गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विजय दिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी युद्धामध्ये प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर हुतात्म्यांना आदरांजली वाहिली

Posted On: 16 DEC 2025 10:29AM by PIB Mumbai

युद्धामध्ये प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर हुतात्म्यांना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी विजय दिनानिमित्त आदरांजली अर्पण केली.

‘एक्स’वरील संदेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 1971 साली याच दिवशी आपल्या सुरक्षा दलांनी अदम्य साहस आणि अचूक रणनीतीसह पाकिस्तानी सैन्याचा पराभव करून त्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. या विजयाने जगभरातील मानवतेच्या संरक्षणाचे एक उज्ज्वल उदाहरण प्रस्थापित करत अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात एखाद्या ढालीसारखे कार्य केले आणि भारतीय सशस्त्र दलांच्या अतुलनीय लष्करी सामर्थ्याचे आणि शौर्याचे दर्शन घडवले, असे श्री शाह म्हणाले. 

***

NehaKulkarni/SanjanaChitnis/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2204483) अभ्यागत कक्ष : 29