आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 सद्यस्थिती
Posted On:
07 APR 2020 6:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 एप्रिल 2020
देशामध्ये कोविड-19 प्रतिबंधासाठी, त्याचा फैलाव थांबवण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी भारत सरकारने राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्यासोबत अनेक प्रतिबंधात्मक, परिणामकारक आणि वर्गीकृत उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांवर अतिशय उच्च स्तरावरून नियमित देखरेख केली जात आहे आणि त्याचा आढावा घेतला जात आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने समूह प्रतिबंध आणि फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. देखरेखीसाठी तंत्रज्ञानाचा वापर, विलगीकरण सुविधांवर देखरेख, संशयित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आल्याने विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्ती यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे, नागरिकांना अद्ययावत माहिती पुरवणे, हीट मॅप्सचा वापर करून विश्लेषणात्मक अंदाज वर्तवणे, रुग्णवाहिका आणि निर्जंतुकीकरण सेवांचे रियल टाईम ट्रॅकिंग म्हणजे त्यांच्या प्रत्यक्ष त्या वेळी त्यांचे स्थान कुठे आहे त्यावर लक्ष ठेवणे, देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हर्चुअल प्रशिक्षण आणि टेलि कौन्सिलिंग करणे अशा विविध उपाययोजनांचा अवलंब करण्यात येत आहे.
आरोग्य मंत्रालयाने कोविड-19 व्यवस्थापनासाठी एक अतिशय अद्ययावत प्रशिक्षण सामग्री आणि व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. हे सर्व: https://www.mohfw.gov.in/ वर उपलब्ध आहे.
कोविड19 च्या संशयित/ पुष्टी झालेल्या प्रकरणांच्या योग्य प्रकारच्या व्यवस्थापनाबाबत देखील एक मार्गदर्शक माहितीचा दस्तावेज उपलब्ध करण्यात आला आहे. ही माहिती https://www.mohfw.gov.in/pdf/FinalGuidanceonMangaementofCovidcasesversion2.pdf यावर उपलब्ध आहे.
कोविड-19 रुग्णांच्या विविध श्रेणींसाठी उपचारांचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी आणि कोविड-19 रुग्णांची काळजी घेण्यासाठी केवळ कोविड-19 आजारावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची निवड करण्यासाठी तीन प्रकारच्या सुविधा उभारण्यात येणार आहेत.
- कोविड केअर सेंटर (सीसीसी) :
- कोविडचा सौम्य किंवा अतिसौम्य प्रभाव असलेले रुग्ण किंवा संशयित रुग्ण.
- आरोग्य केंद्रसदृश सुविधा. या सुविधा वसतिगृह,हॉटेल, शाळा, स्टेडियम, लॉजेस इत्यादी सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही ठिकाणी उभारण्यात येतील.
- गरज भासल्यास सध्या असलेल्या विलगीकरण सुविधांचे रुपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येईल.
- एक किंवा अधिक डेडिकेटेड कोविड आरोग्य केंद्रे आणि किमान एक डेडिकेटेड कोविड रुग्णालयांचे संदर्भासाठी विशेषत्वाने मॅपिंग करण्यात येईल.
- डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी):
- डॉक्टरांनी मध्यम स्वरुपाचे म्हणून निदान केलेल्या सर्व रुग्णांवर या ठिकाणी उपचार करण्यात येतील
- ही केंद्रे एकतर पूर्ण रुग्णालये म्हणून उपलब्ध असावीत किंवा त्या रुग्णालयातील एक पूर्णपणे स्वतंत्र कक्ष असावा ज्याचे प्रवेशद्वार प्राधान्याने स्वतंत्र असावे.
- या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या सोयीसह खाटा असाव्यात.
- डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल(डीसीएच):
- डॉक्टरांनी अतिशय गंभीर म्हणून निदान केलेल्या रुग्णांवर सर्वसमावेश उपचारांची सुविधा असलेली ही केंद्रे असतील.
- हे केंद्र एकतर संपूर्ण रुग्णालय असावे किंवा रुग्णालयातील वेगळ्या प्रवेशद्वाराची सुविधा असलेला कक्ष असावा.
- पूर्णपणे सुसज्ज अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजनचा पुरवठ्याची सोय असलेल्या खाटा असाव्यात.
आतापर्यंत देशभरात कोविड-19 च्या संसर्गाची पुष्टी झालेले 4421 रुग्ण आढळले आहेत आणि 117 जणांचा मृत्यू झाला आहे. 326 रुग्ण उपचारांनंतर बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
कोविड-19 शी सबंधित तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक सूचना आणि नियमावली संदर्भात अधिकृत आणि अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी नियमितपणे पुढील संकेतस्थळाला भेट द्या. https://www.mohfw.gov.in/
कोविड-19 शी सबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in या ईमेलवर आणि इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in या ईमेलवर पाठवता येतील.
कोविड-19 बाबत कोणतीही शंका दूर करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला फोन करा. हेल्पलाईन क्रमांक: +91-11-23978046 किंवा 1075 (टोल फ्री).
राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf या ठिकाणी देखील उपलब्ध आहे.
G.Chippalkatti/S.Patil/D.Rane
(Release ID: 1612100)
Visitor Counter : 183
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam