पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त पंतप्रधानांनी बालिकांना सन्मान, संधी आणि त्यांच्या सक्षमीकरणाविषयी आपली वचनबद्धता केली पुन्हा अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
24 JAN 2026 7:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली - दि.24 जानेवारी, 26.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रत्येक बालिकेला सन्मान, संधी मिळावी आणि त्यांच्या जीवनात आशा निर्माण होऊन, त्याप्रमाणे जीवन जगता यावे यासाठी सरकारच्या अतूट संकल्पाचा पुनरुच्चार केला.
राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, गेल्या दहा वर्षांत बालिकांचे शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्यसेवेमध्ये सुधारणा करण्यावर निरंतर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यांनी नमूद केले की, या प्रयत्नांमुळे असे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे बालिका प्रगती करू शकतात.
पंतप्रधानांनी 'एक्स' या समाज माध्यमावर लिहिले;
“राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त, आम्ही बालिकांना सन्मान, संधी आणि आशेचे जीवन जगता यावे, यासाठी आमच्या अतूट संकल्पाचा पुनरुच्चार करतो. गेल्या दहा वर्षांत, आम्ही बालिकांचे चांगले शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे बालिकांना प्रगती करता येत आहे आणि विकसित भारतासाठी त्या प्रभावीपणे योगदान देऊ शकतील असे वातावरण सुनिश्चित झाले आहे. ‘’
***
शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2218341)
आगंतुक पटल : 52
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam