• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय औषध सचिवांनी देशातील औषधांचे उत्पादन वाढविण्यासाठी राज्य औषध नियंत्रकांना (एसडीसीएस) औषधनिर्मिती कंपन्यांना मदत करण्यास सांगितले


औषध निर्मिती आणि वितरणाच्या मुद्यांचा आढावा घेण्यासाठी एसडीसीएस सोबत व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक

Posted On: 22 APR 2020 8:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2020


कोविड-पूर्व आणि कोविड-नंतर औषधनिर्मिती आणि वैद्यकीय उपकरण निर्मितीच्या कार्यरत स्थितीचा आढावा घेण्यासाठी 20 राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या राज्य औषध नियंत्रकासोबत एनपीपीए, डीसीजी (I) अध्यक्ष यांच्यासमवेत औषधनिर्मिती विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक आयोजित करण्यात आली होती.   


 

औषधनिर्मिती विभागाच्या सचिवांनी सर्व एसडीसीएसच्या प्रयत्नांचे कौतुक केले. औषधे व वैद्यकीय उपचारांची कमतरता भासू नये यासाठी त्यांनी स्थानिक प्रशासन आणि संबंधित प्राधिकरणासह नियमित परस्परसंवाद साधून त्यांच्या सहाय्याने उत्पादन युनिट्सना सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली आहे. देशातील औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा उत्पादन स्तर, उत्पादन टक्केवारी (पूर्व आणि नंतर कोविड) आणि उपलब्धता. 

राज्य औषध नियंत्रकांना कोविड-19 च्या उपचारांच्या व्यवस्थापनातील आवश्यक औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे. विनाअडथळा सर्व स्तरावर पुरेसा साठा उपलब्ध व्हावा यासाठी उत्पादन क्षमतेचा संपूर्ण वापर सुनिश्चित करण्याची देखील विनंती करण्यात आली आहे.    

राज्य औषध नियंत्रकांनी असे आश्वासन दिले की ते उत्पादन पातळी वाढविण्यासाठी, मनुष्यबळाची उपस्थिती, लॉजिस्टिक्स पाठबळ यासाठी प्रयत्न करीत आहेत जेणेकरुन देशात औषध आणि वैद्यकीय उपकरणांची सहज निर्मिती, वितरण आणि उपलब्धता सुनिश्चित होईल.

सचिव, डीओपी यांनी सर्व एसडीसीएसना सूचना दिल्या:

उत्पादनाचे कार्य पूर्ण प्रमाणात सुनिश्चित करण्यासाठी आणि औषधांची उपलब्धता वाढविण्यासाठी टक्केवारी वाढवा.

सर्व संबधित स्थानिक प्राधिकरणाच्या सहकार्याने औषध आणि उपकरण उत्पादनासाठी आवश्यक लॉजिस्टिक्स, मनुष्यबळ आणि सहाय्यक युनिटशी संबधित सर्व समस्यांचे निराकरण करणे.

औषध आणि वैद्यकीय उपकरणांच्या साठ्यावर आणि वाढीव किंमतीवर लक्ष ठेवले पाहिजे आणि अशी परिस्थिती आढळल्यास कारवाई केली जाईल. 

सर्व राज्यांनी सॉफ्ट कॉपीमध्ये औषधे आणि उपकरणे उत्पादन करण्याऱ्या युनिटची माहिती तात्काळ उपलब्ध करून द्यावी.

सर्व राज्य औषधे नियंत्रकांद्वारे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, एझिथ्रोमाइसिन आणि पॅरासिटामोल फॉर्म्युलेशन्सच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवले जात आहे. 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत प्रसारित होणाऱ्या 55+97 आवश्यक औषधांच्या निर्मितीवर नियमितपणे देखरेख ठेवून आकडेवारीवर सादर केली पाहिजे.  

* * *

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com


(Release ID: 1617281) Visitor Counter : 245


Link mygov.in