पंतप्रधान कार्यालय
जागतिक रेडिओ दिन हा लोकांसाठी एका विश्वासार्ह आवाजाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे: पंतप्रधान
यानिमित्ताने 22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या महिन्यातील 'मन की बात'साठी पंतप्रधानांनी मागवल्या सूचना
प्रविष्टि तिथि:
13 FEB 2026 12:08PM by PIB Mumbai
जागतिक रेडिओ दिन म्हणजे अशा एका माध्यमाचा उत्सव साजरा करणे आहे जे लोकांसाठी एक विश्वासार्ह आवाज आहे, मग ते दुर्गम गाव असो किंवा गजबजलेले शहर,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे रेडिओने वर्षानुवर्षे वेळेवर माहिती दिली आहे, प्रतिभेला चालना दिली आहे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले आहे,असे मोदी यांनी पुढे नमूद केले.
“मन की बातच्या माध्यमातून, लोकांमधील सामाजिक ताकद जाणून घेण्याची रेडिओची क्षमता मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. या महिन्याचा कार्यक्रम रविवार, 22 फेब्रुवारी रोजी होईल. या कार्यक्रमासाठी आपली मते मला नक्की कळवा", असे आवाहन मोदी यांनी केले आहे .
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे :
"जागतिक रेडिओ दिन म्हणजे अशा एका माध्यमाचा उत्सव साजरा करणे आहे जे लोकांसाठी एक विश्वासार्ह आवाज आहे, मग ते दुर्गम गाव असो किंवा गजबजलेले शहर! वर्षानुवर्षे, रेडिओने वेळेवर माहिती दिली आहे, प्रतिभेला चालना दिली आहे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले आहे. या माध्यमाशी संबंधित सर्वांच्या प्रयत्नांना मान्यता देण्याचा हा दिवस आहे.”
मन की बात द्वारे, मी लोकांमधील सामाजिक ताकद जाणून घेण्याची रेडिओची क्षमता मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. या महिन्यात हा कार्यक्रम रविवार, 22 फेब्रुवारी रोजी होईल. कार्यक्रमासाठी आपल्या सूचना सामायिक करा."
https://mygov.in/group-issue/inviting-ideas-mann-ki-baat-prime-minister-narendra-modi-22nd-february-2026/?target=inapp&type=group_issue&nid=366266
***
नेहा कुलकर्णी / संपदा पाटगावकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2227598)
आगंतुक पटल : 52
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
हिन्दी
,
English
,
Urdu
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam