पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस्टोनिया प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतींची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
18 FEB 2026 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेदरम्यान एस्टोनिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष अलार करिस यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष करिस यांनी गेल्या वर्षी पॅरिसमधील एआय ॲक्शन शिखर परिषदेच्या वेळी झालेल्या त्यांच्या भेटीतील सौहार्दपूर्ण खेळांची आठवण केली. दोन्ही नेत्यांनी लोकशाही आणि कायद्याचे राज्य या सामायिक मूल्यांवर तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थिरतेच्या सामायिक उद्दिष्टांवर आधारित भारत-एस्टोनिया संबंध अधिक दृढ करण्यासाठीच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
जानेवारी 2026 मध्ये झालेल्या 16 व्या भारत-युरोपियन युनियन शिखर परिषदेदरम्यान भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारानंतर भारत युरोपियन युनियन संबंधांमध्ये लक्षणीय धोरणात्मक वाढ झाल्याचे नेत्यांनी स्वागत केले.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. यात विशेषतः आयटी आणि डिजिटलायझेशनमध्ये सुरू असलेल्या सहकार्याचा आणि भविष्यकालीन तंत्रज्ञान, ई-गव्हर्नन्स, सायबर सुरक्षा, स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यासह शिक्षण आणि कौशल्य यांचा समावेश आहे. या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. त्यांनी स्वच्छ ऊर्जा आणि स्मार्ट ऊर्जा व्यवस्थापनात सहकार्याच्या संभाव्यतेवर देखील चर्चा केली.
दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला.
भारत आणि एस्टोनियामधील वाढत्या सांस्कृतिक आणि नागरिक संबंधांबद्दल नेत्यांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रपती करिस यांनी एस्टोनियामधील भारतीय व्यावसायिकांच्या योगदानाचे कौतुक केले. दोन्ही पक्षांनी प्रतिभेची देवाणघेवाण वाढवण्यासाठी आणि पर्यटन सुलभ करण्यासाठी काम करण्याचे मान्य केले.
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2230028)
आगंतुक पटल : 64
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam