पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले
Posted On:
24 NOV 2025 3:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र जी यांचे निधन झाल्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे अशा शब्दात भावना व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धर्मेंद्रजींच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान म्हणाले की धर्मेंद्र जी हे चित्रपट क्षेत्रातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला आकर्षकता आणि खोली मिळवून देणारे अत्युत्कृष्ट अभिनेते होते. वेगवेगळ्या भूमिका समर्थपणे साकारण्याची त्यांची क्षमता अनेक पिढ्यांमधील असंख्य चित्रपट रसिकांच्या मनात घर करून गेली.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“धर्मेंद्र जी यांचे निधन म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत आहे. ते चित्रपट क्षेत्रातील अत्यंत सुप्रसिध्द व्यक्तिमत्त्व होते आणि साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला आकर्षकता आणि खोली मिळवून देणारे अत्युत्कृष्ट अभिनेते होते. ज्या पद्धतीने त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या त्या असंख्य लोकांच्या मनाला भिडणाऱ्या होत्या. धर्मेंद्रजी त्यांचा साधेपणा, नम्रता आणि सौहार्द यासाठी देखील प्रसिध्द होते. या दुःखाच्या घडीला, माझ्या संवेदना त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार आणि असंख्य चाहते यांच्या सोबत आहेत. ओम शांती.”
* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2193563)
Visitor Counter : 27