पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी तमिळ संगमम साठी दिल्या हार्दिक शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
02 DEC 2025 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पासून सुरु झालेल्या काशी तमिळ संगमम साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हा चैतन्यदायी कार्यक्रम 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेला अधिक दृढ करतो. संगमम मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला काशी मध्ये प्रसन्न आणि संस्मरणीय वास्तव्याचा लाभ होवो, अशा मी शुभेच्छा देतो.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे :
'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेला अधिक दृढ करणाऱ्या आजपासून सुरु झालेल्या काशी संगमम या चैतन्यदायी कार्यक्रमासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. काशी मध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे वास्तव्य प्रसन्न आणि संस्मरणीय होवो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा !"
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2197923)
आगंतुक पटल : 3