पंतप्रधान कार्यालय
महिला आरक्षण आणि त्याची वेळेवर अंमलबजावणी होण्याची गरज स्पष्ट करणारा लेख, पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
16 APR 2026 4:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लिहिलेला लेख समाज माध्यमावर सामायिक केला आहे.
या लेखात महिलांसाठी एक-तृतीयांश आरक्षण देणे ही सर्वांच्याच दृष्टीने तसेच एक संस्था म्हणून संसदेसाठीही महत्त्वाची घटना असल्याचे अधोरेखित केले आहे. या शिवाय, जनगणना करणे, मतदारसंघांची पुनर्रचना करणे आणि एकही दिवस वाया जाणार नाही याची दक्षता घेणे, हे महिलांसाठी अत्यंत आवश्यक असून ते तातडीने करण्याच्या गरजेवरही लेखात भर देण्यात आला आहे .
एक्स समाज माध्यमावरील पंतप्रधान कार्यालयाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की;
“या लेखात, केंद्रीय राज्यमंत्री @ShobhaBJP यांनी महिलांसाठी एक-तृतीयांश आरक्षण ही आपल्या सर्वांसाठी आणि एक संस्था म्हणून संसदेसाठी महत्त्वाची घटना असल्याचे अधोरेखित केले आहे.
भारतातील जनगणना पूर्ण करणे, मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे काम पूर्ण करणे आणि यासाठी एकही दिवस वाया घालवला जाणार नाही हे सुनिश्चित करणे ही तातडीची गरज त्यांनी या लेखात स्पष्ट केली आहे.”
https://www.newindianexpress.com/nation/2026/Apr/16/womens-quota-why-the-time-to-act-is-now”
राधिका अघोर/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2252648)
आगंतुक पटल : 44
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam