संसर्गजन्य आजार नियंत्रण कायदा 1897 मध्ये दुरुस्ती करणाऱ्या अध्यादेशावर काल राष्ट्रपती महोदयांनी स्वाक्षरी केली. यामुळे, आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले आणि त्यांच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्या सर्व गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली जाऊ शकेल.
  • रुग्णालयांची उपलब्धता, अलगीकरण आणि विलगीकरण सुविधा, रोगावर देखरेख आणि चाचण्या आणि क्रिटिकल केअर प्रशिक्षण यामध्ये  समन्वय राखणाऱ्या अधिकारप्राप्त गट 2 चे अध्यक्ष सी के मिश्रा यांनी कोविड-19  प्रतिबंधाबाबत भारताचे धोरण आणि सज्जता याबाबत सादरीकरण केले.
  • गेल्या 30 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात, आपण खालील गोष्टी साध्य करु शकलो: 1) संक्रमण साखळी तोडणे, कमीतकमी प्रसार आणि कोविड-19 चे रुग्ण दुप्पट होण्याच्या काळात वाढ. 2) चाचण्यांमध्ये सातत्याने वाढ करणे 3) आपला वेळ भविष्यातील तयारीसाठी वापरणे. -अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 2
  • आपण या 30 दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये या लढ्यातील एक महत्वाचे शस्त्र वापरले ते म्हणजे RT-PCR चाचण्या 23 मार्च रोजी आपण 14, 915 चाचण्या केल्या. 22 एप्रिल पर्यंत आपण 5 लाखांपेक्षा अधिक चाचण्या केल्या म्हणजेच, 30 दिवसात चाचण्यांमध्ये 33 पट वाढ केली अध्यक्ष- अधिकारप्राप्त गट 2
  • लॉकडाऊननंतर कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येत 16 पट वाढ झाली आहे तर चाचण्यांच्या प्रमाणात 24 पट वाढ झाली आहे - अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 2
  • कोविड19 च्या रुणांच्या संख्येत होणारी वाढ/ घट ही स्थिर आहे, त्यात खूप मोठी वाढ होतांना दिसत नाही; याचा अर्थ, आपण जी धोरणे राबवत आहोत, ती  संसर्ग एका ठराविक पातळीपर्यंत नियंत्रित ठेवण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत. - अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट—2
  • चाचण्यांमध्ये 24 पट वाढ झाल्यानंतरही पॉझिटिव्ह रुग्णांच्या टक्केवारीत वाढ झालेली नाही. पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी आणि चाचण्या यांचे गुणोत्तर एक महिन्यापूर्वी  होते तितकेच आहे- अध्यक्ष
  • भारताने अनेक विकसित देशांपेक्षा चांगली पावले उचलली असून, रुग्णांच्या चाचण्या पॉझिटीव्ह येण्याबाबत आपली कामगिरी चांगली आहे. आता सध्याच्या परिस्थितीनुसार आपल्याला आपले पुढचे धोरण ठरवायचे आहे- अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट
  • आपल्या चाचण्यांबाबतचे धोरण लक्ष्य-निर्धारित, केंद्रित असल्याचे आणि त्याचा विस्तार होत असल्याचे वस्तुस्थितीमधून दिसत आहे. ज्या प्रकारे आपल्यासमोरच्या आव्हानांमध्ये वाढ होते त्यानुसार धोरणातही बदल होत आहेत.
  • आपण आपल्या चाचण्यांची व्याप्ती वाढवली आहे, आवश्यक ती सर्व संसाधने- सरकारी आणि खाजगी दोन्ही, एकत्र केली आहेतआणि संसाधनांचा प्रभावीपणे वापर व्हावा, यासाठी आपल्या कामांचे विकेंद्रीकरण केले आहे- अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 2 
  • लॉकडाऊनचा काळ आपल्या रुग्णालयांमधील पायाभूत साधने आणि त्यांची सज्जता यांचा आढावा घेणे, मूल्यमापन करणे आणि त्रुटी भरुन काढत आरोग्य सुविधा व्यापक करणे यासाठी उपयोगात आणला गेला. आपल्या उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर करणे आणि गरजेपेक्षा अधिक सज्जता,असा आमचा प्रयत्न होता. –अध्यक्ष
  • शारीरिक अंतर, शिस्तपालन आणि आजाराची जास्त झळ बसू शकणारे ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजारग्रस्त यांची काळजी यांच्यासारख्या उपाययोजनांच्या मदतीने कमीत कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ यावी असे आमचे रुग्णालयात दाखल करण्याबाबतचे पहिले लक्ष्य आहे.
  • आपल्याकडे पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध ठेवणे हे दुसरे लक्ष्य होते, जेणेकरुन प्रत्येक व्यक्ती, जिला रुग्णालयात येण्याची गरज आहे, त्यांच्यावर योग्य उपचार करुन त्यांना घरी पाठवता यायला हवे. देशातील प्रत्येक जिल्हा आज त्या दिशेने काम करतो आहे.- अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 2
  • कोविड-19 च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या त्रिस्तरीय रचनेची, अधिकारप्राप्त गट-2 च्या अध्यक्षांनी माहिती दिली.
  • रुग्णाच्या स्थितीनुसार, सर्वाधिक गरज असते ती ऑक्सिजनची, त्यामुळे आमचा सर्व भर ज्या रुग्णांना गरज आहे,त्यांना ऑक्सिजन मिळेल अशी सज्जता रुग्णालयात करण्यावर आहे. अधिकाधिक लोक कोविड हेल्थ सेंटरमध्येच पूर्ण बरे व्हावे असे आमचे उद्दिष्ट आहे-- अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट-2
  • गेल्या एक महिन्याच्या लॉकडाऊनच्या काळात कोविड हॉस्पिटल्सच्या संख्येत 3.5 पट वाढ करण्यात आली आहे आणि अलगीकरण खाटांच्या संख्येत 3.6 पट वाढ झाली आहे
  • आम्हाला अशी रचना करायची आहे ज्यात आम्ही अधिकाधिक लोकांच्या चाचण्या करु शकू, त्यांच्या वैद्यकीय गरजेनुसार उपचार करुन त्यांना बरे करु तसेच जास्तीतजास्त लोकांचा जीव वाचवू. अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 2 
  • अधिक प्रयोगशाळा, अधिक चाचण्या, अधिक संसाधने हा आमचा मूलभूत विचार आहे. लॉकडाऊन च्या सुरुवातीला असलेल्या ~ 100 प्रयोगशाळा आता 325 पर्यंत वाढल्या आहेत. आमचे धोरण विषाणू शोधणे आणि रुग्णांचा जीव वाचवणे हे आहे. - बलराम भार्गव, महासंचालक, ICMR
  • संपूर्ण वैज्ञानिक आणि  वैद्यकीय समुदायाने या काळात आपल्या प्रयत्नांनी एक वेगळी उंची गाठली आहे. खाजगी क्षेत्राने देखील या काळात वेगळ्या उर्जेने अशाच प्रकारचे प्रयत्न केले आहेत.
  • पुरवठा साखळीची निर्मिती करण्यात आली आहे. चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांना आवश्यक असलेले reagents  वेळेत पुरवण्यासाठी केंद्र सरकार राज्यांसोबत अथक प्रयत्न करत आहे, त्यामुळे त्यांची सर्वाधिक गरज असलेल्या हॉट स्पॉट्समध्ये ते वळवता येत आहेत.
  • कोविड19 च्या चाचण्यांसाठीचे प्रमाण आजही आणि आधीही RT-PCR चाचण्या हेच असून या चाचणीमुळे कोरोनाचा विषाणू सापडतो व जीव वाचवता येतो. हेच आमचे चाचणीसाठीचे तत्व आणि धोरण आहे.
  • संसर्गजन्य आजार नियंत्रण कायदा मध्ये सुधारणा करून आणलेल्या अध्यादेशाबद्दल वैद्यकीय समुदायाच्या वतीने मी पंतप्रधानाचे आणि सरकारचे आभार मानतो. आमच्या आघाडीवरच्या कोरोना योद्ध्यांचे मनोधैर्य उंचावण्यामध्ये त्याचे खूप मोठे योगदान मिळेल. – एम्स संचालक रणदीप गुलेरिया
  • कोविड 19 च्या रुग्णांना अनेक आव्हाने आणि त्रास सहन करावा लागतो आहे, जे योग्य नाही. बरे झालेले रुग्ण आपल्या या लढ्यातल्या विजयाचे प्रतीक आहेत, मात्र आपण त्यांना त्रास देऊन त्यांच्या आयुष्यात समस्या निर्माण करतो आहोत.
  • कोविड रुग्णांबद्दल जनतेमध्ये असलेल्या गैरसमजुतीमुळे, अनेक रुग्ण उपचारासाठी उशीरा बाहेर येतात, तेव्हा त्यांना श्वसनाचा गंभीर त्रास सुरु झालेला असतो, त्यामुळे मृत्यूदर वाढतो आहे.
  • या न्यूनगंडामुळे बाहेर न येणाऱ्या रुग्णांपर्यंत आपल्याला पोचायला हवे आहे.  ज्या व्यक्तींना कोविड19 चा संसर्ग झाला आहे, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना आपण कसा आधार देऊ शकतो आणि लोकांना बाहेर येण्यासाठी कसे प्रोत्साहन देऊ शकतो, याकडे आपल्याला लक्ष दयायचे आहे.
  • कोविड-19 च्या बऱ्याच रुग्णांचे प्राण निव्वळ ऑक्सिजनचा पुरवठा करून वाचवता येऊ शकतात; जर त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही तर त्यामुळे इतर अनेक  समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळेच ऑक्सिजनच्या पुरवठ्यात वाढ करण्याचे आमचे धोरण आहे.
  • कोविड-19 च्या रुग्णांवरील प्राथमिक उपचार 80% रुग्णांसाठी तर 15% रुग्णांमध्ये ऑक्सिजन थेरपी गुणकारी ठरत आहे. कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा, HCQ आणि इतर रोगावरींल गुणकारी औषधांचा नव्याने वापर करता येण्याजोगी इतर औषधे आणि नव्या औषधांचा वापर केला जात आहे.
  • महाराष्ट्रासाठी आंतर मंत्रालयीन केंद्रीय समितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर सह सचिवांची माहिती दिली की महाराष्ट्रात राज्य सरकारच्या धोरणांना बळकटी देण्यासाठी, विविध शक्यता गृहीत धरून, राज्याशी समन्वय राखत, स्थानिक पातळीवर अंमलबजावणी धोरण ठरवण्यात आले आहे.

वरील पत्रकार परिषदेचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

  इतर अपडेट्स :

महाराष्ट्र अपडेट्स

431 नव्या केसेससह महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 5,652 झाली आहे. बाधित लोकांपैकी 789 लोक बरे झाले आहेत तर 269 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सांगण्यानुसार महाराष्ट्रातील हॉटस्पॉटची संख्या 14 वरून 5 वर आली आहे आणि रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 3.1 दिवसावरून 7.01 दिवसावर गेला आहे.

***

DJM/RT/MC/PK

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1617578) Visitor Counter : 328