पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्रपतींशी संवाद साधला


राष्ट्रपती पेझेश्कियन यांनी इराण आणि परिसरातील परिस्थितीबाबत स्वतःचा दृष्टीकोन सामायिक केला

पंतप्रधान मोदी यांनी चर्चा आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवण्याच्या भारताच्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार केला

पंतप्रधानांनी भारतीय नागरिकांची सुरक्षितता आणि हित तसेच ऊर्जा आणि वस्तूंच्या अखंडित वाहतुकीला असलेले भारताचे प्राधान्य अधोरेखित केले

प्रविष्टि तिथि: 12 MAR 2026 11:41PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्रपती डॉ.मसौद पेझेश्कियन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

राष्ट्रपती पेझेश्कियन यांनी पंतप्रधान मोदी यांना इराणमधील सद्यस्थितीची थोडक्यात माहिती दिली आणि त्या भागातील अलीकडच्या घडामोडींबाबत स्वतःचा दृष्टिकोन सामायिक केला.

पंतप्रधानांनी या प्रदेशातील वाढत्या सुरक्षाविषयक स्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त करुन चर्चा आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवले जावेत या भारताच्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार केला.

इराणसह त्या सर्व क्षेत्रातील भारतीय नागरिकांची सुरक्षितता आणि हित तसेच ऊर्जा आणि वस्तूंच्या अखंडित वाहतुकीचे महत्त्व यांना भारताचे असलेले प्राधान्य पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याबाबत सहमती दर्शविली.

***

NitinFulluke / SanjanaChitnis / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2239456) आगंतुक पटल : 39
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam