पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'रिफॉर्म एक्सप्रेस 2025' वरील एक लेख केला सामायिक, ज्यामध्ये अडथळे दूर करत प्रशासनाच्या सातत्याने केलेल्या कामावर प्रकाश टाकण्यात आला
प्रविष्टि तिथि:
30 DEC 2025 3:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रिफॉर्म एक्सप्रेस 2025' वरील एक लेख सामायिक केला. या लेखात प्रशासनाच्या शांतपणे पण सातत्याने केलेल्या कामावर प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रशासनाच्या या कार्यपद्धतीमुळे आठवड्यागणिक अडथळे दूर होत गेले.
हाती घेतलेल्या सुधारणांच्या व्यापकतेवर प्रकाश टाकताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, कामगार कायदे आणि व्यापार करारांपासून ते लॉजिस्टिक्स, ऊर्जा आणि बाजारपेठेतील सुधारणांपर्यंत, भारताची विकासाची गाथा विश्वासार्हता, स्थिरता आणि दीर्घकालीन विश्वासावर आधारित आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या 'एक्स' या समाज माध्यमावरील संदेशाला प्रतिसाद देताना, पंतप्रधान कार्यालयाच्या इंडिया हँडलने म्हटले:
“केंद्रीय मंत्री @HardeepSPuri यांनी 'रिफॉर्म एक्सप्रेस 2025' या विषयी लिहिले आहे. त्यांनी प्रशासनाच्या शांतपणे, सातत्याने केलेल्या कामावर प्रकाश टाकला आहे, ज्यामुळे आठवड्यागणिक अडथळे दूर होत गेले.
कामगार कायदे आणि व्यापार करारांपासून ते लॉजिस्टिक्स, ऊर्जा आणि बाजारपेठेतील सुधारणांपर्यंत, भारताच्या विकासाची गाथा विश्वासार्हता, स्थिरता आणि दीर्घकालीन आत्मविश्वासावर आधारित आहे.”
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2209796)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam