57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

57 वा इफ्फी (IFFI) सर्वांसाठी प्रवेश योग्य आणि समावेशक बनवण्यासाठी एनएफडीसी ची 'स्वयं' (Svayam) बरोबर भागीदारी


समावेशक सिनेमॅटिक अनुभूतीला प्रोत्साहन देण्यासाठी महोत्सव स्थळांची प्रवेशयोग्यता तपासणी, स्वयंसेवकांची संवेदनशील वर्तणूक आणि संवादात्मक सिम्युलेशन झोनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वयं सहकार्य करणार

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रवेशयोग्यता आणि समावेशकतेचा मापदंड प्रस्थापित करण्याचे उपक्रमाचे उद्दिष्ट

Posted On: 20 NOV 2026 12:12PMby PIB MumbaiRelease ID: 2338977Views: 30

गोवा, 20 नोव्‍हेंबर 2026

 

57 वा इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव  दिव्यांग व्यक्ती आणि हालचालींवर मर्यादा असलेल्या व्यक्तींसह सर्व चित्रपटप्रेमींसाठी अधिक प्रवेशयोग्य आणि समावेशक बनवण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) 'स्वयम' (Svayam) या संस्थेबरोबर भागीदारी केली आहे. या दोन संस्था तिसऱ्यांदा एकत्र येत असून, यापूर्वी 55 वा इफ्फी (IFFI) महोत्सव आणि 18 व्या मिफ्फ (MIFF), अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी भागीदारी केली होती.

अ‍ॅक्सेसिबिलिटी पार्टनर म्हणून, स्वयं, महोत्सवाच्या सर्व ठिकाणी प्रवेश सुलभता परीक्षण करत आहे, यामुळे संभाव्य अडथळे ओळखता येतील आणि अभ्यागतांना अधिक सुरक्षित, अधिक आरामदायक आणि स्वतंत्रपणे प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी उपाय सुचवता येतील.

या भागीदारीमध्ये महोत्सवातील स्वयंसेवकांसाठी अपंगत्व (दिव्यांग) आणि प्रवेशयोग्यता, यावर  संवेदनशीलता कार्यशाळाही आयोजित केल्या जातील. या सत्रांमध्ये आदरपूर्ण संवाद, समावेशक सहाय्य आणि सहभागाशी संबंधित विशिष्ट गरजा (accessibility needs) असलेल्या व्यक्तींना सहाय्य करण्याच्या व्यावहारिक मार्गांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

अ‍ॅक्सेसिबिलिटी सिम्युलेशन झोन अभ्यागतांना आणि महोत्सवाशी संबंधित व्यक्तींना, दिव्यांग व्यक्ती आणि हालचालींवर मर्यादा असलेल्या व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील अडचणी समजून घेण्याची संवादात्मक संधी देखील देईल. समावेशक आणि प्रवेशयोग्य सार्वजनिक जागांच्या महत्त्वाबाबत अधिक जागरूकता, सहानुभूती आणि समज वाढवणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

या भागीदारीबद्दल बोलताना, 'स्वयम' च्या व्यवस्थापकीय संचालक, स्मीनू जिंदाल म्हणाल्या, “प्रवेशयोग्यता म्हणजे केवळ रॅम्प तयार करणे किंवा भौतिक जागा अडथळामुक्त नाही, तर प्रत्येक व्यक्तीला समाजात समानतेने सहभागी होण्यासाठी सन्मान, स्वातंत्र्य आणि संधी सुनिश्चित करणे, हे आहे. सिनेमा हे एक प्रभावी माध्यम असून, ते लोकांना एकत्र आणते, सीमा ओलांडते आणि मानवी अनुभवांच्या विविधतेचा उत्सव साजरा करते. म्हणूनच, चित्रपट महोत्सव सर्वांचे समान स्वागत करणारे आणि प्रवेशयोग्य असायला हवेत. 57 व्या इफ्फी (IFFI) मधील एनएफडीसी बरोबरचे आमचे सहकार्य हे समावेशाला महोत्सवाच्या अनुभवाचा अविभाज्य भाग बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही अशाइफ्फी (IFFI) ची कल्पना करतो, जिथे वय, तात्पुरती दुखापत किंवा कायमच्या अपंगत्वामुळे मर्यादित झालेली हालचाल, चित्रपटांचा आनंद मिळवण्यात अडथळा ठरणार नाही.”

या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना, एनएफडीसी चे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंह म्हणाले, "भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सिनेमाच्या सार्वत्रिक भाषेचा उत्सव साजरा करतो, आणि हा उत्सव खरोखरच सर्वांसाठी खुला असणे महत्त्वाचे आहे. स्वयंमबरोबरची आमची भागीदारी 57 वा इफ्फी महोत्सव, सर्व सिनेप्रेमींसाठी अधिक प्रवेशयोग्य, समावेशक आणि सर्वांचे सारखेच स्वागत करणारा बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रवेशयोग्य आयोजन स्थळे आणि प्रशिक्षित, संवेदनशील स्वयंसेवकांच्या माध्यमातून, आम्ही असे वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो, जिथे प्रत्येकजण सन्मान, आराम आणि स्वातंत्र्याने महोत्सवात सहभागी होऊ शकेल. आम्हाला आशा आहे की, हा उपक्रम भारतातील समावेशक सांस्कृतिक आणि चित्रपटविषयक कार्यक्रमांसाठी एक अर्थपूर्ण मापदंड प्रस्थापित करेल.”

हे सहकार्य भारताच्या या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाला खऱ्या अर्थाने समावेशक बनवण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. याद्वारे दिव्यांग व्यक्ती आणि मर्यादित गतिशीलता असलेल्या व्यक्तींना सन्मानाने आणि स्वतंत्रपणे या महोत्सवात सहभागी होण्याची, इतरांशी जोडले जाण्याची आणि कथाकथनाची अद्भुत अनुभूती घेण्याची संधी मिळेल.

IFFILOID – Volume 5, Issue 1 : 20 November 2026

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/राजश्री आगाशे/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2338977
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026