पंतप्रधान कार्यालय
मोहनलाल मित्तल जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
16 JAN 2026 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जानेवारी 2026
उद्योजक मोहनलाल मित्तल जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला.
एक्सवरील संदेशात मोदी म्हणाले:
“मोहनलाल मित्तल जी यांनी उद्योगजगतामध्ये स्वतःला सिद्ध करत वेगळा ठसा उमटवला आहे. त्याच वेळी भारतीय संस्कृतीबद्दलच्या त्यांच्या भावना अत्यंत उत्कट होत्या. त्यांनी विविध परोपकारी प्रयत्नांना पाठिंबा दिला. त्यातून समाजाच्या प्रगतीबद्दलची त्यांची आस्था दिसून येते. त्यांच्या निधनाने मला वेदना झाल्या आहेत. आमच्यात झालेल्या विविध संवादांच्या स्मृतींना मी उजाळा देईन. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रति माझ्या संवेदना मी व्यक्त करतो. ॐ शांती.”
शैलेश पाटील/प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2215475)
आगंतुक पटल : 8