पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 28 जानेवारीला करिअप्पा मैदानावर एनसीसी पीएम रॅलीला करणार संबोधित
'राष्ट्र प्रथम : कर्तव्यनिष्ठ युवा' - रॅलीची मध्यवर्ती संकल्पना
प्रविष्टि तिथि:
27 JAN 2026 7:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2026
28 जानेवारी 2026 ला दुपारी साडेतीनच्या सुमारास दिल्लीत करिअप्पा संचलन मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, वार्षिक एनसीसी पीएम रॅलीला संबोधित करणार आहेत.
'राष्ट्र प्रथम - कर्तव्यनिष्ठ युवा' अशी यावर्षीच्या रॅलीची मध्यवर्ती संकल्पना असून त्यामध्ये, भारताच्या तरुणाईतील कर्तव्य, शिस्त आणि राष्ट्राप्रति वचनबद्धता या भावनांचे प्रतिबिंब दिसते.
महिनाभर चाललेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिर-2026 चा भव्य समारोप या एनसीसी पीएम रॅलीने होणार आहे. या शिबिरात देशभरातून 2406 छात्रांनी भाग घेतला असून यात 898 कन्या छात्रांचा समावेश आहे. या रॅलीमध्ये 21 देशांतील 207 युवा आणि अधिकाऱ्यांचाही सहभाग असेल.
यावेळी एनसीसीचे छात्र, राष्ट्रीय रंगशाळेचे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे सदस्य, जल्लोषपूर्ण असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. राष्ट्राच्या उभारणीत, समाजाच्या सेवेत आणि चरित्र्यनिर्माणातली त्यांची भूमिका या कार्यक्रमातून प्रस्तुत होणार आहे.
* * *
निलिमा चितळे/जाई वैशंपायन/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2219326)
आगंतुक पटल : 7