गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी ‘राष्ट्रीय बालिका दिना’निमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
24 JAN 2026 11:06AM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी ‘राष्ट्रीय बालिका दिना’निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स या समाज माध्यमावर सामायिक केलेल्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले,
“‘राष्ट्रीय बालिका दिना’निमित्त सर्वांना शुभेच्छा. राष्ट्रीय बालिका दिन हा यासाठी साजरा केला जातो की मुली फक्त आपली जबाबदारी नाहीत, तर त्या आपली खरी ताकद आहेत. राणी लक्ष्मीबाई, राणी वेलू नचियार, मुळा गाभरू आणि प्रितिलता वड्डेदार यांसारख्या महान महिलांची उदाहरणं प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान आणि प्रेरणा निर्माण करतात. मोदी सरकारचा ‘महिला नेतृत्वाखालील विकास’ हा मंत्र नारी शक्तीला विकासाच्या केंद्रस्थानी आणतो आहे आणि आज महिला देशाच्या प्रगतीचं नेतृत्व करत आहेत.”
***
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2218220)
आगंतुक पटल : 6