अर्थ मंत्रालय
च्युइंग टोबॅको (चघळण्याचा तंबाखू), जर्दा सुगंधी तंबाखू आणि गुटखा यांच्यावरील यंत्र-आधारित शुल्काबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रविष्टि तिथि:
01 JAN 2026 11:32AM by PIB Mumbai
1. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर केंद्रीय उत्पादन शुल्काचे प्रभावी दर काय आहेत?
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवरील प्रभावी शुल्काचे दर 31.12.2025 रोजीच्या अधिसूचना क्रमांक 03//2025-Central Excise आणि अधिसूचना क्रमांक 04/2025-Central Excise द्वारे अधिसूचित करण्यात आले आहेत. हे शुल्क दर 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू होतील.
2. च्युइंग टोबॅको (चघळण्याचा तंबाखू), जर्दा सुगंधी तंबाखू आणि गुटखा पॅकिंग मशिन (क्षमता निर्धारण आणि शुल्क संकलन) नियम 2025 ची तरतूद कुठे केली आहे?
हे नियम 31.12.2025 रोजीच्या अधिसूचना क्रमांक No. 05/2025-Central Excise (N.T.) द्वारे अधिसूचित करण्यात आले आहेत. हे नियम 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू होतील.
3. या नियमांअंतर्गत कोणत्या वस्तूंचा समावेश होतो?
या नियमांमध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क अधिनियम, 1944 च्या कलम 3A (Section 3A) अंतर्गत अधिसूचित केलेल्या वस्तूंचा समावेश होतो, या वस्तू 31.12.2025 रोजीच्या अधिसूचना क्रमांक No. 04/2025- Central Excise (N.T.) जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये च्युइंग तंबाखू (फिल्टर खैनीसह), जर्दा सुगंधी तंबाखू आणि गुटखा यांचा समावेश आहे.
4. च्युइंग टोबॅको, जर्दा सुगंधी तंबाखू आणि गुटखा पॅकिंग मशिन (क्षमता निर्धारण आणि शुल्क संकलन) नियम 2025 नेमके कशाबद्दल आहेत?
हे नियम अधिसूचित वस्तू म्हणजेच च्युइंग तंबाखू (फिल्टर खैनीसह), जर्दा सुगंधी तंबाखू आणि गुटखा यांच्या उत्पादन क्षमतेचे निर्धारण आणि त्यांच्यावरील केंद्रीय उत्पादन शुल्काचे संकलन करण्याच्या पद्धतीबद्दल आहेत.
5. ज्या करदात्यांकडे आधीच केंद्रीय उत्पादन शुल्क नोंदणी आहे, त्यांना या नियमांअंतर्गत वेगळी नोंदणी आवश्यक आहे का?
नाही, ज्या करदात्यांकडे आधीच केंद्रीय उत्पादन शुल्क नोंदणी आहे, त्यांना कोणत्याही स्वतंत्र नोंदणीची आवश्यकता नाही.
6. अधिसूचित वस्तूंच्या सर्व उत्पादकांना या नियमांनुसार विहित केलेले गृहीत धरलेले शुल्क (deemed duty) भरावे लागेल का?
नाही, हे नियम अधिसूचित वस्तूंचे पाऊच (पाकिटे) तयार करणाऱ्या उत्पादकांना लागू आहेत. जे उत्पादक इतर स्वरूपात (डब्यांसारख्या) उत्पादन करतात, त्यांना त्यांच्या मूल्यांकन करण्यायोग्य मूल्यावर लागू असलेले शुल्क भरावे लागेल.
7. शुल्क गणनेसाठी अधिसूचित वस्तूंच्या किरकोळ विक्री किमतीवर कोणतीही सवलत उपलब्ध आहे का?
होय, सवलत उपलब्ध आहे आणि दि. 31.12.2025 च्या अधिसूचना क्रमांक 01/2022-Central Excise (N.T.) मध्ये उत्पादनांसाठी लागू शुल्काचे दर अधिसूचित करताना या सवलतीचा विचार करण्यात आला आहे.
8. अधिसूचित वस्तूंच्या विद्यमान उत्पादकाने कोणत्या तारखेपर्यंत घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे?
नियम लागू झाल्यापासून 7 दिवसांच्या आत म्हणजेच 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत हे घोषणापत्र नमुना CE DEC-01 मध्ये दिलेल्या विहीत नमुन्यानुसार पोर्टलवर दाखल करावे लागेल.
9. नमुना CE DEC-01 दाखल करणे अनिवार्य आहे का?
होय, हे अनिवार्य आहे.
10. घोषणापत्रात कोणत्या स्वरुपाचे मानक तपशील जाहीर करणे आवश्यक आहे?
या मानक तपशीलामध्ये यंत्रांची संख्या, यंत्रांचे तांत्रिक तपशील (मूल्यांकित कमाल क्षमता आणि गिअर बॉक्सचे गुणोत्तर अशा स्वरुपातील) आणि नमूद केल्यानुसार किरकोळ विक्री किमतीचे तपशील अशा बाबींचा समावेश आहे.
11. चार्टर्ड इंजिनिअरच्या प्रमाणपत्राची आवश्यकता का आहे?
ट्रॅक किंवा फनेलची संख्या, गिअर बॉक्सचे गुणोत्तर आणि मुख्य मोटारचे प्रति मिनिट परिभ्रमण (RPM) यांसारखी तांत्रिक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
12. प्रत्यक्ष उत्पादनाचा संदर्भ असतो का?
नाही, हे शुल्क यंत्राच्या मूल्यांकित कमाल क्षमतेनुसार उत्पादित केलेल्या 'मानलेल्या' प्रमाणावर आधारित आहे.
13. देय शुल्काची गणना कशी केली जाते?
केंद्रीय उत्पादन शुल्क अधिनियमाच्या कलम 3A नुसार, उत्पादकाला उत्पादनाच्या निर्धारित वार्षिक क्षमतेवर आधारित शुल्क अदा करणे आवश्यक आहे.
मात्र, दाखल केलेल्या घोषणापत्राची पडताळणी प्रलंबित असेपर्यंत, उत्पादक महिन्याच्या कालावधीत उत्पादित केलेल्या पाऊचच्या किरकोळ विक्री किमतीवर आणि पॅकिंग मशिनच्या कमाल वेगावर (पाऊच प्रति मिनिट) आधारित शुल्क अदा करावे लागेल.
उदाहरण म्हणून पाहायचे तर, जर च्युइंग तंबाखू तयार करणाऱ्या यंत्राची मूल्यांकित कमाल क्षमता 500 पाऊच असेल आणि त्याची किरकोळ विक्री किंमत 2 रुपये असेल, तर प्रति पॅकिंग मशिन प्रति महिना शुल्काचा दर 0.83 कोटी रुपये इतका असेल.
जर यंत्राची मूल्यांकित कमाल क्षमता 500 पाऊच असेल आणि त्याची किरकोळ विक्री किंमत 4 रुपये असेल, तर प्रति पॅकिंग मशिन प्रति महिना शुल्काचा दर 1.52 कोटी रुपये असेल (इथे 0.83 कोटी रुपये किंवा 0.38*किरकोळ विक्री किंमत यापैकी जे जास्त असेल ते घेतले जाईल).
14. करदाता पहिले घोषणापत्र दाखल केल्यावर आणि संबंधित क्षेत्राच्या केंद्रीय उत्पादन शुल्काचे उपायुक्त किंवा सहाय्यक आयुक्तांनी वार्षिक उत्पादन क्षमता निश्चित करण्याचा आदेश जारी करण्यापूर्वी नवीन घोषणापत्र दाखल करू शकतो का?
या नियमांतर्गतच्या नियम 6 नुसार, जोपर्यंत संबंधित क्षेत्राच्या केंद्रीय उत्पादन शुल्काचे उपायुक्त किंवा सहाय्यक आयुक्तांनी मागील घोषणापत्राबाबत नियम 8 अंतर्गत आदेश जारी केला नसेल, तोपर्यंत नवीन घोषणापत्र दाखल करता येणार नाही.
15. विभागाद्नारे वार्षिक उत्पादन क्षमता कशी निश्चित केली जाईल?
संबंधित क्षेत्राचे केंद्रीय उत्पादन शुल्काचे उपायुक्त किंवा सहाय्यक आयुक्त कारखान्याची प्रत्यक्ष तपासणी आणि यंत्रांच्या तांत्रिक तपशीलांची पडताळणी केल्यानंतर वार्षिक उत्पादन क्षमता निश्चित करतील. एका महिन्यात उत्पादित होणाऱ्या अभिमत वस्तूमालाच्या प्रमाणाला 12 (महिने) ने गुणून नियम 5 नुसार वार्षिक उत्पादन क्षमता निश्चित केली जाईल.
16. जर विभागाने निश्चित केलेली वार्षिक क्षमता उत्पादकाने केलेल्या स्व-घोषणेपेक्षा जास्त असेल, तर अशा परिस्थितीत काय होते?
उत्पादकाला त्याची बाजू मांडण्याची योग्य संधी दिल्यानंतर, संबंधित अधिकारक्षेत्राचे उप आयुक्त किंवा सहाय्यक केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्त, पडताळणीच्या तीस दिवसांच्या आत आदेश जारी करतील. यंत्रसामुग्रीच्या स्थापनेच्या तारखेपासून किंवा उत्पादनाशी संबंधित घटकांमधील बदलाच्या तारखेपासून प्रत्यक्ष पेमेंटच्या तारखेपर्यंत येणारी शुल्कामधील फरकाची रक्कम, त्यावर लागू व्याजासह देय असेल. विद्यमान उत्पादकांसाठी, पहिल्या प्रकरणाच्या बाबतीत, शुल्कामधील फरकाची रक्कम आणि व्याज 1 फेब्रुवारी 2026 पासून भरावे लागेल.
17. जर उत्पादकाने उप आयुक्त किंवा सहाय्यक केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल करण्याचा निर्णय घेतला तर काय होईल?
जरी करदात्याने अपील दाखल करण्याचा निर्णय घेतला तरी, संबंधित अधिकारक्षेत्राचे उप आयुक्त किंवा सहाय्यक केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्त यांनी केलेल्या निर्णयानुसार आदेशानंतरच्या कालावधीसाठी शुल्क रक्कम भरावी लागेल.
18. हे निर्धारण त्या अधिकारक्षेत्रातील अधिकाऱ्याद्वारे प्रत्येक महिन्याला केले जाईल का?
नाही. वार्षिक उत्पादन क्षमतेवर परिणाम करणाऱ्या उत्पादनाच्या संबंधित घटकांमध्ये, म्हणजेच उदा. पॅकिंग यंत्रांची संख्या आणि यंत्रांची कमाल उत्पादन क्षमता, यात बदल झाला तरच नवीन निर्धारण केले जाईल.
19. जर 1 फेब्रुवारी 2026 नंतर नोंदणी केलेल्या उत्पादकाने महिन्याच्या 10 तारखेला मशीन बसवून उत्पादन सुरू केले, तर संपूर्ण महिन्यासाठी शुल्क देय असेल का?
होय. उत्पादकाला पूर्ण शुल्क भरावे लागेल.
20. शुल्क गणनेच्या उद्देशाने मशीनची संख्या कशी निश्चित केली जाईल?
त्या महिन्यातील कोणत्याही दिवशी बसवलेल्या यंत्रांची कमाल संख्या ही बसवलेल्या एकूण यंत्रांची एका महिन्यासाठीची संख्या मानली जाईल.
21. कोणते मासिक फॉर्म आणि विवरणपत्रे दाखल करायची आहेत?
उत्पादकाने केंद्रीय उत्पादन शुल्क नियमांतील नियम 12 नुसार दाखल करावयाच्या मासिक विवरणपत्राव्यतिरिक्त त्याच महिन्याच्या 10 तारखेला किंवा त्यापूर्वी CE STR-1 आराखड्यात मासिक फॉर्म सादर करणे आवश्यक आहे.
22. सवलतीची गणना कशी केली जाईल?
सवलतीची गणना खालील सूत्र वापरून केली जाते:
सवलत = (मासिक शुल्क दायित्व × कामकाज सुरु नसलेल्या दिवसांची संख्या) ÷ महिन्यातील एकूण दिवसांची संख्या.
23. समजा, यंत्रसामुग्री 15 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत कार्यरत नसेल, तर किती सवलतीचा दावा केला जाऊ शकतो?
पंधरा दिवसांच्या सलग कालावधीत कामकाज बंद असेल तर त्या दिवसांकरिता सवलतीचा दावा केला जाऊ शकतो. हा कालावधी एकाच कॅलेंडर महिन्यात येतो की नाही याच्याशी त्याचा संबंध नाही.
24. सवलतीचा दावा करण्यासाठी कोणत्या अटी आहेत?
सवलतीचा दावा करण्यासाठी, उत्पादकाने कामकाजाच्या किमान तीन दिवस आधी विभागाला माहिती देणे आणि ते यंत्र विभागाने सील करणे आवश्यक आहे.
25. यंत्रे वापरात नसतानाही ती कार्यरत मानली जातात का?
होय. कारखान्यात बसवलेले कोणतेही पॅकिंग यंत्र , जोपर्यंत नियमांमधील तरतुदींनुसार सील केले जात नाही, तोपर्यंत ते कार्यरत मानले जाते.
26. यंत्रे सील करण्याची प्रक्रिया काय आहे?
कोणतेही स्थापित यंत्र सलग पंधरा दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी बंद ठेवण्यापूर्वी, उत्पादकाने संबंधित कार्यक्षेत्राच्या उपआयुक्तांना किंवा सहाय्यक आयुक्तांना, कामकाजाच्या किमान 3 दिवस आधी सूचित करणे आवश्यक आहे.
27. सील केलेले यंत्र पुन्हा कसे सुरू केले जाऊ शकते?
ज्या तारखेपासून यंत्र पुन्हा सुरू करायचे आहे, त्या तारखेच्या किमान 3 कामकाजाच्या दिवसांपूर्वी संबंधित कार्यक्षेत्राच्या उपआयुक्तांना किंवा सहाय्यक आयुक्तांना सूचित करणे आवश्यक आहे. संबंधित कार्यक्षेत्राच्या केंद्रीय उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या उपस्थितीत यंत्रे पुन्हा सुरू केली जातील.
28. विक्री करण्यासाठी किंवा विल्हेवाट लावण्यासाठी कारखान्यातून यंत्रे बाहेर काढण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे?
यंत्रे बाहेर काढण्यासाठी नियोजित केलेल्या तारखेच्या किमान 3 कामकाजाच्या दिवसांपूर्वी संबंधित अधिकारक्षेत्रातील उप-आयुक्त किंवा सहाय्यक केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तांना, सूचित करणे आवश्यक आहे.
29. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थापना करणे अनिवार्य आहे का?
होय. कारखान्यातील सर्व पॅकिंग यंत्रांच्या क्षेत्रांना समाविष्ट करणारी एक कार्यरत सीसीटीव्ही प्रणाली स्थापित करणे आणि त्याचे चित्रण किमान चोवीस महिन्यांच्या कालावधीसाठी जतन करणे पॅकिंग यंत्रे चालवणाऱ्या प्रत्येक उत्पादकासाठी आवश्यक आहे.
30. शुल्कामध्ये सवलत/सूट मिळू शकते का?
केंद्रीय उत्पादन शुल्क नियमांमधील नियम 18 अंतर्गत केंद्रीय उत्पादन शुल्कामध्ये कोणतीही सवलत / सूट उपलब्ध नाही.
31. जर एखादा कारखाना बंद पडला, तर आगाऊ भरलेल्या शुल्काचे काय होते?
उत्पादकाला नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करावा लागतो . संबंधित नियमांमधील नियम २1 मध्ये विहित केलेल्या पद्धतीने शुल्क समायोजित केले जाईल किंवा परत केले जाईल.
32. शुल्क न भरता निर्यातीला परवानगी आहे का?
नाही. क्षमता-आधारित कर प्रणाली अंतर्गत शुल्क न भरता अधिसूचित वस्तूंच्या निर्यातीला परवानगी नाही.
सेंट्रल एक्साईजची अधिसूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
***
JaydeviPujariSwami/TusharPawar/UmaRaikar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210399)
आगंतुक पटल : 34
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam