गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली
राजमाता जिजाबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प रुजविला आणि राष्ट्राच्या संरक्षणाच्या महान ध्येयाकडे त्यांना प्रेरित केले
राजमाता जिजाबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये बालवयापासूनच धैर्य, स्वाभिमान आणि आपल्या संस्कृतीच्या संरक्षणाचे मूल्य रुजविले
प्रविष्टि तिथि:
12 JAN 2026 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2026
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली आणि सांगितले की जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प रुजविला आणि राष्ट्राच्या रक्षणाच्या महान ध्येयाकडे त्यांना प्रेरित केले.
आपल्या ‘एक्स’वरील संदेशात अमित शाह यांनी म्हटले आहे,
“बालपणापासूनच राजमाता जिजाबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या बालवयापासूनच धैर्य, स्वाभिमान आणि आपल्या संस्कृतीच्या संरक्षणाची मूल्ये रुजविली. त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प जागृत केला आणि राष्ट्राच्या रक्षणाच्या महान ध्येयाकडे त्यांना प्रेरित केले. राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासमोर श्रद्धेने नतमस्तक होतो.”
नेहा कुलकर्णी/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213748)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam