रेल्वे मंत्रालय
रेल्वे मंत्रालय : वर्षअखेर आढावा 2025
भविष्यासाठी सज्ज नेटवर्क : भारतीय रेल्वेची 2025 मधील कामगिरी, 2026 साठीची पायाभरणी
नवोन्मेष, स्वदेशीकरण, मार्ग नूतनीकरण तसेच विमानतळासारख्या सुविधा असलेली पुनर्विकसित स्थानके भारतीय रेल्वे प्रवासाचा अनुभव नव्याने परिभाषित करीत आहेत
स्थानिक खाद्यपदार्थ आणि स्वच्छता यामुळे रेल्वे प्रवास संस्मरणीय
रुळांच्या नुतनीकरणामुळे गाड्यांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी
‘कवच’, सुरक्षिततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व लोको पायलटसाठी सतर्कता प्रणालींमुळे गंभीर रेल्वे अपघात ऐतिहासिक नीचांकी पातळीवर
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच कार्यान्वित होण्यास सज्ज; नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमुळे प्रवाशांची गतिशीलता वाढणार
सामान्य प्रवाशांसाठी आरामदायी प्रवासाचा विस्तार. 2025 मध्ये देशभरात 13 नवीन अमृत भारत गाड्यांची सुरुवात, एकूण संख्या 30 वर
नियमित सेवांव्यतिरिक्त 2025 मध्ये रेल्वेकडून प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीसाठी 43,000 पेक्षा जास्त विशेष गाड्यांच्या, तर महाकुंभसाठी 17,000 पेक्षा जास्त गाड्यांच्या फेऱ्या
आधुनिक शौचालये, लिफ्ट्स/एस्कलेटर, फूड कोर्ट्स आणि आधुनिक प्रतीक्षालये यांसारख्या सुविधांमुळे 155 स्थानके पूर्णपणे आधुनिक, उर्वरित 1182 अमृत भारत स्थानकांचे आधुनिकीकरण सुरू
सर्व हवामानात प्रादेशिक जोडणी मजबूत करण्यासाठी प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या काश्मीर आणि मिझोरामपर्यंत पोहोचल्यामुळे दुर्गम भागातील लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण होत आहेत
नवीन पांबन पुलामुळे यात्रेला आणि पर्यटनाला चालना मिळून प्रादेशिक जोडणी अधिक मजबूत, भविष्यात भारत–श्रीलंका वाहतुकीसाठी मार्ग खुले
2025 मध्ये 25,000 कोटींपेक्षा जास्त किमतीचे 42 प्रकल्प राष्ट्राला समर्पित
2029-30 पर्यंत 3,000 मेट्रिक टन वार्षिक मालवाहतूक उद्दिष्टाकडे वाटचाल केल्याने भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मालवाहतूक देश
गती शक्ती कार्गो टर्मिनल्स आणि विक्रमी प्रमाणात तयार झालेल्या वॅगन्समुळे मालवाहतुकीच्या वाढीला गती; विशेष मालवाहतूक मार्गावर (डीएफसी) दररोज 400 पेक्षा जास्त गाड्यांचे संचालन
आत्मनिर्भर भारताला स्वदेशी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह्सकडून बळ, देशांतर्गत तसेच जागतिक मागणी पूर्ण
प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वेगवान रेल्वे मार्गावरील कामे जलद गतीने पूर्ण
प्रविष्टि तिथि:
28 DEC 2025 3:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2025
लक्ष केंद्रीत प्रयत्न, नवनवीन कल्पना आणि स्वदेशीकरणाच्या जोरावर भारतीय रेल्वेचे जागतिक दर्जाच्या नेटवर्कमध्ये रूपांतर होत आहे. सामान्य नागरिकाला केंद्रस्थानी ठेवून, भारतीय रेल्वेने या वर्षात जागतिक दर्जाचे रेल्वे जाळे उभारण्याच्या आपल्या दृष्टीकोनाच्या दिशेने लक्षणीय प्रगती साधली आहे. २०२५ हे वर्ष संपत असताना, भारतीय रेल्वे नवीन वर्ष २०२६ मध्ये रेल्वे प्रवासाचा अनुभव अधिकाधिक आरामदायी व संस्मरणीय करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यास सज्ज आहे.
अमृत भारत गाड्यांद्वारे गैर-एसी प्रवाशांसाठी आरामदायी प्रवासाची सुविधा विस्तारल्यानंतर, भारतीय रेल्वे लवकरच एसी वर्ग प्रवाशांसाठी पहिली वंदे भारत स्लीपर गाडी कार्यान्वित करण्याच्या तयारीत आहे. हा दीर्घकाळ प्रतीक्षित, जनकेंद्रित उपक्रम लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाला नवे स्वरूप देणार असून, प्रथम व्यस्त मार्गांवर आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवर प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करण्यास मदत करेल.
देशभरातील नव्याने विकसित केलेल्या स्थानकांवर प्रवाशांना मोठी आणि आधुनिक प्रवेशद्वारे, सुधारित स्वच्छतागृहे, एस्कलेटर, लिफ्ट, फूड कोर्ट्स आणि अत्याधुनिक प्रतीक्षागृहे अशा विमानतळासारख्या सुविधा यांचा समवेश आहे.
भारतीय रेल्वेने आपल्या केटरिंग सेवेत मोठे बदल घडवून आणले आहेत. आता विविध गाड्यांमध्ये प्रवाशांना स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. यामुळे प्रवासातील जेवण अधिक चविष्ट आणि स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तम असणार आहे. प्रवाशांचा अनुभव समृद्ध करण्याबरोबरच मालवाहतुकीतही अग्रगण्य होण्याचा प्रयत्न रेल्वे करत आहे.
गती शक्ती कार्गो टर्मिनल्स, नवे वॅगन्स मोठ्या प्रमाणात तयार होणे आणि मालवाहतुकीसाठी खास मार्गांवर जास्त गाड्या धावणे या सगळ्या गोष्टी भारताच्या प्रगतीची कहाणी सांगतात. यामुळे भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मालवाहतूक करणारा देश बनत आहे आणि अमेरिकेला मागे टाकत आहे.
नव्याने विकसित स्थानके, आधुनिक गाड्या आणि सुधारित सुरक्षा प्रणाली आता आपल्या रेल्वे प्रवासाचा भाग बनत आहेत, हे आपण सर्वजण पाहात आहोत. प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर होत आहे, तसेच व्यापारी, वाहतूकदार आणि उद्योगांना व्यवसाय करणे अधिक सोपे होत आहे.
भारतीय रेल्वे आधुनिक पायाभूत सुविधा आणि जोडणी यावर भर देत राष्ट्रीय प्रगतीला गती देत आहे. प्रवाशांना उत्तम प्रवासाचा अनुभव, कार्यक्षम मालवाहतूक सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञान देत रेल्वे देशाच्या विकासात सिंहाचा वाटा उचलत आहे. टिकाऊपणाला प्राधान्य देत आणि नवकल्पनांनी प्रेरित होत रेल्वे पर्यावरणपूरक व हरित कार्यपद्धतीकडे वाटचाल करत आहे. पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होत आहे. क्षमता वाढल्याने देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळत आहे.
या वर्षीचे प्रयत्न भारतीय रेल्वेची लोकांसाठी जागतिक दर्जाचे वाहतूक जाळे तयार करण्याची वचनबद्धता दाखवतात. त्यामुळे परंपरा आणि नवकल्पना यांचा समतोल साधला जाऊन वेगाने विकसित होणाऱ्या भारताच्या गरजा पूर्ण होत आहेत.
2025 वर्षाने सुरक्षित, जलद आणि आरामदायी रेल्वे प्रवासाचा मजबूत पाया घातला आहे. आता नवीन वर्षात वंदे भारत आणि अमृत भारत गाड्यांमधून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी स्लीपर प्रवास उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर ब्रँडेड खाद्यपदार्थ व पेयांच्या सुविधा मिळतील.
वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास आता परवडणाऱ्या खर्चात
वंदे भारत रेल्वे :
- 26 डिसेंबर, 2025 पर्यंत एकूण 164 वंदे भारत गाड्या धावत आहेत.
- 2025 मध्ये 15 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या.
- 2026 मध्ये सुरू होणारी वंदे भारत स्लीपर गाडी रात्रीचा प्रवास बदलून टाकणार आहे. यात वेग, आराम आणि आधुनिक सुविधा एकत्र येऊन लांब पल्ल्याच्या प्रवाशांना नवा अनुभव मिळणार आहे.
अमृत भारत रेल्वे :
- अमृत भारत गाड्या या पूर्णपणे बिगर वातानुकूलित आहेत. सध्या यात 12 स्लीपर वर्ग डबे आणि 8 जनरल वर्ग डबे आहेत, ज्यामुळे प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळते.
- 2025 मध्ये 13 अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्या असून सध्या एकूण 30 अमृत भारत गाड्या सेवेत आहेत.
नमो भारत जलद रेल्वे:
- नमो भारत जलद रेल्वे गाड्या वारंवार धावण्यासाठी आणि प्रादेशिक जोडणी मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जास्त मागणी असलेल्या मार्गांवर अल्प आणि मध्यम अंतराचा प्रवास अधिक सोपा झाला आहे.
- देशात सध्या भुज–अहमदाबाद आणि जयनगर–पाटणा दरम्यान 2 नमो भारत जलद रेल्वे सेवा सुरू आहे.
विशेष गाड्या
2025 मध्ये हंगामी गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांची सेवा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली. यामुळे नियोजन अधिक चांगले झाले आणि प्रवाशांच्या सोयीवर विशेष भर दिला गेला.
याशिवाय, वेगवान आणि आरामदायी गाड्या तसेच आधुनिक रेल्वे स्थानकांसोबतच खालील कामांवरही लक्ष दिले जात आहे : ट्रॅकचे नूतनीकरण, विभागीय वेग वाढवणे, आधुनिक ट्रॅक मशीन बसवणे व सुधारणा करणे, पुलांचे बळकटीकरण, लेव्हल क्रॉसिंग हटवून सुरक्षा वाढवणे, रेल्वे जमिनीचे योग्य व्यवस्थापन व संरक्षण.
रेल्वे मार्ग पायाभूत सुविधा सुधारणा
नवीन मार्ग सुरू करणे
1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान भारतीय रेल्वेने 900 किलोमीटरपेक्षा जास्त नवीन मार्ग सुरू केले. नवीन मार्गांबरोबरच विद्यमान मार्गांचे नूतनीकरण करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी झाला.
रेल्वे रुळांचे नूतनीकरण कामे
(a) 6880 किलोमीटर रेल्वे मार्गावर नवीन रुळ बसवून नूतनीकरण करण्यात आले.
(b) 7051 किलोमीटर मार्गाचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आले.
(c) 9277 सेट्सचे टर्नआउट नूतनीकरण करण्यात आले.
2014–25 कालावधीतील रेल्वे मार्ग विकास
या कालावधीत भारतीय रेल्वेने एकूण 34,428 किमी नवीन रूळ बांधले.
दररोज सरासरी 8.57 किमी मार्गावर रूळ घालण्यात आले. 2009–14 मधील सरासरी (4.2 किमी/दिवस) पेक्षा हे दुप्पट आहे.
ट्रॅक यंत्रसामग्रीचे आधुनिकीकरण
रेल्वेने ट्रॅक विस्तार आणि देखभाल यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर सुरू केला आहे.
एक HOT-3X टॅम्पिंग मशीन अपग्रेड करून HOT-S-3X (3X-Dynamic) करण्यात आले आहे.
यात तीन स्लीपर बॅलास्ट पॅकिंग आणि ट्रॅक एकत्र केले आहे.
या एकत्रीकरणामुळे ट्रॅफिक ब्लॉकचा अधिक चांगला वापर होतो आणि मनुष्यबळाची गरज कमी होते.
2025 मधील कामगिरी (नोव्हेंबरपर्यंत)
यावर्षी 61 नवीन ट्रॅक मशीन समाविष्ट करण्यात आल्या.
पुढे आणखी अद्ययावत करून ट्रॅक देखभाल अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह करण्याची योजना आहे.
विभागीय वेग वाढवणे
रेल्वेच्या आधुनिकीकरण प्रयत्नांमध्ये विभागीय वेग वाढवणे हा महत्त्वाचा भाग आहे. रेल्वे मार्ग सुधारल्यामुळे गाड्या नीट आणि वेळेत धावतात, त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना कमी त्रास होतो आणि त्यांचा अनुभव अधिक सुखद होतो.
599 किलोमीटर मार्गावर वेग 130 किमी/तास करण्यात आला आहे. यात सुवर्ण चौकोन (Golden Quadrilateral), सुवर्ण तिरकस मार्ग (Golden Diagonal) आणि इतर B मार्गांचा समावेश आहे. 4,069 किलोमीटर मार्गावर वेग 110 किमी/तास करण्यात आला आहे.
हे यश पायाभूत सुविधा सुधारणा आणि आधुनिक ट्रॅक यंत्रसामग्रीच्या वापरामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम झाला आहे.
विद्युतीकरण
भारतीय रेल्वेने विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. आतापर्यंत ब्रॉडगेज नेटवर्कपैकी 99.2% विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित नेटवर्कचे विद्युतीकरण सुरू आहे. हे यश इंग्लंड (39%), रशिया (52%) आणि चीन (82%) यांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. एकूण 14 रेल्वे विभाग आणि 25 राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांनी 100% विद्युतीकरण साध्य केले आहे.
आरओबी / आरयुबी बांधकाम (आरओबी म्हणजे रेल्वे रुळांच्या वरून जाणारा रस्ता. आरयुबी म्हणजे रेल्वे रुळाखालून जाणारा रस्ता)
2025 मध्ये भारतीय रेल्वेने 1161 आरओबी आणि आरयुबी पूर्ण केले. त्यामुळे सुरक्षितता वाढली आणि वाहतूक अधिक प्रवाही झाली. आरओबी आणि आरयुबी यांना मंजुरी देणे व बांधकाम हे रेल्वेत सतत सुरू असलेले काम आहे. मागील 11 वर्षांत बांधकामाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून 13,600 पेक्षा जास्त पूल पूर्ण झाले आहेत. हे 2004–2014 दरम्यान बांधलेल्या 4148 पुलांपेक्षा ही संख्या तीन पट जास्त आहे.
लेव्हल क्रॉसिंग हटवणे
सुरक्षिततेसाठी मानवी नियंत्रणाखालील लेव्हल क्रॉसिंग (एमएलसी) हटवण्याचे काम सुरू आहे. 2025–26 (नोव्हेंबरपर्यंत) 268 एमएलसी हटवले गेले आहेत.
पुलांची दुरुस्ती व बळकटीकरण
रेल्वे पुलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी दुरुस्ती व मजबुतीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. याच कालावधीत 1,799 पुलांची दुरुस्ती किंवा सुधारणा करण्यात आली आहे.
एलएचबी डबे निर्मिती आणि आधुनिकीकरण
एलएचबी डबे म्हणजे लिंके-हॉफमन-बुश या जर्मन कंपनीच्या डिझाइनवर आधारित आधुनिक रेल्वे डबे. हे डबे भारतीय रेल्वेने जुन्या आयसीएफ डब्यांच्या जागी आणले असून ते अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान प्रवासासाठी ओळखले जातात.
2025-26 आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत भारतीय रेल्वेने 4,224 पेक्षा जास्त एलएचबी डबे तयार केले असून हे मागील वर्षाच्या तुलनेत 18 टक्के अधिक आहे. 2014 ते 2025 या कालावधीत एलएचबी डबे निर्मितीमध्ये प्रचंड वाढ झाली असून ती 2004 ते 2014 च्या तुलनेत 18 पट आहे. भारतीय रेल्वेने मागील 11 वर्षांत 42,600 पेक्षा जास्त एलएचबी डबे तयार करून आधुनिकीकरणात मोठी झेप घेतली आहे. हे डबे उच्च दर्जाच्या सुरक्षिततेसाठी, कमी देखभाल खर्चासाठी आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात. भविष्यातील वाढत्या मागणीसाठी उत्पादन आणखी वाढवले जात आहे. देशांतर्गत उत्पादनाद्वारे भारतीय रेल्वे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांना बळकट करत आहे.
उत्पादन तपशील :
• आयसीएफ चेन्नई : 1,659 डबे
• एमसीएफ रायबरेली : 1,234 डबे
• आरसीएफ कपूरथला : 1,331 डबे
महत्त्वपूर्ण प्रकल्प
देशभरात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण झाले किंवा उद्घाटन झाले. हे प्रकल्प रेल्वेच्या प्रगतीचे द्योतक आहेत. विशेष म्हणजे भारताने पांबन येथे पहिला व्हर्टिकल- लिफ्ट रेल्वे पूल सुरू केला. या पुलाने काश्मीरला सर्व हवामानात चालणाऱ्या रेल्वे मार्गांनी जोडले. त्यात जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचा समावेश आहे. ईशान्य भारतात रेल्वेचा विस्तार करण्यात आला आहे. बैराबी–सैरांग हा नवीन रेल्वे मार्ग मिझोरम राज्यात बांधण्यात आला असून त्यामुळे त्या भागात प्रथमच रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. याच वेळी रेल्वेने आधुनिक गाड्यांची सेवा (वंदे भारत, अमृत भारत, नमो भारत) विस्तारली आणि स्थानकांचा तसेच मालवाहतूक मार्गांचा जोरदार पुनर्विकास झाला. यामुळे आर्थिक वाढ आणि शाश्वततेला चालना मिळाली आहे.
सर्व हवामानात रेल्वे जोडणी : युएसबीआरएल आणि काश्मीर पूल
उधमपूर–श्रीनगर–बारामुल्ला रेल लिंक (युएसबीआरएल) हा 272 किलोमीटर लांबीचा हिमालयातून जाणारा प्रकल्प 2025 मध्ये पूर्ण झाला. यात 36 मोठे बोगदे आणि 943 पूल आहेत. हा जगातील सर्वात कठीण भूभागांपैकी एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. या प्रकल्पात काही महत्त्वाचे पूल आणि बोगदे आहेत — जगातील सर्वात उंच रेल्वे कमानीचा पूल छेनाब (1,315 मीटर लांबीचा स्टील आर्च, 359 मीटर उंचीवर), भारताचा केबल स्टेड रेल्वे पूल अंजी (डेक 331 मीटर उंचीवर) आणि भारतातील सर्वात लांब चालू असलेला रेल्वे बोगदा T-50.
हे तीन अभियांत्रिकी प्रकल्प काश्मीरमध्ये सर्व हवामानात चालणारे रेल्वे मार्ग तयार करतात. त्यामुळे प्रवासाचा वेळ काही तासांनी कमी होतो. हे पूल आणि बोगदे आधुनिक सुरक्षितता आणि पर्यावरणीय उपायांसह बांधले गेले आहेत. त्यामुळे भारताची दुर्गम भूभागावर मात करून अखंड जोडणी निर्माण करण्याची क्षमता दिसते. या प्रकल्पामुळे 95 पेक्षा जास्त गावांना रेल्वे जोडणी मिळाली आहे. त्यामुळे रोजगार, पर्यटन, शिक्षण तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे.
नॉर्थ ईस्ट रेल्वे दुवा: बैराबी–सैरांग मार्ग
मिझोरममधील 51 किमी लांबीच्या बैराबी–सैरांग ब्रॉड-गेज मार्गाचे उद्घाटन सप्टेंबर 2025 मध्ये झाले, ज्यामुळे आयझॉल प्रथमच भारताच्या रेल्वे नकाशावर आले. दूर्गम आणि डोंगराळ भागातून जाणाऱ्या या मार्गावर 45 बोगदे, 55 मोठे पूल आणि 88 लहान पूल आहेत. उद्घाटनाच्या दिवशी पंतप्रधानांनी या मार्गावर तीन नवीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला – ज्यात सैरांग–दिल्ली राजधानी एक्सप्रेसचा समावेश आहे – ज्यामुळे मिझोरम थेट दिल्ली, गुवाहाटी आणि कोलकाता या शहरांशी जोडले गेले. या धोरणात्मक प्रकल्पामुळे ईशान्य भारतातील प्रवास आणि व्यापारात परिवर्तन होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ईशान्य भारतासाठी बाजारपेठा, शिक्षण आणि आरोग्यसेवेची उपलब्धता सुधारेल.
धोरणात्मक सागरी दुवा: नवीन पंबन पूल
6 एप्रिल 2025 रोजी उद्घाटन झालेला नवीन पंबन पूल हा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट प्रकारचा रेल्वे सागरी पूल आहे. एकूण 2.08 किलोमीटर लांबीचा हा नवीन पंबन पूल रामेश्वरमला भारतीय मुख्य भूमीशी जोडतो. पाल्क सामुद्रधुनीवर 2.08 किमी पसरलेला हा पूल 110 वर्षे जुन्या कॅन्टिलिव्हर पुलाची जागा घेतो. या नव्या पूलात वारसा आणि आधुनिक रचनेचा सुरेख संगम साधला आहे. पूलाच्या मध्यभागाचा 72.5 मीटरचा भाग 17 मीटरपर्यंत उचलला जाऊ शकतो, ज्यामुळे जहाजांना जाण्यासाठी मार्ग मिळतो. या पुलाचा डेक जुन्या पुलापेक्षा 3 मीटर उंच आहे. स्टेनलेस-स्टील मजबुतीकरण, विशेष गंज-प्रतिरोधक लेप आणि 100 हून अधिक वर्षांच्या डिझाइन आयुष्य यासह बांधलेला हा पूल रामेश्वरमसाठी महत्त्वाचा रेल्वे दुवा पुनर्संचयित करतो आणि प्रादेशिक संपर्क प्रणालीला चालना देतो. हा पूल पूर्ण झाल्यामुळे केवळ तीर्थयात्रा आणि पर्यटनालाच नव्हे, तर पाल्क सामुद्रधुनीमार्गे भविष्यातील भारत-श्रीलंका वाहतूक दुव्यांच्या शक्यतांनाही चालना मिळते.
मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प
मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प: भारत सरकारने डिसेंबर 2015 मध्ये 508 किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, जो जपान सरकारच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्याने कार्यान्वित होत आहे. 2025-26 या कालावधीसाठी या प्रकल्पाची प्रगती खालीलप्रमाणे आहे:-
- भौतिक प्रगती: 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत एकूण 55.63% भौतिक प्रगती साधण्यात आली आहे.
- आर्थिक प्रगती: 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ₹ 85,801/- कोटी रुपयांच्या खर्चासह एकूण 69.62% आर्थिक प्रगती साधण्यात आली आहे.
- महत्त्वाचे स्थापत्य अभियांत्रिकी निकष: 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत एकूण 412 किमी पायाभरणी, 405 किमी खांब, 344 किमी गर्डर कास्टिंग आणि 330 किमी गर्डर लॉन्चिंगचे काम पूर्ण झाले आहे.
2025 मधील प्रकल्पांचे समर्पण/उद्घाटन झालेले प्रकल्प (आजपर्यंत)
आर्थिक वर्ष 2025 -26 मध्ये धोरणात्मक मंजुरींचे प्रत्यक्ष मालमत्तांमध्ये रूपांतर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 42 प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले, 13 प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि 21 प्रकल्पांची पायाभरणी केली, ज्यांचे एकत्रित मूल्य 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
चालू वर्षात, खालील प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत:
- विजापूर–अंबलियासन गेज रूपांतरण
- डोमिनगड–गोरखपूर–गोरखपूर कँट.–कुसुम्ही – तिसरी रनिंग लाईन आणि गोरखपूर–नकाहा जंगल दुपदरीकरण
- बहराइच–नानपारा–नेपाळगंज गेज रूपांतरण
- वाहतूक सुधारण्यासाठी पीईएम–केआयके एनएलला थेट जोडणी देण्यासाठी कराईकल बंदराच्या उत्तर टोकाला संपर्क प्रणालीची तरतूद
- काझीपेठ–बल्लारशाह मुख्य मार्गाला पेद्दापल्ली–करीमनगर मार्गाशी जोडण्यासाठी पेद्दापल्ली येथे बायपास लाईन
- हिम्मतनगर–खेडब्रह्मा गेज रूपांतरण
- छपरा जंक्शन ते छपरा कचहरी (3.0 किमी) दरम्यान तिसऱ्या मार्गाची जोडणी
- अररिया–गलगालिया (ठाकूरगंज) नवीन मार्ग
- सोमनाथ स्थानकात अतिरिक्त मार्ग टाकण्याची तरतूद (2.5 किमी)
- भैराबी–सैरांग नवीन मार्ग
- तोरी–शिवपूर तिसरा मार्ग
- चुरू–रतनगड दुपदरीकरण
- देवबंद (मुझफ्फरनगर)–रुडकी नवीन मार्ग
- यमुना पूल–आग्रा किल्ला – यमुना नदीवर प्रमुख पुलासह दुपदरी मार्ग
- पुणे–मिरज–लोंडा दुपदरीकरण
- मनमाड–जळगाव तिसरा मार्ग
सुरक्षितता
भारतीय रेल्वेने सुरक्षिततेच्या कामगिरीत उल्लेखनीय प्रगती केली आहे. 2004-14 या कालावधीत गंभीर रेल्वे अपघातांची संख्या 1711 होती (सरासरी 171 प्रति वर्ष) होती, जी 2024-25 मध्ये 31 पर्यंत तर 2025-26 मध्ये (नोव्हेंबर, 2025 पर्यंत) आणखी कमी होऊन 11 वर आली आहे. सुरक्षा अर्थसंकल्प जवळपास तिप्पट झाला असून, तो 2013-14 या आर्थिक वर्षातील 39,463 कोटींवरून चालू आर्थिक वर्षात 1,16,470 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. धुक्यापासून संरक्षणासाठीच्या उपकरणांची संख्या 2014 मधील 90 वरून 2025 मध्ये 25,939 पर्यंत वाढली आहे. केवळ गेल्या चार महिन्यांतच, 21 स्थानकांवर केंद्रीकृत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि ट्रॅक सर्किटिंगचे काम पूर्ण झाले आहे.
‘कवच’ ही स्वदेशी बनावटीची स्वयंचलित ट्रेन संरक्षण (एटीपी) प्रणाली आहे, जी मानवी चुकीच्या प्रसंगी आपोआप ब्रेक लावून लोको पायलटला निर्धारित वेगमर्यादेत गाड्या चालवण्यास मदत करते तसेच प्रतिकूल आणि खराब हवामानाच्या परिस्थितीतही सुरक्षितपणे गाड्या चालवणे शक्य करते. या दिशेने, ‘कवच’ आवृत्ती 4.0 ही 738 मार्ग किलोमीटरवर कार्यान्वित करण्यात आली आहे. ‘कवच 4.0’ मधील प्रमुख सुधारणांमध्ये अधिक अचूक लोकेशन, मोठ्या यार्डमधील सिग्नलच्या स्थितीची सुधारित माहिती, ऑप्टिकल फायबर केबलद्वारे स्टेशन-टू-स्टेशन कवच इंटरफेस आणि विद्यमान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालींशी थेट इंटरफेस यांचा समावेश आहे. या तांत्रिक सुधारणांमुळे, ‘कवच - 4.0’ भारतीय रेल्वे नेटवर्कवर मोठ्या प्रमाणावर तैनात करण्याची योजना आहे.
या सुरक्षा उपायांना पूरक म्हणून, भारतीय रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये पाळत ठेवण्याच्या पायाभूत सुविधांनाही बळकट करत आहे. स्थानकांवर आणि डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी 1731 स्थानकांवर आणि 11,953 डब्यांमध्ये सीसीटीव्ही निगराणी प्रणाली पुरवण्यात आली आहे. या सीसीटीव्ही निगराणी प्रणाली भांडवली खर्चातून केले जात असून सुरक्षा, संरक्षण आणि तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करण्याच्या भारतीय रेल्वेच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.
पुनर्विकसित स्थानकांवर प्रवाशांचा सुधारित अनुभव
अमृत भारत स्थानक योजनेने प्रवासी स्थानकांच्या मोठ्या प्रमाणावरील पुनर्बांधणीला गती दिली आहे. या योजनेअंतर्गत, रेल्वे स्थानकांना केवळ वाहतुकीचे केंद्र न मानता, शहरांचे केंद्र म्हणून नव्याने संकल्पित करण्यात आले आहे. आतापर्यंत, या कार्यक्रमांतर्गत 1137 स्थानकांची सुधारणा करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. हा जगातील सर्वात मोठ्या स्थानक पुनर्रचना उपक्रमांपैकी एक आहे. देशभरात पुनर्विकासाची कामे (सर्व कामे रेल्वे वाहतूक थांबवल्याशिवाय) सुरू आहेत. डिसेंबर 2025 पर्यंत, 155 स्थानकांचे पूर्णपणे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. या सुधारणांमध्ये विस्तारित पादचारी पूल आणि कॉनकोर्स, लिफ्ट/एस्केलेटर, सुधारित प्रतीक्षालये, स्वच्छतागृहे आणि आसन व्यवस्था, बहुविध वाहतूक साधनांचे एकत्रीकरण (बस/टॅक्सी), स्थानिक स्टॉल्स ('वन स्टेशन वन प्रॉडक्ट'), डिजिटल फलक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा यांचा समावेश आहे. ही सुधारित स्थानके प्रवाशांचा अनुभव सुधारतात तसेच ग्राहकांच्या सोयीसुविधा आणि शहरी एकात्मतेवर रेल्वेचे लक्ष केंद्रित असल्याचे दर्शवतात.
सौरऊर्जेवर चालणारी रेल्वे स्थानके
भारतीय रेल्वेने देशभरातील 2,626 रेल्वे स्थानकांना सौरऊर्जेवर चालवून स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. एकूण 898 मेगावॅट सौरऊर्जा कार्यान्वित करण्यात आली आहे, ज्यापैकी सुमारे 70% ऊर्जा रेल्वे इंजिन चालवण्यासाठी वापरली जाते. यामुळे ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली आहे, विजेवरील खर्च कमी झाला आहे, कार्बन उत्सर्जन घटले आहे आणि पर्यावरणपूरक रेल्वे संचालनाला प्रोत्साहन मिळाले आहे.
मोफत वाय-फाय
भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देत 6,117 स्थानकांवर मोफत वाय-फाय सेवा प्रदान करण्यात आली आहे.
रेलवन ॲप : प्रवाशांसाठी एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सेवांसाठी एक सर्वसमावेशक 'वन-स्टॉप' समाधान असलेले 'रेलवन ॲप' सुरू केले आहे, जे अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
या ॲपच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे:
- अनारक्षित यूटीएस तिकीट (आर-वॉलेटद्वारे 3% सूट)
- थेट ट्रेन ट्रॅकिंग
- तक्रार निवारण
- ई-केटरिंग
- हमाल बुकिंग
- शेवटच्या टप्प्यासाठी टॅक्सी सेवा
आधार-प्रमाणित आरक्षण सुधारणा
प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी वापरकर्त्यांची आधार पडताळणी हे एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रामाणिक प्रवाशांना प्राधान्य देण्यासाठी, आयआरसीटीसी संकेतस्थळ किंवा ॲपवर आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांत केवळ आधार-प्रमाणित वापरकर्त्यांनाच सामान्य आरक्षित तिकिटे बुक करण्याची परवानगी आहे. केवळ आधार-पडताळणी केलेल्या वापरकर्त्यांनाच तत्काळ तिकिटे बुक करण्याची परवानगी आहे. ई-तिकिटिंग प्रणालीचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अप्रामाणिक वापरकर्त्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जात आहे. परिणामी, आयआरसीटीसी वर नोंदणी केलेले 5.73 कोटी संशयास्पद आणि निष्क्रिय वापरकर्ते निष्क्रिय किंवा तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. आणखी संशयास्पद वापरकर्त्यांना निष्क्रिय करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.
रेल्वे राखीव दलाची (आरपीएफ) प्रमुख कारवाई आणि उल्लेखनीय कामगिरी
रेल्वे प्रवाशांना सुरक्षा आणि सुविधा पुरवण्यासाठी, आरपीएफने प्रवाशांचा आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना वाढवण्यासाठी खालील उपक्रम हाती घेतले आहेत:
I. आरपीएफद्वारे प्रवाशांना सतत सहाय्य:
वर्ष
|
ट्विटरवर हाताळलेल्या तक्रारींची संख्या |
हेल्पलाइन क्रमांक 182/139 वर हाताळलेल्या तक्रारींची संख्या |
एकूण |
| 2025 (नोव्हेंबरपर्यंत) |
54648
|
321557
|
376205
|
II. समस्या-आधारित विशेष मोहीम
i. ऑपरेशन नन्हे फरिश्ते आणि मुलांची सुटका:
आरपीएफद्वारे सुटका केलेल्या तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांचा तपशील
|
वर्ष
|
आरपीएफद्वारे सुटका केलेल्या मुलांची संख्या |
2025 (नोव्हेंबरपर्यंत)
|
17231 |
ii. ऑपरेशन "जीवन रक्षा":
वर्ष
|
रेल्वेमध्ये जीव वाचवला
|
पुरुष
|
महिला
|
एकूण
|
| 2025 (नोव्हेंबरपर्यंत) |
1894
|
974
|
2868
|
iii. ऑपरेशन अमानत आणि सामानाची पुनर्प्राप्ती:
वर्ष
|
प्रवाशांचे मागे राहिलेले सामान परत मिळवून देण्याची प्रकरणे |
परत मिळवलेल्या मालमत्तेचे मूल्य (रुपयांमध्ये) |
2025 (नोव्हेंबरपर्यंत)
|
53607
|
79,85,11,140
|
iv. ऑपरेशन "मातृशक्ती":
वर्ष
|
प्रसूतीच्या वेळी हाताळलेली प्रकरणे आणि दिलेले सहाय्य |
| ट्रेनमध्ये |
रेल्वे परिसरात |
एकूण |
2025 (नोव्हेंबरपर्यंत)
|
198
|
105
|
303
|
v. महिला सुरक्षा:
महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात किंवा इतर ठिकाणी अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या प्रवाशांवर केलेली कारवाई.
वर्ष
|
नोंदवलेल्या प्रकरणांची संख्या |
अटक केलेल्या व्यक्तींची संख्या |
2025 (नोव्हेंबरपर्यंत)
|
107606
|
110940
|
vi. ऑपरेशन "उपलब्ध" आणि दलालांविरुद्ध कारवाई:
| वर्ष |
नोंदवलेल्या प्रकरणांची संख्या |
अटक केलेल्या व्यक्तींची संख्या |
जप्त केलेल्या भविष्यातील प्रवासाच्या तिकिटांची संख्या |
जप्त केलेल्या भविष्यातील प्रवासाच्या तिकिटांचे मूल्य |
ब्लॉक केलेल्या आयआरसीटीसी वापरकर्ता आयडी संख्या |
| 2025 (नोव्हेंबरपर्यंत) |
2449
|
2690
|
7974
|
1,98,92,275 रुपये
|
8905
|
vii. ऑपरेशन "सेवा":
वर्ष
|
आरपीएफने प्रवासादरम्यान व्यक्तींना (ज्येष्ठ नागरिक/ महिला/ दिव्यांगजन/ आजारी/ जखमी /शिशू) चढताना आणि उतरताना तसेच इतर सुविधा (उदा. व्हीलचेअर, स्ट्रेचर, वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका, औषधे, बालकांचे अन्न इत्यादी) उपलब्ध करून देताना मदत केलेल्या व्यक्तींची संख्या |
| 2025 (नोव्हेंबरपर्यंत) |
10146
|
viii. ऑपरेशन आहट आणि मानवी तस्करी:
वर्ष
|
आरपीएफने सुटका केलेल्या तस्करी झालेल्या व्यक्तींची संख्या |
आरपीएफने अटक केलेल्या तस्करांची संख्या |
| अल्पवयीन |
प्रौढ |
एकूण |
| मुले |
मुली |
पुरुष |
महिला |
2025 (नोव्हेंबरपर्यंत)
|
783
|
88
|
14
|
93
|
978
|
292
|
ix. ऑपरेशन "नार्कोस":
वर्ष
|
शोधलेल्या प्रकरणांची संख्या |
जप्त केलेल्या अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचे मूल्य |
अटक केलेल्या व्यक्तींची संख्या |
| 2025 (नोव्हेंबरपर्यंत) |
1980
|
2,08,52,03,671 रुपये
|
1601
|
x. ऑपरेशन “वाइलेप”:
वर्ष
|
शोधून काढलेल्या प्रकरणांची संख्या |
अटक केलेल्या व्यक्तींची संख्या |
| वन्यजीव |
वनस्पती |
2025 (नोव्हेंबरपर्यंत)
|
43
|
19
|
44
|
xi. ऑपरेशन "सतर्क":
वर्ष
|
तंबाखू उत्पादने |
मद्य उत्पादने |
| शोधून काढलेली प्रकरणे |
मूल्य |
अटक केलेल्या व्यक्ती |
शोधून काढलेली प्रकरणे |
मूल्य |
अटक केलेल्या व्यक्ती |
| 2025 (नोव्हेंबरपर्यंत) |
140
|
8,25,05,340 रुपये
|
97
|
4044
|
6,01,64,423 रुपये
|
3356
|
आर्थिक कॉरिडॉर
भारतीय रेल्वे रेल्वे नेटवर्कमध्ये क्षमता, कार्यक्षमता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी अनेक परिवर्तनकारी पायाभूत सुविधा उपक्रम हाती घेत आहे. पारंपरिक नेटवर्कवरील ताण कमी करण्यासाठी समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर कार्यान्वित करणे आणि सार्वजनिक गुंतवणुकीला पूरक म्हणून सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेलला प्रोत्साहन देणे, ही प्रमुख लक्ष केंद्र आहेत. खालील विभागात या प्रमुख उपक्रमांची प्रगती आणि स्थिती दिली आहे :
तीन प्रमुख आर्थिक कॉरिडॉर्स
3 आर्थिक कॉरिडॉर अंतर्गत 11.17 लाख कोटी रुपये खर्चाचे 434 प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत.
ऊर्जा, खनिज आणि सिमेंट कॉरिडॉर: 192 प्रकल्प
उच्च वाहतूक घनतेचे मार्ग: 200 प्रकल्प
बंदरांची संपर्क प्रणाली: 42 प्रकल्प
सर्व 434 प्रकल्प पीएम गतीशक्ती पोर्टल नकाशावर दर्शवण्यात आले आहेत. त्यापैकी सध्या 12,133 किमी लांबीच्या मार्गाचे आणि 2,02,551 कोटी रुपये खर्चाचे 121 प्रकल्प मंजूर झाले आहेत. तसेच 16,910 किमी लांबीच्या मार्गाचे आणि सुमारे 3,30,545 कोटी रुपये खर्चाचे 162 प्रकल्प मूल्यांकन/आंतर-मंत्रालयीन सल्लामसलतीच्या विविध टप्प्यांत आहेत.
कॉरिडॉर-आधारित कार्यक्रमाचा उद्देश लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारणे आणि लॉजिस्टिक खर्च कमी करणे हा आहे.
समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर (डीएफसी) प्रकल्प:
समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर हा एक मोठा रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. दोन समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर (डीएफसी) म्हणजेच – लुधियाना ते सोननगर (1337 किमी) पर्यंतचा पूर्व समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर (ईडीएफसी) आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट टर्मिनल ते दादरी (1506 किमी) पर्यंतचा पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर (डब्ल्यूडीएफसी) हे दोन्ही कॉरिडॉर (वैतरणा-जेएनपीटी मुंबई विभागाचा 102 किमीचा भाग वगळता, ज्याचे काम प्रगतीपथावर आहे) कार्यान्वित करण्यात आला आहे.
पूर्व समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर (ईडीएफसी) आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर (डब्ल्यूडीएफसी) मार्गांवर वळवल्यामुळे, समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर (डीएफसी) ने पारंपरिक नेटवर्कवर अतिरिक्त मार्ग तयार करण्यास हातभार लावला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये, दररोज सरासरी 403 गाड्या चालवण्यात आल्या. परिणामी, रेल्वे आपल्या नेटवर्कवर अधिक चांगल्या वेळेवर अतिरिक्त मालगाड्या आणि प्रवासी गाड्या चालवू शकली आहे.
आदेशित विभागांमध्ये रेल्वे वाहतूक खालीलप्रमाणे सुरू आहे :-
|
कॉरिडॉर
|
संचार मार्ग चालवलेल्या गाड्यांची संख्या |
एनटीकेएम (दशलक्ष) |
जीटीकेएम (दशलक्ष) |
| ऑक्टोबर 25 |
संचयी (आर्थिक वर्ष 25-26) |
ऑक्टोबर 25 |
संचयी (आर्थिक वर्ष 25-26) |
ऑक्टोबर 25 |
संचयी (आर्थिक वर्ष 25-26) |
| ईडीएफसी |
5960
|
44,094
|
5,363
|
41,974
|
9,855
|
75,262
|
|
डब्ल्यूडीएफसी
|
5979
|
38,624
|
3,260
|
22,138
|
6,217
|
40,480
|
|
एकूण
|
11,939
|
82,718
|
8,623
|
64,111
|
16,072
|
1,15,743
|
वर्षभरातील विक्रमी मालवाहतूक कामगिरी आणि लक्ष्यित धोरणात्मक हस्तक्षेपांमुळे निर्माण झालेल्या संवेगामुळे देशभरातील विविध प्रदेशांमध्ये लॉजिस्टिक्स क्षेत्रात मूर्त परिणाम दिसून आले आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारतीय रेल्वेने 1 अब्ज टन मालवाहतुकीचा ऐतिहासिक टप्पा गाठला आणि कोळसा, लोहखनिज, सिमेंट आणि कंटेनर वाहतुकीच्या जोरदार मागणीमुळे दैनंदिन मालवाहतूक 4.4 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचली.
या वाढीला संरचनात्मक सुधारणा आणि क्षमता वाढीमुळे पाठिंबा मिळाला आहे, ज्यात मोठ्या प्रमाणावरील सिमेंट वाहतुकीसाठी प्रति टन प्रति किलोमीटर ₹0.90 च्या सपाट-दर शुल्काचा समावेश आहे, ज्यामुळे खर्चाच्या अंदाजात सुधारणा होऊन रेल्वे वाहतुकीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळाले. त्याच वेळी चालू वर्षात 25 'गतिशक्ती कार्गो टर्मिनल्स' कार्यान्वित झाल्यामुळे पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यातील संचारसंपर्क मजबूत झाला आहे, टर्मिनलची कार्यक्षमता वाढली आहे आणि मालवाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी झाला आहे.
वॅगन उत्पादन :
भारतीय रेल्वेमध्ये नवीन वॅगन चा जास्तीत जास्त समावेश करून मालवाहतुकीतून मिळणारे उत्पन्न वाढवण्यासाठी 2019-20 या आर्थिक वर्षापर्यंत 3000 मेट्रिक टन मालवाहतुकीच्या उद्दिष्टामुळे गेल्या तीन वर्षांत रेल्वे वॅगन च्या उत्पादनात वाढ करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, वॅगन उत्पादनाला चालना देण्यात आली, ज्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2025 मध्ये अनुक्रमे 3651, 3880 आणि 4135 वॅगन चे उत्पादन झाले. परिणामी, 2024-25 या आर्थिक वर्षात 41,929 वाघिणींचे सर्वाधिक उत्पादन झाले (जे गेल्या 3 वर्षांतील सर्वाधिक आहे).
चालू दिनदर्शिका वर्षात जानेवारी '25 ते नोव्हेंबर '25 या कालावधीत 33,703 वाघिणींचे उत्पादन झाले असून, वॅगन च्या पुरवठ्यात सातत्याने सुधारणा दिसून येत आहे.
या सर्व घडामोडींमुळे भारतीय रेल्वेला केवळ अधिक मालवाहतूक कार्यक्षमतेने हाताळणेच शक्य झाले नाही तर विशेषतः दुर्गम आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांमध्ये प्रदेश-विशिष्ट आणि अशा प्रकारच्या पहिल्याच मालवाहतूक कार्यांचे आयोजन करणेही शक्य झाले आहे. वाढीव मालवाहतूक क्षमता, भाडेदरांचे सुलभीकरण आणि पायाभूत सुविधांचा विस्तार यांचा उपयोग करून या वर्षात महत्त्वाचे लॉजिस्टिक उपाय कसे पुरवण्यात आले, हे खालील उदाहरणे अधोरेखित करतात.
अनंतनागसाठी पहिली अन्नधान्य मालगाडी
एका ऐतिहासिक घटनेत काश्मीर खोऱ्यासाठी अन्नधान्याची एक मालगाडी अनंतनाग माल टर्मिनलवर पोहोचली. ही गाडी पंजाबमधील अजित वाल रेल्वे स्थानकावरून रवाना झाली होती आणि त्यात अंदाजे 1,384 टन अन्नधान्य होते. जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग रेल्वे स्थानकासाठी रेल्वेमार्गे झालेला हा पहिलाच मोठ्या प्रमाणातील अन्नधान्य पुरवठा होता.
या घडामोडीमुळे खोऱ्याचे राष्ट्रीय मालवाहतूक रेल्वे जाळ्याशी औपचारिकपणे एकीकरण झाले आहे, ज्यामुळे अन्न पुरवठा प्रणाली मजबूत होईल, वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होईल आणि प्रादेशिक लॉजिस्टिक्स क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल.
रेल्वेद्वारे ईशान्येकडील सिमेंट वाहतूक
बैरबी-सैरांग मार्गाच्या उद्घाटनानंतर लगेचच मालवाहतूक सुरू झाली. 14 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पहिल्या मालवाहतुकीमध्ये आसाममधून ऐझॉलपर्यंत सिमेंटचे 21 वाघिणी नेण्यात आल्या. तेव्हापासून या मार्गावर सिमेंट, बांधकाम साहित्य, वाहने, वाळू आणि खडी यांसारख्या आवश्यक वस्तूंची वाहतूक केली जात आहे, ज्यामुळे या प्रदेशातील पायाभूत सुविधांचा विकास आणि बाजारपेठेतील पोहोच सुलभ झाली आहे.
मिझोरमला रेल्वेद्वारे मोटारगाड्यांचा पुरवठा
पहिल्यांदाच मिझोरमला रेल्वेद्वारे मोटारगाड्यांचा पुरवठा करण्यात आला आहे, जे एक ऐतिहासिक लॉजिस्टिक यश आहे. चांगसारी (गुवाहाटीजवळ) येथून 119 मारुती गाड्या घेऊन निघालेला एक ऑटोमोबाईल रेक ऐझॉलजवळील सैरांग रेल्वे स्थानकावर पोहोचला.
या घडामोडीमुळे ऐझॉल आणि आसपासच्या परिसरात वाहनांची उपलब्धता वाढेल, लांब पल्ल्याच्या रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व कमी होईल आणि विक्रेते, सेवा प्रदाते व ग्राहक यांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
एकात्मिक लॉजिस्टिक्स हब आणि नवीन मालवाहतूक सेवा
भारतीय रेल्वेने एकात्मिक लॉजिस्टिक्सला बळकटी देण्यासाठी घरोघरी मालवाहतूक आणि पार्सल सेवा देखील नव्याने सुरू केल्या आहेत, ज्यात खालील सेवांचा समावेश आहे:
- दिल्ली आणि कोलकाता दरम्यान निश्चित वेळेत पोहोचणारी कंटेनर रेल्वे सेवा
- मुंबई-कोलकाता मार्गावर घरपोच पार्सल सेवा
भारतीय रेल्वेमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी):
वेगाने विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेत, आर्थिक आणि पर्यावरणीय अशी दोन्ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी रेल्वेची भूमिका महत्त्वाची आहे. गेल्या काही वर्षांत रेल्वे जाळे विस्तारण्यासाठी सकल अर्थसंकल्पीय सहाय्याद्वारे (जीबीएस) वाढीव निधी पुरवण्यात आला आहे. आर्थिक विस्ताराच्या गतीशी जुळवून घेण्यासाठी केवळ हे पुरेसे नाही. यासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्र या दोन्हीकडून गुंतवणुकीची आवश्यकता आहे. रेल्वेमधील सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रकल्प सध्या 2012 च्या पीपीपी धोरणांतर्गत राबवले जात आहेत. आतापर्यंत, पीपीपी प्रारूपाद्वारे 16,686 कोटी रुपयांचे 18 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. कोळसा जोडणी आणि बंदर जोडणी प्रकल्पांसह 16,362 कोटी रुपयांचे 7 प्रकल्प सध्या अंमलबजावणीखाली आहेत.
हे धोरण अधिक आकर्षक बनवण्यासाठी पीपीपी प्रारूपाची पुनर्रचना आणि सुधारणा सुरू आहे.
‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत पीपीपी-आधारित लोकोमोटिव्ह उत्पादन
1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान भारतीय रेल्वेने 1,542 इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हचे म्हणजेच रेल्वेगाडीच्या इंजिनांचे उत्पादन केले. लोकोमोटिव्ह उत्पादनात आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी आणि वहन क्षमता सुधारण्यासाठी भारतीय रेल्वेने देशात अत्याधुनिक लोकोमोटिव्ह उत्पादन युनिट्स स्थापन करण्यासाठी प्रगत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) प्रारूपाचा अवलंब केला आहे. हे उपक्रम ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला पाठिंबा देतात, स्वदेशी पुरवठा साखळ्यांना प्रोत्साहन देतात आणि दीर्घकालीन देखभालीची विश्वसनीयता सुनिश्चित करतात. प्रमुख लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्पांची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे.
मधेपुरा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कारखाना
भारतीय रेल्वेने बिहारमधील मधेपुरा कारखान्यातून पीपीपी मॉडेल अंतर्गत 576 उच्च-शक्ती आणि 12,000 एचपी क्षमतेच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हचा पुरवठा केला आहे, ज्यात एप्रिल-नोव्हेंबर 2025 दरम्यान वितरित केलेल्या 76 लोकोमोटिव्हचा समावेश आहे. ॲल्स्टॉम ट्रान्सपोर्ट इंडिया लिमिटेडच्या भागीदारीत स्थापन केलेली ही सुविधा 11 वर्षांमध्ये 800 लोकोमोटिव्हचे उत्पादन करत आहे, ज्यामध्ये 90% पेक्षा जास्त स्वदेशी घटकांचा वापर केला जात आहे. यामुळे 'मेक इन इंडिया'ला बळकटी मिळत आहे आणि मालवाहतूक क्षमता वाढत आहे.
मढौरा डिझेल लोकोमोटिव्ह कारखाना
बिहारमधील मढौरा डिझेल लोकोमोटिव्ह कारखान्याने वॅबटेक लोकोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडसोबतच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) व्यवस्थेअंतर्गत, आतापर्यंत 773 लोकोमोटिव्ह (4,500 एचपीचे 569 आणि 6,000 एचपीचे 204) वितरित केले आहेत, ज्यात आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये (नोव्हेंबरपर्यंत) पुरवलेल्या 73 युनिट्सचा समावेश आहे. सुमारे 65% सुटे भाग भारतातूनच मिळवले जातात. निर्यातीच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यात या कारखान्याने आफ्रिकेतील गिनी देशाला 150 लोकोमोटिव्हच्या निर्यातीसाठी 400 दशलक्ष डॉलर्सच्या ऑर्डर मिळवल्या आहेत, त्यापैकी 14 लोकोमोटिव्ह आधीच पाठवण्यात आले आहेत, जे जागतिक रेल्वे बाजारपेठेत भारताची वाढती उपस्थिती दर्शवते.
दाहोद इलेक्ट्रिक मालवाहतूक लोकोमोटिव्ह सुविधा
गुजरात येथील दाहोद येथील लोकोमोटिव्ह उत्पादन सुविधा सीमेन्स लिमिटेडच्या सहकार्याने उभारण्यात आली आहे, ती एका दीर्घकालीन उत्पादन आणि देखभाल कराराअंतर्गत 9,000 एचपी क्षमतेची 1,200 इलेक्ट्रिक मालवाहतूक लोकोमोटिव्ह तयार करेल. मे 2025 मध्ये राष्ट्राला समर्पित केलेल्या या सुविधेने आरडीएसओ चाचण्या आणि वैधानिक सुरक्षा तपासण्या पूर्ण केल्या आहेत, ज्यामुळे सुमारे 90% स्वदेशी घटकांसह उच्च-शक्तीच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हच्या मोठ्या प्रमाणावरील समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी या सुविधेतून पहिल्या नवीन डी9 मालिकेतील 9,000 एचपी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवला.
एआय आणि तंत्रज्ञानावर आधारित सिग्नलिंग आणि दूरसंचार
भारतीय रेल्वे परिचालन सुरक्षा वाढवण्यासाठी, संवादाची विश्वासार्हता सुधारण्यासाठी आणि प्रवासी माहिती प्रणाली मजबूत करण्यासाठी प्रगत दूरसंचार आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहे. या क्षेत्रातील प्रमुख उपक्रमांमध्ये एआय-सक्षम घुसखोरी शोध प्रणाली, संपूर्ण नेटवर्कवर व्हिडिओ पाळत ठेवणे, डिजिटल रेडिओ संवाद, ऑप्टिकल फायबरचा विस्तार आणि आधुनिक प्रवासी मार्गदर्शन प्रणाली यांचा समावेश आहे. प्रमुख घडामोडी खालीलप्रमाणे नमूद केल्या आहेत.
- घुसखोरी ओळख प्रणाली: भारतीय रेल्वेने निवडक संचार मार्गांवर असणाऱ्या रेल्वे रुळांवर हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांची उपस्थिती शोधण्यासाठी डिस्ट्रिब्युटेड अकूस्टिक सेन्सिंग (डीएएस) तंत्रज्ञानावर आधारित एक एआय-सक्षम उपाय विकसित केला आहे. ही प्रणाली अशा प्राण्यांच्या हालचालींबद्दल आगाऊ सूचना देते, ज्यामुळे वेळेवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आणि लोको पायलट, स्टेशन मास्तर आणि नियंत्रण कक्षांना इशारा पाठवणे शक्य होते, परिणामी अपघातांचा धोका कमी होतो. सध्या ही प्रणाली ईशान्य सीमा रेल्वेमध्ये 141 रेल्वे किलोमीटर दरम्यान कार्यरत आहे.
- व्हिडिओ देखरेख प्रणाली: भारतीय रेल्वेने संपूर्ण रेल्वे जाळ्यामधील 1731 रेल्वे स्थानकांवर व्हिडिओ देखरेख प्रणाली (व्हीएसएस) कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली घटना शोधण्यासाठी (जसे की घुसखोरी शोधणे, संशयास्पद फिरणे शोधणे) एआय-आधारित व्हिडिओ ॲनालिटिक्स (व्हीए) आणि रिअल-टाइम ओळख व देखरेखीसाठी फेशियल रिकग्निशन सॉफ्टवेअर (एफ आर एस) ने स्वयंचलितरीत्या सुसज्ज आहे.
- भारतीय रेल्वेसाठी डिजिटल व्हीएचएफ सेटचा वापर: सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लोको पायलट आणि गार्ड यांच्यातील संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो. हा संवाद विश्वसनीय आणि स्पष्ट आवाजाचा असणे आवश्यक आहे. डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित व्हीएचएफ सेटमुळे मिळणाऱ्या फायद्यांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने रेल्वे बोर्डाने भारतीय रेल्वेसाठी केवळ डिजिटल 5 वॅटचे वॉकी-टॉकी सेट खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.
- बोगदा दळणवळण प्रणाली: बोगद्याच्या आतून मुख्यालय आणि परिचालन नियंत्रण केंद्रांपर्यंत अखंडित रेडिओ संवाद साधण्यासाठी यूएसबीआरएल प्रकल्पासह विविध रेल्वे मार्गांवर बोगदा दळणवळण प्रणाली उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
- ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी): भारतीय रेल्वेने ऑक्टोबर 2005 पर्यंत 619 आर.कि.मी. ऑप्टिकल फायबर केबल टाकली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये एकूण अंदाजे 67233 आर.कि.मी. लांबीचे जाळे तयार झाले आहे.
- कोच मार्गदर्शन प्रणाली: कोच मार्गदर्शन प्रणाली (सीजीएस) फलाटावर नियोजित रेल्वेगाडीच्या डब्यांची स्थिती दर्शवते. ही प्रणाली प्रवाशांना त्यांचे डबे लवकर आणि सहज शोधण्यात मदत करून त्यांची सोय लक्षणीयरीत्या वाढवते. आतापर्यंत 1064 स्थानकांवर कोच मार्गदर्शन प्रणाली बसवण्यात आली आहे.
- रेल्वेगाडी सूचना फलक: रेल्वेगाडी सूचना फलकावर गाड्यांचे आगमन/प्रस्थान दर्शवले जाते, ज्यामध्ये गाडी क्रमांक, नाव, आगमन/प्रस्थानाची वेळ आणि फलाट क्रमांक यांचा समावेश असतो. आतापर्यंत 1449 स्थानकांवर रेल्वेगाडी सूचना फलक बसवण्यात आले आहेत.
भरती
भारतीय रेल्वेचा आकार, भौगोलिक विस्तार आणि कामकाजाचे महत्त्व लक्षात घेता, रिक्त जागांची निर्मिती आणि त्या भरणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. नियमित कामकाज, तंत्रज्ञानातील बदल, यांत्रिकीकरण आणि नाविन्यपूर्ण पद्धतींसाठी पुरेसे आणि योग्य मनुष्यबळ पुरवले जाते. परिचालन आणि तांत्रिक गरजांनुसार, रेल्वेद्वारे भरती संस्थांकडे मागणीपत्रे पाठवून रिक्त जागा प्रामुख्याने भरल्या जातात. 2024 आणि 2025 च्या वार्षिक दिनदर्शिकेनुसार, विभागीय रेल्वे आणि उत्पादन युनिट्ससह भारतीय रेल्वेमध्ये 1,20,579 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
रेल्वे संरक्षण दलातील (आरपीएफ) भरती प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. उपनिरीक्षक (कार्यकारी) पदांच्या 452 जागांसाठीची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून हवालदारांच्या 4,208 पदांसाठीची भरती सध्या सुरू आहे.
भरतीची माहिती
क्रीडा
भारतीय रेल्वेने भारताच्या क्रीडा प्रतिभेला वाव देण्यात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि तिचे खेळाडू विविध खेळांमध्ये देशाला गौरव मिळवून देत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल आणि सन्मान म्हणून रेल्वेने या वर्षात प्रतिका रावल, स्नेह राणा आणि रेणुका सिंग ठाकूर यांना 'विशेष कर्तव्य अधिकारी (क्रीडा)' या गट 'ब' अधिकारी पदावर नियमांव्यतिरिक्त पदोन्नती दिली आहे. भारताच्या आयसीसी महिला विश्वचषक 2025 मधील विजयी मोहिमेतील त्यांच्या अपवादात्मक कामगिरीबद्दल ही पदोन्नती देण्यात आली आहे.
परिवर्तनाचे एक वर्ष, आश्वासक भविष्याची हमी: भारतीय रेल्वेचा 2026 साठी संदेश
2025 हे वर्ष संपत असताना, भारतीय रेल्वे देशातील जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि स्थिर प्रगती व उद्देशपूर्ण परिवर्तनाच्या या वर्षावर अभिमानाने दृष्टिक्षेप टाकत आहे. स्थानकांच्या पुनर्विकासातील महत्त्वपूर्ण प्रगती, बळकट सुरक्षा प्रणाली, डिजिटल आणि शाश्वत तंत्रज्ञानाचा व्यापक अवलंब आणि मालवाहतूक मार्गांमध्ये सातत्याने केलेली सुधारणा यामुळे भारतीय रेल्वेने राष्ट्रीय विकासाचा एक प्रमुख चालक म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. या प्रयत्नांमुळे वेगवान, सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि अधिक सर्वसमावेशक अशा भविष्यवेधी रेल्वे जाळ्यासाठी एक भक्कम पाया घातला गेला आहे.
नवा आत्मविश्वास आणि वचनबद्धता यासह 2026 चे स्वागत करताना, भारतीय रेल्वे संपूर्ण प्रामाणिकपणा आणि समर्पणाने रेल्वे सेवा प्रदान करण्याच्या राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या वचनाची पुष्टी करते. सुस्पष्ट दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीसह लोकांना जोडण्यासाठी, प्रदेशांना सक्षम करण्यासाठी, पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, सुरक्षा वाढवण्यासाठी, तंत्रज्ञान प्रगत करण्यासाठी आणि प्रवाशांचा एकूण अनुभव सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे कटिबद्ध आहे, तसेच विश्वासार्हता आणि उत्कृष्टतेने देशाला पुढे नेत आहे.
* * *
नितीन फुल्लुके/प्रज्ञा जांभेकर/श्रद्धा मुखेडकर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
(रिलीज़ आईडी: 2210539)
आगंतुक पटल : 9