पंतप्रधान कार्यालय
तेल अवीव येथे आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इस्रायलच्या पंतप्रधानांनी केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
25 FEB 2026 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजकीय दौऱ्यासाठी इस्रायलला पोहोचले. तेल अवीव येथील विमानतळावर आगमन होताच, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा नेतन्याहू यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले.
स्वागत कार्यक्रमानंतर, उभय पंतप्रधानांनी अल्पकाळ व्यक्तिगत भेट घेतली. हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर, भारतीय समुदायाच्या सदस्यांनी आणि ज्यू भारतीय सदस्यांनी पंतप्रधानांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. दोन्ही राष्ट्रांमधील चिरस्थायी मैत्रीचे प्रतीक म्हणून; भारतीय आणि इस्रायली कलाकारांनी खूप उत्साहाने सांस्कृतिक सादरीकरणाने पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.
* * *
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2232881)
आगंतुक पटल : 88
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam