पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गोतिलो’ गाण्याचे गायक आदित्य गढवी यांची त्यांच्या संगीताबद्दल केली प्रशंसा
‘खलासी’ गाण्यामुळे लोकप्रिय झालेले गायक आदित्य गढवी यांच्याशी झालेल्या खास संवादाची पंतप्रधानांनी केली आठवण
प्रविष्टि तिथि:
03 NOV 2023 9:30PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गोतिलो’ गाण्याचे गायक आदित्य गढवी यांची त्यांच्या संगीताबद्दल प्रशंसा केली आहे.
पंतप्रधानांनी आदित्य गढवी यांच्याशी केलेल्या खास संवादाची आठवणही केली.
मोदी स्टोरी एक्स हँडलने आदित्य गढवी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी झालेल्या खास संवादाबद्दल बोलत आहेत.
‘गोतिलो’ गाण्याचे गायक आदित्य गढवी यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे.
मोदी स्टोरीच्या एक्स या समाज माध्यमावरील संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले;
“खलासी लोकप्रियेतेच्या यादीत अव्वल स्थानावर आहे आणि आदित्य गढवी यांच्या संगीताने मने जिंकली आहेत.
हा व्हिडिओ एका खास संवादाच्या आठवणींना उजाळा देतो…”
***
AshishSangle/ShraddhaMukhedkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2204461)
आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam