पंतप्रधान कार्यालय
2047पर्यंत विकसित भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातील जेन-झी आपली ऊर्जा कशी योग्य दिशेने वापरत आहे यावरील लेख पंतप्रधानांनी केला सामाईक
प्रविष्टि तिथि:
12 JAN 2026 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी लिहिलेला एक लेख समाज माध्यमावर सामाईक केला असून या लेखात देशातील जेन-झी 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी आपली ऊर्जा कशी सकारात्मक दिशेने प्रवाहित करीत आहे, याचे वर्णन आहे. “स्वच्छ भारत, हर घर तिरंगा, मेरी माटी मेरा देश आणि नशा मुक्त भारत यांसारख्या प्रमुख मोहिमांना भारतीय युवांनी आपल्या नेतृत्वाने आकार दिला आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.
केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या X वरील संदेशावर प्रतिक्रिया देताना मोदी म्हणाले,
“संपूर्ण भारत एकत्रितपणे 2047 पर्यंत विकसित भारत साकारण्यासाठी प्रयत्नशील असताना, केंद्रीय मंत्री @kishanreddybjp यांनी देशातील जेन-झी विषयी लिहिले आहे, जिने आपली ऊर्जा समाजासाठी हितकारक शक्ती म्हणून वळविली आहे.
ते यामध्ये अधोरेखित करतात की स्वच्छ भारत, हर घर तिरंगा, मेरी माटी मेरा देश आणि नशा मुक्त भारत यांसारख्या प्रमुख मोहिमांना आपल्या नेतृत्वाद्वारे भारतीय युवकांनी आकार दिला आहे.”
निलीमा चितळे/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213892)
आगंतुक पटल : 28
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Tamil
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada