• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
रसायन आणि खते मंत्रालय

कोविड-19 शी लढा देण्यात राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधन संस्थांची सक्रीय भूमिका


NIPERs मध्ये विकसित झालेल्या उत्पादनांना जलद परवाने आणि व्यावसायीकरणावर भर देत सद्यस्थितीत उत्पादने लवकरात लवकर बाजारात आणण्याचा प्रयत्न

Posted On: 14 MAY 2020 6:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14  मे 2020

कोविड-19 चे प्रतिबंधन, चाचण्या आणि उपचारासंदर्भात विविध राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था (NIPERs),कडून अनेक बहुस्तरीय संशोधन प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रस्तावांमध्ये कोविड प्रतिरोधकांना लक्ष्य करणाऱ्या प्रथिनांची रचना (NIPER-मोहाली), संगणकीय मार्गदर्शनाखाली FDA चा डेटा वापरुन औषध-पुनर्निमिती (NIPER-मोहाली आणि रायबरेली), रेमदेसवीरच्या प्रो-ड्रग ते औषध विकसित होण्याच्या प्रक्रीयेचे निरीक्षण (NIPER-मोहाली), आजारी रुग्णांसाठी सहायक उपचार-आधारित नाकातला स्प्रे, (NIPER-हैदराबाद),जलद कोविड चाचणीसाठी क्वांटम-डॉट आधारित बायोसेन्सर विकसित करणे (NIPER-अहमदाबाद), आणि कोविड-19 दरम्यान पक्षाघात नियंत्रण करण्याबाबतचे अध्ययन. NIPER- रायबरेलीने आयआयटी आणि उद्योग भागीदारासोबत पारंपारिक औषधी वनस्पतीचा वापर करत इम्युनो बुस्टर फॉर्म्युल्याविषयीचा एक मोठां प्रकल्प हाती घेतला आहे. तर NIPER-कोलकाता देशी बनावटीच्या स्वस्त आयसीयु व्हेंटीलेटर्स च्या निर्मितीवर भर देत आहे.

केन्द्रीय रसायने आणि खत मंत्रालयाच्या अखत्यातीरील औषधनिर्माण विभागाच्या अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था (NIPERs) अत्यंत महत्वाचे संशोधन कार्य करत असतात. सध्या देशात अशा सात संस्था कार्यरत आहेत. 

औषधनिर्माण विभागाचे सचिव डॉ पी डी वाघेला यांच्या अध्यक्षतेखाली सातही संस्थांच्या संचालकांची व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक झाली. कोविड-19 विरुध्द देशभरात सुरु असलेल्या लढाईत NIPERs ला काय योगदान देता येईल, याबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली.

NIPER गुवाहाटीच्या संचालकांनी 3D प्रींटेड चेहरा आवरण, हात न लावता दारे, कपाटे, लिफ्ट आणि ड्रोवर उघडण्यासाठीचे साधन, अँटी व्हायरल मास्क आणि हर्बल सॅनिटायझर अशा उत्पादनांची माहिती दिली. NIPER मोहालीने पंजाब सरकारसोबत जलद कोविड चाचण्यांसाठी RT-PCR चा सेट अप उभारला आहे.

कोविडशी संबंधित सर्व संशोधन आणि उत्पादन विकसित करणे जलदगतीने करुन गरजू लोकांपर्यंत त्वरित ही उत्पादने पोहचवण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे डॉ वाघेला यांनी यावेळी सांगितले.

 

 

S.Thakur/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1624020) Visitor Counter : 215


Link mygov.in