आदिवासी विकास मंत्रालय
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ट्रायफेडने अग्रक्रमाने उचलली पावले
Posted On:
22 APR 2020 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2020
सध्याच्या कोविड-19 महामारीच्या काळात गरीब आणि उपेक्षित आदिवासी कारागीरांना आणि जंगलसंपत्ती गोळा करून उपजीविका करणाऱ्यांना, ते असुरक्षित असल्याने मोठा धक्का बसला आहे. हा हंगाम देशातील बऱ्याचशा भागात सुगीचा असून जंगलसंपत्ती गोळा करून आणण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय करण्यासाठी आदिवासी लोकांच्या द्रुष्टीने महत्त्वाचा असतो. ट्रायफेड या आदिवासी कल्याण मंत्रालयाअंतर्गत
येणाऱ्या विभागाने अग्रक्रमाने या परिस्थितीचा आढावा घेऊन टाळेबंदीच्या काळाच्या या अभूतपूर्व परीस्थितीत आदिवासी कारागिरांना अधिक मदत करण्याच्या दृष्टीने त्वरित करण्याच्या, मध्यम स्थिती असतानाच्या तसेच प्रदीर्घ कालावधीसाठीच्या उपाययोजना करायचे योजिले आहे.
कोविड-19 च्या टाळेबंदीच्या कालावधीत करण्याच्या उपाययोजनांचे वर्गीकरण खालील तीन प्रकारांप्रमाणे:
- सिद्धी आणि जनजागृती निर्माण करणे
- वैयक्तिक आरोग्यनिगा संरक्षण
- एनटीएफपी संपादन
अल्पकालीन उपाययोजना
- वन धन शारीरिक अंतर जागरूकता अभियानांतर्गत, एनटीएफपी मिळवण्यासाठी जंगलात फिरणाऱ्या आदिवासींना कोविडच्या प्रतिबंधासाठी शारीरिक अंतर राखणे, घरगुती विलगीकरण, स्वच्छता यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर वेबिनार, फेबबुक लाईव्ह स्ट्रीम या सारख्या माध्यमातून द्विस्तरीय प्रशिक्षण देणे.
- वन धन स्वयसहाय्यता गटांना रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी संरक्षक मास्क आणि स्वच्छतेसाठी (साबण, निर्जंतुकीकरण द्रव) यांचा वापर करून स्वच्छता राखण्यास मदत करण्याची सुरुवात करणे
मध्यम आणि प्रदीर्घ कालावधीत उपजीविकेसाठी करण्याच्या उपाययोजना
- टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात जंगलसंपत्ती गोळ्या करणाऱ्या कोट्यावधी आदिवासी जनांसाठी गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वांतून काही सूट मिळणे शक्य आहे का, यासाठी विचारणा केली होती. त्यानुसार ग्रूहमंत्रालयाने आदिवासी जमाती आणि जंगलात राहणाऱ्या लोकांना 16 एप्रिल 2020 रोजी जंगलसंपत्ती गोळा करणे, पीकाची साठवणूक आणि लाकडे यासारख्या दुय्यम वन उत्पादने - मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस ( MFP) साठी काही सूट देऊन नवी मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. सुगीच्या हंगामाच्या वेळेवरच ही सूट दिली गेली.
- आदिवासी कल्याण मंत्रालयाने देखील सध्याच्या कठीण परीस्थितीत ट्रायफेडला, एमएफपीसाठी किमान आधारभूत किंमतीवर लक्ष केंद्रित करायला सांगितले आहे, जेणेकरून आदिवासी लोकांना त्याची यथोचित किंमत मिळेल.
- 17 एप्रिल 2020 पासून ट्रायफेडने आदिवासी विकास मंत्रालयाच्या आदेशानुसार सर्व राज्यात किमान आधारभूत किमतीनुसार स्थानिक पातळीवर, वजनकाट्याची उपलब्धता, मालाची ने-आण तसेच शीतगृहे आणि कोरड्या वातावरणात मालाची साठवणूक करण्याच्या सोयीसह विविध ठिकाणी स्थानिक बाजारपेठ म्हणजे हाटबाजार सुरु करण्यात पुढाकार घेतला आहे.
वन धन शारिरीक अंतर जागरूकता अभियान-
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कार्यरत असलेल्या प्रधानमंत्री वन धन योजनेच्या आधारे ट्रायफेडने यूनीसेफ आणि डब्ल्यू एच ओ यांच्या सहकार्याने डिजिटल माध्यमाद्वारे 15 हजार स्वयंसहायता गटांमार्फत आदिवासींमधे शारीरिक अंतर राखण्याबाबत जनजागृती केली आहे. वन धन सामाजिक दूरी जागरूकता अथवा वन धन शारीरिक अंतर जनजागृती चळवळ या नावाने सुरु असलेल्या उपक्रमाला यूनीसेफने जरूरीची आय एफ सी सामुग्री म्हणजे पोस्टर्स,जाहिरातपत्रिका हस्तपत्रिका, पुस्तिका दिली आहे. अशाप्रकारे सामाजिक अंतर राखणे, घरगुती विलगीकरण या विषयांवर कोविड-19 च्या संसर्गाविरोधात करण्याच्या मूलभूत उपाययोजनांबाबत वेबिनार आणि प्रशिक्षण दूरदूरच्या भागांतून केले जात आहे.
ट्रायफेडचे राज्य पातळीवरील अधिकारी राज्य विभागीय अधिकारी यांच्यासह पीएमव्हीडीवाय, गैर सरकारी संस्था, एस एच जी प्रमुख यांच्या सह इतर अनेक कार्यकर्ते वेबिनार कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रशिक्षण देणारे प्रशिक्षकः ट्रायफेडचे कार्यकारी संचालक प्रवीर कृष्ण, ट्रायफेडचे ( एमएफपी )उपव्यवस्थापक श्री. अमित भटनागर, ट्रायफेडचे श्री. सिध्दार्थ श्रेष्ठ, यूनीसेफ इंडिया माहिती विकास शाखेचे प्रमुख डॉ. सचिन रेवारीया जागतिक आरोग्य संघटनेचे विशेषज्ञ डॉ. प्रवीण खोब्रागडे, डॉ. श्रीमती शिखा वर्धन, श्रीमती अरुपा शुक्ला (यूनीसेफ), श्रीमती रचना शर्मा (यूनीसेफ).
Total Registration
|
806
|
Unique Viewers
|
502
|
Total Users
|
2388
|
Max Concurrent views
|
386
|
Facebook views (dated: 17/04/2020)
|
94050
|
* * *
U.Ujgare/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
(Release ID: 1617269)
Visitor Counter : 228