सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

लॉकडाउन काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांसाठी सल्ले-सूचना

Posted On: 16 APR 2020 5:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 एप्रिल 2020

 

सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय त्याचबरोबर नवी दिल्ली येथील एम्सच्या जनौषधी विभागाच्या वतीने कोविड-19 च्या लॉकडाउन काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि त्यांची काळजी घेणा-या लोकांसाठी एक मार्गदर्शक सल्ले, सूचनांची सूची जारी करण्यात आली आहे. सध्या कोविड-19 महामारीच्या काळात या सल्ल्यांचे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे. यासंबंधी सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवले आहे. या मंत्रालयाचे सचिव आर. सुब्रमण्यम यांनी सर्वांना पाठवलेल्या पत्रामध्ये 60 वर्षांच्या पुढे वय असलेल्या नागरिकांची काळजी घेण्याविषयी सूचना दिल्या आहेत. एखाद्या वयस्क व्यक्तीचे आरोग्य कसे आहे, त्याला कोणते आजार आहेत, हे लक्षात घेवून त्याला कोणत्याही प्रकारचे संक्रमण झाले असल्याची शंका उत्पन्न झाल्यास नेमके कशा प्रकारे उपचार सुरू करायचे, कोणती काळजी घ्यायची, अशी प्रकरणे कशी हाताळायची, याविषयी सविस्तर माहिती या सूचनांमध्ये देण्यात आली आहे. तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणा-या स्वयंसेवी संस्थांपर्यंत या सल्ला- सूचना पोहोचवण्यात याव्यात, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या सल्ला-सूचनांविषयी अधिक तपशील जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करावे.

 

 

U.Ujgare/S.Bedekar/D.Rane


(Release ID: 1615038) Visitor Counter : 233