पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बहरिनचे राजे यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा
Posted On:
06 APR 2020 8:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बहरिनचे राजे हमाद बिन इसाल खलिफा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
कोविड-19 ने सध्या निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यामुळे त्याचा विविध प्रकारच्या मालवाहतुकीची साखळी आणि वित्तीय बाजार यांच्यावर होणाऱ्या परिणामांबाबत दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला.
बहरिनमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या भारतीय समुदायाच्या कल्याणाकडे सध्या निर्माण झालेल्या आरोग्यविषयक संकटाच्या काळात, वैयक्तिक लक्ष पुरवण्याची ग्वाही बहरिनच्या राजांनी पंतप्रधानांना दिली. भारतीय समुदायाविषयी बहरिन अधिकाऱ्यांनी दाखवलेला जिव्हाळा आणि त्यांची काळजी घेत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले आणि या अधिकाऱ्यांची प्रशंसा केली.
कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानाला तोंड देण्यासाठी दोन्ही देशांचा अधिकारीवर्ग परस्परांच्या सातत्याने संपर्कात राहील आणि एकमेकांना आवश्यक ते सर्व पाठबळ देईल याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.
भारताच्या विस्तृत शेजारी बहरिन हा एक महत्त्वाचा भाग असल्याचे पंतप्रधानांनी बहरिनच्या राजांना सांगितले. त्याचप्रकारे गेल्या वर्षी दिलेल्या बहरिन भेटीच्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला.
B.Gokhale/S.Patil/P.Malandkar
(Release ID: 1611834)
Visitor Counter : 208
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam