• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
गृह मंत्रालय

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर व्हिसा आणि प्रवासाबाबत लावलेले निर्बंध गृह व्यवहार मंत्रालयाने केले शिथील


परदेशी अडकलेल्या काही ओसीआय कार्डधारकांना भारतात परत आणण्यासाठी परवानगी

Posted On: 22 MAY 2020 4:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मे 2020


कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर व्हिसा आणि प्रवासाबाबत लावलेले निर्बंध केन्द्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने शिथील केले आहेत. यानुसार, ओसीआय कार्डधारक म्हणजेच परदेशात राहाणाऱ्या भारतीय नागरिकांची वर्गवारी केली आहे. त्यातल्या काहींना भारतात परत आणण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

परदेशात अडकलेल्या ओसीआय कार्डधारक भारतीयांचा मायदेशी परतण्याचा मार्ग यामुळे सुकर झाला आहे:

  • वर्गवारी प्रमाणे, ओसीआय कार्डधारक भारतात जन्मलेल्या पालकांचे अल्पवयीन अपत्य.
  • ओसीआय कार्डधारक, ज्यांना कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू यासारख्या तातडीच्या कारणांसाठी भारतात यायचे आहे.
  • जोडीदारापैकी एक ओसीआय कार्डधारक आहे. दुसरा भारतीय नागरीक. ज्यांचे कायमस्वरुपी रहिवास ठिकाण भारतात आहे.
  • ओसीआय कार्डधारक विद्यापीठ विद्यार्थी (कायद्याने अल्पवयीन नाही) ज्यांचे पालक भारतीय नागरीक असून कायमस्वरुपी भारतातच राहातात.

परदेशात अडकलेल्या उपरोक्त वर्गवारीतील ओसीआय कार्डधारकांना कोणत्याही विमान, जहाज, रेल्वेगाडी किंवा वाहनांतून मायदेशी परतताना, गृह व्यवहार मंत्रालयाने 07.05.2020 रोजी लावलेले संबंधित निर्बंध लागू नसतील. मात्र, गृह व्यवहार मंत्रालयाने 07.05.2020 रोजी जाहीर केल्याप्रमाणे इतर अटी शर्थी कायम राहाणार आहेत.

अधिकृत कागदपत्र पाहण्‍यासाठी येथे क्लिक करा


* * *

B.Gokhale/V.Ghode/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1626084) Visitor Counter : 218


Link mygov.in