माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एनएफडीसी-एनएफएआयने कडून जागतिक प्रेक्षकांसाठी ऋत्विक घटक यांच्या आठ अजरामर चित्रपटांचे नव्या 4K मध्ये पुनरुज्जीवन
ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट (बीएफआय) बरोबरच्या सहकार्यामुळे ऋत्विक घटक यांची अलौकिक सिनेमॅटिक प्रतिभा जागतिक प्रेक्षकांसमोर येणार: प्रकाश मगदूम, व्यवस्थापकीय संचालक, एनएफडीसी
प्रविष्टि तिथि:
03 JUN 2026 10:52PM by PIB Mumbai
मुंबई, 3 जून 2026
भारताचा समृद्ध चित्रपट वारसा जतन करण्याच्या आणि जागतिक स्तरावर त्याचा प्रचार करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत, माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत कार्यरत, 'राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ – राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागार' (एनएफडीसी-एनएफएआय) या संस्थेने, दिग्गज चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांच्या सर्व वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचे 4K स्वरुपात यशस्वीरीत्या पुनरुज्जीवन (रिस्टोरेशन) केले आहे. त्या दूरदर्शी दिग्दर्शकाच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने, एनएफडीसी-एनएफएआय ने 'ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट' (BFI) बरोबर भागीदारी केली असून, लंडनमधील प्रतिष्ठित बीएफआय साऊथबँक येथे या चित्रपटांच्या भव्य पूर्वप्रदर्शन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाची सुरुवात जून 2026 मध्ये होत आहे. या सर्वसमावेशक प्रदर्शनामुळे आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना घटक यांची क्रांतिकारी कथाकथन शैली आणि सखोल सौंदर्यात्मक दृष्टी (अॅस्थेटिक व्हिजन), तिच्या अस्सल दृश्यात्मक रूपात अनुभवता येईल.
घाटक यांच्या चित्रपटांच्या पुनर्संचयनाचा प्रकल्प, हे राष्ट्रीय चित्रपट वारशाच्या (नॅशनल फिल्म हेरिटेज) सर्वात प्रशंसनीय उपक्रमांपैकी एक आहे. या आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संस्थात्मक महत्त्वाबाबत बोलताना एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, “भारताकडे जगातील सर्वात चैतन्यमय अशा चित्रपट वारशांपैकी एक वारसा आहे, आणि एनएफएचएम अंतर्गत, या चित्रपट संपदेचे जागतिक स्तरावरील सर्वोच्च मानकांनुसार पुनरुज्जीवन आणि जतन करण्याची जबाबदारी एनएफडीसी-एनएफएआय कडे सोपवण्यात आली आहे. ऋत्विक घटक यांची जन्मशताब्दी साजरी करताना, लंडनमध्ये आयोजित या 'रेट्रोस्पेक्टिव्ह' (पूर्वप्रदर्शन चित्रपट महोत्सव) साठी बीएफआय बरोबर सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. जागतिक चित्रपट जगताला घटक यांच्या प्रतिभेचा अविष्कार अनुभवण्यासाठी, आणि भारताच्या अभिलेखागार क्षेत्रातील कामगिरीचा दर्जा प्रत्यक्ष पाहण्यासाठी हा महोत्सव एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देईल.”

हे प्रचंड संग्रहात्मक यश 'नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन' (एनएफएचएम) अंतर्गत साध्य करण्यात आले असून, देशाचा दृकश्राव्य वारसा जतन करण्यासाठी समर्पित, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा हा एक प्रमुख उपक्रम आहे. एनएफडीसी-एनएफएआय ने अनेक दशकांपासून काळजीपूर्वक जतन करून ठेवलेल्या मूळ चित्रपटाच्या विविध घटकांचा (फिल्म एलिमेंट्स) तसेच पश्चिम बंगाल राज्य चित्रपट संग्रहातील अत्यंत मौल्यवान संसाधनांचा वापर करून, 4 K दर्जाचे अत्यंत बारकाईने केलेले चित्रपटांचे पुनरुज्जीवन साध्य झाले. दृश्यांची अस्सलता आणि या दिग्गज कलाकाराचा सिनेमॅटिक दृष्टिकोन तंतोतंत उतरवण्यासाठी, भारतीय सिनेमॅटोग्राफर अविक मुखोपाध्याय यांच्या निरीक्षणाखाली 'कलर ग्रेडिंग' म्हणजेच रंगांची श्रेणी तयार करण्याची प्रक्रिया पार पडली. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाचे पुनरुज्जीवन प्रकल्पाची प्रशंसा करताना ते म्हणाले, "ऋत्विक घटक यांच्या चित्रपटांच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेचा एक भाग असल्याचा मला खरोखर अभिमान वाटतो आणि मी भारावून गेलो आहे, कारण घटक, हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात अस्सल चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत. यामुळे, एक छायाचित्रकार म्हणून, त्याच्या सुंदर कलात्मक आविष्काराचे बारकाईने निरीक्षण करण्याची संधी मला मिळाली. अशा अत्यंत कष्टायच्या, तरीही अप्रतिम प्रयत्नांसाठी मी संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो.”
लंडनमधील हे प्रदर्शन घटक यांच्या गौरवशाली कारकिर्दीतील विविध कालखंडांमधील त्यांच्या सर्जनशील विश्वाशी जोडले असल्याने त्याचे सिंहावलोकन करण्याची संधी प्रदान करेल. या विस्तारित कार्यक्रमात त्यांच्या नागरीक, अजंत्रिक, बारी थेके पलीये, मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा, तितस एकटी नादिर नाम आणि जुक्ति तकको आर गप्पो या आठ प्रमुख महत्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांच्या नव्याने पुनर्संचयित केलेल्या 4K आवृत्त्यांची सादरीकरणे दाखवली जातील.या उत्कृष्ट नमुन्यांसह त्यांना पूरक म्हणून, त्यांची ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण छोट्या स्वरूपातील कामे, माहितीपट आणि दुर्मिळ बिहार के दर्शनिय स्थान, मुसाफिर, फिअर रॉंन्दे, भेट, नागरी संरक्षण, सायन्टिस्ट्स ऑफ टुमाॅरो, ये क्यूं, माय लेनिन, पुरुलियार छाउर, ये क्यूं, माय लेनिन, पुरुलियार छाउर,, दरबार गती पद्म,मिलेर प्रजापती,चिन्नमुल,राम किंकर बैज,रॉंन्जर गोलम, आणि बगलार बंगा दर्शन यासह अपूर्ण राहिलेली कामे, देखील प्रदर्शित केली जातील.

एनएफडीसी-एनएफएआय आणि बीएफआय यांच्यातील ही भागीदारी, भारताच्या चित्रपटांच्या खजिन्याला जागतिक दर्जावर पुनर्स्थापित करण्याच्या निरंतर वचनबद्धतेला अधिक दृढ करते. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत अशा व्यापक उपक्रमांची पुनर्स्थापना आणि त्यांना प्रचारात्मक प्रोत्साहन देऊन, या उत्कृष्ट कलाकृती भौगोलिक सीमा ओलांडून येणाऱ्या अनेक दशकांपर्यंत जागतिक प्रेक्षकांना प्रेरणा देत राहतील, हे भारत सरकार हे सुनिश्चित करत आहे.
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ-भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय(NFDC–NFAI) या संस्थांची माहिती
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ-भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFDC–NFAI) ही देशाच्या चित्रपट वारशाचे जतन, दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करण्यासाठी समर्पित असलेली भारताची एक प्रमुख संस्था आहे. भावी पिढ्यांसाठी ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक महत्त्व असलेल्या चित्रपटांचा शोध घेणे, ते मिळवणे, जतन करणे आणि त्यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच जागतिक चित्रपटांचा एक प्रातिनिधिक संग्रह जतन करणे, हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.
1969 पासून इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्हज (एफआयएएफ) चे सदस्य असलेले एनएफडीसी-एनएफएआय, भारताच्या चित्रपट इतिहासाचे एक प्रमुख भांडार म्हणून काम करते. त्यांच्या संशोधन आणि दस्तऐवजीकरण विभागात चित्रपट-संबंधित साहित्याचा एक विस्तृत संग्रह आहे, ज्यामध्ये 2 लाखांहून अधिक छायाचित्रे, 40,000 चित्रपट पोस्टर्स, 24,000 गाण्यांच्या पुस्तिका आणि 2.28 लाख वृत्तपत्रीय कात्रणे यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश साहित्य जतन आणि संशोधनाच्या उद्देशाने डिजिटल स्वरूपात परिवर्तित केले गेले आहे.
राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान (NFHM) याविषयीची माहिती
चित्रपट जतन करण्याच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी, भारत सरकारने 2015 मध्ये 'राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान' (NFHM) सुरू केले. या अभियानांतर्गत, NFDC–NFAI हे भारतातील महत्त्वपूर्ण चित्रपटांचे 2K आणि 4K तंत्रज्ञानाद्वारे डिजिटायझेशन आणि पुनर्संचयन ( करण्याचे कार्य हाती घेते; तसेच चित्रपटांच्या रीळांच्या स्थितीची तपासणी करते, अभिलेखागार कक्ष विकसित करते आणि प्रशिक्षण तसेच कार्यशाळांच्या माध्यमातून संस्थात्मक क्षमता बांधणी करण्याचे कार्य करते.
या उपक्रमांच्या माध्यमातून,एनएफडीसी-एनएफएआय भारताचा समृद्ध चित्रपट वारसा जपण्यात आणि अभिजात चित्रपट सध्याच्या आणि भावी पिढ्यांना मिळवणे सुलभ राहील हे सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
* * *
पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2268969)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Punjabi
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam