• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
श्रम आणि रोजगार मंत्रालय

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीसाठी ईमेल पध्दतीने कर्मचाऱ्यांच्या ई-स्वाक्षऱ्यांना परवानगी

प्रविष्टि तिथि: 06 MAY 2020 6:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6  मे 2020

 

मालकवर्गाला डिजिटल अथवा आधार कार्डावरून ई-स्वाक्षरी घेण्यास कठीण जात असल्यामुळे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने टाळेबंदीच्या काळात मालक वर्गाला ईमेल पध्दतीने कर्मचाऱ्यांच्या ई -स्वाक्षऱ्या घेण्यास सुरुवात करायला परवानगी दिली आहे.

कोविड-19 च्या महामारीचा प्रसार रोखण्यास नियंत्रण ठेवण्यासाठी  सरकारने घोषित केलेल्या  सध्याच्या टाळेबंदीच्या कठीण परिस्थितीत मालकवर्ग आपली कामे नेहमी प्रमाणे पार पाडू शकत नाहीत तसेच त्यांना डिजिटल स्वाक्षऱ्या अथवा आधारकार्डाशी संलग्न ईपीएफओ पोर्टल वरून घेण्यात अडचणी येत आहेत.

मालकवर्गाच्या अधिकृत सदस्यांकडून डिजिटल स्वाक्षऱ्या अथवा आधारकार्डाशी संलग्न पोर्टल द्वारे केवायसी प्रमाणिकरण ,दाव्यांचे हस्तांतरण अशी महत्त्वाची कामे केली जातात. अशा स्वाक्षऱ्या वापरण्यासाठी विभागीय कार्यालयाच्या मान्यतेची गरज असते. टाळेबंदीमुळे मालकवर्गाला स्वाक्षऱ्यांची नोंदणी करण्यासाठी  विभागीय कार्यालयात पाठवणे कठीण झाले आहे.

हे लक्षात घेता  कार्यालयीन कामकाज सुलभ होण्यासाठी  ईपीएफओने अशी नोंदणी ईमेल द्वारे करण्यास मान्यता दिली आहे.मालकांनी अशी स्वाक्षरी करून पूर्ण भरलेली  स्कँन केलेली कागदपत्रे ई मेलद्वारे विभागीय कार्यालयात पाठवावीत. विभागीय कार्यालयाचे ईमेल पत्ते www.epfindia.gov.in .या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ज्या अधिकाऱ्यांनी डिजिटल स्वाक्षऱ्या मान्य केल्या आहेत परंतु त्यांचा डोंगल( dongle) सापडत नसेल अशांनी मालकांच्या पोर्टलवरून आधीपासूनच अधिकृत नोंदणी केलेल्या दस्तऐवजांनुसार ई-स्वाक्षरी द्वारे नोंदणी करावी. जर त्यांचे डिजिटल स्वाक्षरी वरील नाव आधारकार्ड प्रमाणेच असेल, तर त्यांच्या ई स्वाक्षरीच्या नोंदणी साठी वेगळ्या मान्यतेची गरज पडणार नाही.इतर  अधिकृत  दस्तावेजांची नोंदणी ई स्वाक्षरीने  तसेच त्यासोबत त्यांच्या मालकांचे मान्यतापत्र जोडून संबंधीत ईपीएफओच्या कार्यालयात पाठवू शकतील.

मालकवर्गाला आणि महामारीच्या विळख्यात सापडलेल्या कर्मचारी भविष्यनिर्वाह सदस्यांना या  सुविधेमुळे सहाय्य मिळेल.

 

G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1621543) आगंतुक पटल : 338
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Punjabi , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate