गृह मंत्रालय

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातील लॉकडाऊन निर्बंधानुसार ई-कॉमर्स कंपन्‍यांद्वारे अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचा पुरवठा करण्यास सरकारची मनाई

Posted On: 19 APR 2020 2:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 एप्रिल 2020


गृह मंत्रालयाने कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातील देशव्यापी लॉकडाऊन संदर्भात सर्व मंत्रालये/ विभागांना, एकत्रित सुधारित मार्गदर्शक तत्वांनुसार काही उपक्रमांना सवलत देण्याचे आदेश जारी केले होते. 

(https://www.mha.gov.in/sites/default/files/MHA%20order%20dt%2015.04.2020%2C%20with%20Revised%20Consolidated%20Guidelines_compressed%20%283%29.pdf),

वरील एकत्रित सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे स्पष्ट केले आहे की, आवश्यक वस्तू पुरवणार्‍या ई-कॉमर्स कंपन्यांना लॉकडाउन निर्बंधापासून सूट देण्यात आली आहे. याशिवाय, केवळ आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या वाहनांना आवश्यक परवानगी देऊन वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. 

लॉकडाऊन निर्बंधावरील एकत्रित सुधारित मार्गदर्शक तत्वांच्या तरतुदीनुसार, कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातील लॉकडाऊन निर्बंधानुसार अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचा पुरवठा करण्यास सरकारने मनाई केली आहे. 

अधिकृत दस्तऐवज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
 (Release ID: 1616009) Visitor Counter : 63