पंतप्रधान कार्यालय
ओपन एआयच्या सीईओंनी पंतप्रधानांची भेट घेतली
Posted On:
20 FEB 2026 9:06PM by PIB Mumbai
ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
बैठकीनंतर, पंतप्रधानांनी नमूद केले की भारत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात मोठी प्रगती करत आहे आणि प्रतिभा आणि नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनण्यासाठी सज्ज आहे.
पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला भारतातील प्रतिभावान तरुणांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले, ज्यामुळे या परिवर्तनाच्या क्षेत्राला आणखी ऊर्जा मिळेल.
सॅम अल्टमन यांच्या X वरील पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणाले:
"ही खरोखर खूप चांगली बैठक होती. भारत एआयच्या जगात प्रचंड प्रगती करत आहे. आम्ही जगाला आमच्या प्रतिभावान तरुणांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि या क्षेत्रात ऊर्जा आणण्यासाठी आमंत्रित करतो.
@OpenAI"
***
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2231045)
अभ्यागत कक्ष : 10