पंतप्रधान कार्यालय
भारताच्या सांस्कृतिक तेजाचा व ईशान्येकडील वाढत्या आत्मविश्वासाचा उत्सव म्हणून हॉर्नबिल महोत्सवाचे कौतुक करणारा लेख पंतप्रधानांनी केला सादर
प्रविष्टि तिथि:
14 DEC 2025 11:32AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागालँडच्या हॉर्नबिल महोत्सवातील उत्साहाचे कौतुक केले, तसेच भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचे व आदिवासी वारशाच्या शाश्वत चैतन्याचे हे शक्तिशाली प्रतिबिंब, असे वर्णन केले.
ईशान्य भारत नवीन, आत्मविश्वासू भारताचा चेहरा दर्शवतो, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे. नागालँडच्या अद्वितीय सांस्कृतिक ओळखीबद्दल बोलताना, हे राज्य केवळ उत्सवाचे आयोजन करत नाही तर, ते उत्सवाचे प्रतीक आहे, उत्सवांची भूमी म्हणून त्याचा उल्लेख अभिमानाने केला जात आहे, असे निरीक्षण मोदी यांनी नोंदवले.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या X वरील पोस्टला उत्तर देताना, मोदी म्हणाले:
“या लेखात, केंद्रीय मंत्री @JM_Scindia यांनी नागालँडच्या हॉर्नबिल महोत्सवाचे वर्णन, चैतन्याचा ‘कॅलिडोस्कोप’ व प्राचीन तसेच समकालीन संस्कृतीचा उत्कृष्ट संगम, अशा शब्दात केले आहे. जेव्हा ईशान्येकडील भागाची चमकदार प्रगती होईल, तेव्हाच आपला देश उदयास येईल, याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.
नवीन, आत्मविश्वासू भारताचा चेहरा, असा ईशान्येकडील भागाचा उल्लेख करताना, सिंधिया नमूद करतात, की नागालँड केवळ उत्सव साजरा करत नाही, तर ते उत्सवाचे प्रतीक आहे; यामुळे त्याला उत्सवांची भूमी असे का म्हटले जाते, हे खरोखरच सिध्द होते.”
***
शिल्पा पोफळे/पर्णिका हेदवकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2203681)
आगंतुक पटल : 40
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam