पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या जनतेला दिल्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
01 DEC 2025 4:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागालँडच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नागा संस्कृतीत सेवा, शौर्य आणि करुणाभावनेची मूळे घट्टपणे रुजलेली असून, ही बाब अनुकरणीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नागालँडच्या जनतेने अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. येत्या काळात हे राज्य समृद्धी आणि प्रगतीसह वाटचाल करत राहो अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश
नागालँडच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. नागा संस्कृतीत सेवा, शौर्य आणि करुणाभावनेची मूळे घट्टपणे रुजलेली असून, ही बाब अनुकरणीय आहे. नागालँडच्या जनतेने अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. येत्या काळात हे राज्य समृद्धी आणि प्रगतीसह वाटचाल करत राहो.
सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2196983)
आगंतुक पटल : 51
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam