आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीखाली प्रत्येकी 2 पदरी ट्विन ट्यूब टीबीएम (Twin Tube TBM - अत्याधुनिक यंत्राद्वारे खोदलेले दोन स्वतंत्र समांतर बोगदे) या पाण्याखालील रस्ते बोगद्याच्या बांधकामाला मंत्रिमंडळाची मंजुरी, एका ट्यूबमध्ये रेल्वे पायाभूत सुविधांची तरतूद, प्रकल्पाची एकूण लांबी 33.7 किमी
Posted On:
14 FEB 2026 12:56PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आसाममधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 15 वरील गोहपूर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 715 वरील नुमालीगड या दरम्यान 4 पदरी प्रवेश नियंत्रित हरित संपर्क जोडणीविषयक बांधकामाला काल मंजुरी दिली आहे. याअंतर्गत ब्रह्मपुत्रा नदीखाली 15.79 किमी लांबीच्या रस्ते आणि रेल्वे बोगद्याचा (Road cum Rail Tunnel) समावेश आहे. हा संपूर्ण प्रकल्प एकूण 18,662 कोटी रुपये भांडवली खर्चासह अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC - Engineering Procurement Construction) तत्त्वावर विकसित केला जाणार आहे.
सध्या, NH-52 वरील सिलघाटजवळील विद्यमान कालियाभंभोरा रस्ते पुलावरून NH-715 वरील नुमालीगड आणि NH-15 वरील गोहपूर यांच्यामधील अंतर 240 किमी इतके आहे. नुमालीगड, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि विश्वनाथ शहरातून कराव्या लागणाऱ्या या प्रवासासाठी सध्या 6 तास लागतात. या आव्हानावर मात करण्यासाठी, ब्रह्मपुत्रा नदीखालून रस्ते आणि रेल्वे बोगद्यासह गोहपूर ते नुमालीगड दरम्यान ही 4-पदरी संपर्क जोडणी उभारण्याचा हा प्रस्ताव आहे. पाण्याखालून जाणारा अशा प्रकारचा हा भारतामधील पहिला आणि जगातील दुसरा रस्ते आणि रेल्वे बोगदा असणार आहे. या प्रकल्पामुळे आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि ईशान्य भारतातील इतर राज्यांना मोठा लाभ होणार आहे. यामुळे मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढेल, व्यावसायिक वाहतुकीसाठीचा खर्च कमी होईल आणि या प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकासालाही गती मिळेल.
हा प्रकल्प दोन मुख्य राष्ट्रीय महामार्गांसह (NH-15 आणि NH-715) आणि दोन रेल्वे मार्गांशी जोडला जाणार आहे. यात गोहपूरच्या बाजूला नॉर्थ फ्रंटीअर रेल्वेअंतर्गतच्या रंगिया विभागांतर्गत रंगिया-मुकोंगसेलेक रेल्वे विभाग आणि नुमालीगडच्या बाजूला तिनसुकिया विभागांतर्गतच्या फुरकाटिंग-मरियानी लूप लाईन विभागाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे आसाममधील महत्त्वाच्या आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक वाहतूक केंद्रांना अविरत संपर्क जोडणी उपलब्ध होणार आहे. यासोबतच या प्रकल्पामुळे 11 आर्थिक केंद्रे, 03 सामाजिक केंद्रे, 02 पर्यटन केंद्रे आणि 08 व्यावसायिक वाहतुकीची केंद्रे परस्परांशी जोडली जाणार आहेत, त्यामुळे बहुआयामी एकात्मिकीकरणाला चालना मिळणार आहे. यासोबतच या प्रकल्पामुळे 04 प्रमुख रेल्वे स्थानके, 02 विमानतळ आणि 2 देशांतर्गत जलमार्गांसोबतचा संपर्क जोडणीही विस्तार आहे. त्यामुळे या प्रदेशासाठी वस्तूमाल आणि प्रवाशांच्या जलद वाहतुकीची सोय उपलब्ध होणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, धोरणात्मक दृष्टीकोन आणि इथल्या प्रादेशिक आर्थिक विकास, मुख्य आर्थिक केंद्रांसोबतच्या संपर्क जोडणीचे बळकटीकरण या बाबतीत या प्रकल्पाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. यामुळे व्यापार तसेच औद्योगिक विकासासाठीच नव्या पर्यायांचे मार्ग प्रशस्त होणार आहेत. या प्रकल्पामुळे अंदाजे 80 लाख मनुष्य दिवसांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारही निर्माण होणार आहे. परिणामी या प्रकल्पाच्या आसपासच्या प्रदेशात विकास आणि समृद्धीची नवी दारे खुली होणार आहेत.
या कॉरिडॉरचा नकाशा :

Project Details
|
Feature
|
Details
|
|
Project Name
|
Construction of Twin Tube TBM road Underwater tunnel 2 Lane each under River Brahmaputra along with provision of Railway infrastructure in one of the tubes, in the state of Assam on EPC Mode with total length of project as 33.7 Km.
|
|
Corridor
|
Gohpur on NH-15 – Numaligarh on NH-715
|
|
Length (km)
|
33.7 Km.
|
|
Total Civil Cost (Rs Cr.)
|
11,982.36 Cr.
|
|
Land Acquisition Cost (Rs Cr.)
|
716.65
|
|
Total Capital Cost (Rs Cr.)
|
18,662.02
|
|
Mode
|
Engineering Procurement Construction (EPC).
|
|
Project Length
|
Instant Project of Length 33.77 Km.
|
|
Twin Tube TBM Tunnel with Railway in one of the tubes
|
15.79 Km.
|
|
Total Road cut & cover
|
1.26 Km.
|
|
Total Rail cut & cover
|
4 Km.
|
|
Major Roads Connected
|
National Highways – NH-15 & NH715
|
|
Rail Line connected
|
Rangia-Mukongselek Railway Section under Rangia Division of NFR on Gohpur Side
Furkating-Mariani loop line section under Tinsukia Division of NFR on Numaligarh side
|
|
Economic / Social / Transport Nodes Connected
|
Airports (02 ) : Dony Paulo Holongi Airport Itanagar and Tezpur Airport
Railway Stations (04) : Numaligarh Railway Station, Gohpur Railway Station, Golaghat Town Railway Station, Simaluguri Junction
Inland Water way Terminals (02): Biswanath Ghat Water way terminal, Tezpur Water way terminal
Economic Nodes (11) : Numaligarh Industrial Area, Jorhat DIC, IIDC Titabor, Industrial Area Junakinagar, Industrial Estate Nagaon, IIDC Demow, Industrial Estate Sivasagar, IIDC Naltali, Industrial Area Dolabari, Mini Industrial Area Biswanath, MMLP Jogighopa.
Social Nodes (03) : 1 Tribal district – Dima Hasao; 02 Aspirations Districts-Udalguri & Darrang
Tourist Nodes (02) : Kaziranga National Park & Deopahar Archaeological Site
|
|
Major Cities / Towns Connected
|
Numaligarh, Tezpur, Gohpur Dibrugarh in Assam & Itanagar In Arunachal Pradesh
|
|
Employment Generation Potential
|
80 Lakhs Man-Days of Direct & In-direct
|
|
Annual Average Daily Traffic (AADT) in FY-25
|
Estimated at 4680 Passenger Car Units (PCU)
|
***
शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2228269)
अभ्यागत कक्ष : 7