• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19च्या विरोधात लढण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपाययोजना

संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून नव्या औषधांचा शोध घेण्यासाठी ‘हॅकेथॉन’ कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे- प्रा. के.विजय राघवन

Posted On: 28 MAY 2020 8:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मे 2020


कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लसींची निर्मिती, औषधांचा शोध, निदान आणि चाचणी यासंदर्भात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत आज नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल आणि भारत सरकारचे प्रधान शास्त्रीय सल्लागार प्राध्यापक के. विजय राघवन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. लसींची निर्मिती ही प्रक्रिया साधारणपणे धीमी आणि अनिश्चिततांचे सावट असलेली असते याकडे त्यांनी लक्ष वेधले. पण कोविड-19 या विषाणूच्या विरोधातील लढाईत विजय मिळवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात समांतर प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवर हे प्रयत्न सुरू आहेत,  अतिशय भक्कम असलेल्या भारतीय लसनिर्मिती उद्योगातील भारतीय तज्ञ आणि स्टार्ट अप कंपन्या या लसींच्या प्राथमिक आवृत्त्या तयार करण्यासाठी काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात तीन प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत.  स्वदेशी, जागतिक पातळीवरील  प्रयत्न असून त्यामध्ये भारतीय संघटनांनी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या प्रकारात जागतिक प्रयत्नांमध्ये भारतीय सहभाग आहे. अशा प्रकारच्या विशाल स्वरुपामुळे, उत्पादन आणि साठा याबाबतची जोखीम कमी असल्यामुळे घेण्यात येणाऱ्या प्रयत्नांना यश मिळेलचं अशी  हमी आहे.

औषधांच्या शोधाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की आमच्या वैज्ञानिक प्रयत्नांमध्ये तीन प्रकारच्या दृष्टीकोनाचा अंतर्भाव आहे.  एका आजारावर असलेल्या औषधाचा दुसऱ्या उद्देशासाठी वापर करून ते विषाणूविरोधात किती प्रभावी आहे ते पाहणे, त्या आजाराचे दुष्परिणाम कमी करणे. दुसऱ्या दृष्टीकोनात वनौषधी आणि औषधी वनस्पतींचे अर्क यांच्या वापराच्या चाचण्यांचा अंतर्भाव ठेवणे. सर्वात शेवटी विविध प्रकारच्या दृष्टीकोनांचा वापर करून हॅकॅथॉन या नव्या संगणकीय प्रणालीद्वारे औषधाचा शोध लावण्यासह एका नव्या औषधाची निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. 

विविध पातळ्यांवर होणाऱ्या संशोधनामुळे नव्या चाचण्या आणि चाचणी सामग्रीची निर्मिती होऊ लागली आहे. यामध्ये विषाणू संसर्गाचे निदान करणाऱ्या नव्या चाचण्या आणि अँटिबॉडी शोधणाऱ्या देखील चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये शरीरस्रावाशी संबंधित सेरोलॉजिकल अभ्यासासाठी शेवटच्या चाचण्यांचा वापर केला जात आहे. आमचे शास्त्रज्ञ, संस्था आणि वैज्ञानिक संघटनाच्या, संस्थांच्या परस्पर सहकार्याने होणाऱ्या प्रयत्नांमुळे या सर्व घडामोडींचा वेग वाढला आहे.  वेग आणि दर्जा यांचे एकत्रिकरण करून नियामक प्रणाली देखील खूप बारकाईने घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.


* * *

B.Gokhale/S.Patil/D.Rane


 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1627504) Visitor Counter : 22