पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उल्लेखनीय पर्यावरणीय कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी आसामच्या जनतेचे अभिनंदन केले

Posted On: 05 JUN 2026 11:42PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आसामच्या जनतेचे, विशेषतः राज्यातील नारी शक्तीचे अभिनंदन केले. शाश्वत पृथ्वी घडविण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात आसामच्या नारी शक्तीने पुढाकार घेतल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी 'एक्स' वरील आपल्या संदेशात म्हटले आहे की,

उल्लेखनीय कामगिरी. शाश्वत पृथ्वी घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या प्रयत्नात पुढाकार घेतल्याबद्दल आसामच्या जनतेचे, विशेषतः राज्याच्या नारी शक्तीचे अभिनंदन.

***

नेहा कुलकर्णी/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2269698) अभ्यागत कक्ष : 49