पंतप्रधान कार्यालय
युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दीपावलीचा समावेश झाल्याचे पंतप्रधानांकडून स्वागत
दीपावलीचे आपल्या संस्कृती आणि परंपरेशी खूप जवळचे नाते आहे,ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे तसेच प्रकाश आणि धार्मिकतेचे प्रतीक आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2025 12:20PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दीपावलीचा समावेश झाल्याबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त केला.
युनेस्कोच्या एक्स मंचावरील पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणाले:
"भारतातील आणि जगभरातील लोकांचा उत्साह यामुळे द्विगुणित झाला आहे.
दीपावलीचे आमच्या संस्कृती आणि परंपरेशी खूप जवळचे नाते आहे. ती आमच्या संस्कृतीचा आत्मा आहे. प्रकाश आणि धार्मिकतेचे प्रतीक आहे. युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दीपावलीचा समावेश झाल्यामुळे या उत्सवाची लोकप्रियता जगभरात आणखी वाढेल.
प्रभु श्री रामांचे आदर्श आपल्याला अनंतकाळ मार्गदर्शन करत राहतील.
@UNESCO”
***
NehaKulkarni/SampadaPatgaonkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2202115)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam