श्रम आणि रोजगार मंत्रालय

पीएमजीकेवाय अंतर्गत सवलत दिलेल्या पीएफ ट्रस्टकडून 40,826 सदस्यांना 481.63 कोटी रुपये वितरीत

Posted On: 20 APR 2020 9:00PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2020

 

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचाच एक भाग म्हणून कोविड-19 साथीच्या आजाराच्या काळात ईपीएफ योजनेतून पैसे काढण्याची विशेष तरतूद सरकारने जाहीर केली आहे आणि याच उद्देशाने 28 मार्च 2020 रोजी ईपीएफ योजनेत तत्काळ अधिसूचनेने परिच्छेद 68 L (3) वाढवण्यात आला. या तरतुदीनुसार तीन महिन्यांपर्यत मूळ वेतन आणि महागाई भत्याच्या मर्यादेपर्यंत परतफेड न करावयाची रक्कम किंवा सदस्याच्या ईपीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी 75% रक्कम जी कमी असेल ती काढता येईल. सदस्य कमी रकमेसाठी देखील अर्ज करू शकतो.

कोविड-19 मुळे देशभर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सवलत मिळालेल्या पीएफ ट्रस्टनी देखील आपला आवाका वाढवला आहे असे अहवालात नमूद करताना आनंद होत आहे. 17 एप्रिल 2020 च्या सकाळ पर्यंत सवलत मिळालेल्या पीएफ ट्रस्टनी कोविड-19 साठी परिच्छेद 68-L अंतर्गत  40,826 पीएफ सदस्यांना आग्रीम 481.63 कोटी रुपये वितरीत केले आहेत.

 

10 सवलत प्राप्त आस्थापने :

यासंदर्भात सवलत मिळालेल्या काही आस्थापनांनी अनुकरणीय कामेही केली आहेत. 17 एप्रिल 2020 पर्यंत, कोविड-19 दाव्यांसाठी वितरित करण्यात आलेल्या रकमेच्या अनुषंगाने क्रमानुसार महत्वाची 10 सवलत प्राप्त आस्थापने खालीलप्रमाणे:

अ. क्र.

आस्थापनाचे नाव

कोविड-19 च्या दाव्यासंदर्भात प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या

कोविड-19 चे निकाली निघालेल्या दाव्यांची संख्या

वितरित केलेली रक्कम

1

नेवेली लिगनेट कॉर्पोरेशन, नेवेली, 701-कडलूर, 607802

3255

3255

84,44,00,000

2

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई

9373

9373

43,34,04,641

3

विशाखापट्टणम स्टील प्लांट, विजाग

1708

1708

40,99,37,800

4

एनटीपीसी लिमिटेड, दिल्ली

925

925

28,74,21,531

5

एचसीएल टेक्नॉलॉजीज लि. / हिंदुस्तान इन्स्ट्रुमेंट लि. कर्मचारी भविष्य निर्वाह ट्रस्ट, गुडगाव

6938

4415

27,14,03,862

6

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. दिल्ली

1263

1089

26,17,32,403

7

ओएनजीसी, डेहरादून

2297

1723

24,17,00,000

8

भेल आरसी पुरम

1367

1199

22,22,15,000

9

मेसर्स भेल भोपाळ

1758

926

16,42,00,001

10

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई

461

461

14,33,10,000

 

G.Chippalkatti/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1616533) Visitor Counter : 256