पंतप्रधान कार्यालय
कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती परिषद 2025 मध्ये पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद
Posted On:
20 NOV 2025 11:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2025
शेतकरी – वणक्कम!
पंतप्रधान – नमस्कार! तुम्ही सगळे नैसर्गिक शेती करता का?
शेतकरी – हो साहेब.
शेतकरी – हे उन्हात सुकवलेलं केळं आहे.
पंतप्रधान – केळ्यांचं पीक आल्यानंतर केलेलं...
शेतकरी – हो साहेब.
पंतप्रधान – आणि यातून वाया जाणाऱ्या गोष्टींचं तुम्ही काय करता?
शेतकरी – ही सगळी उत्पादनं वाया जाणाऱ्या गोष्टींपासून बनवली आहेत साहेब. केळ्यांच्या शेतीमधील टाकाऊ गोष्टींपासून तयार केलेली ही उत्पादनं केळीच्या पिकाचं मूल्यवर्धन करणारी आहेत साहेब.
पंतप्रधान – तुमची ही उत्पादनं भारतभर ऑनलाइन पद्धतीनं विकली जातात?
शेतकरी – हो साहेब.
शेतकरी – खरंतर, आम्ही इथं संपूर्ण तमिळनाडू राज्याचं प्रतिनिधित्व करायला आलो आहोत. सगळ्या शेतमाल उत्पादक कंपन्या आणि शेतकरी स्वतःदेखील इथं आले आहेत साहेब.
पंतप्रधान – बरं, बरं.
शेतकरी – ऑनलाईन विक्री, निर्यात या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. भारतातल्या स्थानिक बाजारपेठांमध्ये तसंच सुपर मार्केटमध्येही आम्ही या उत्पादनांची विक्री करतो.
पंतप्रधान – एफपीओ मध्ये एकूण किती लोक काम करतात?
शेतकरी – एक हजार
पंतप्रधान – एक हजार?
शेतकरी – होय साहेब.
पंतप्रधान – अच्छा. मग तुम्ही सगळीकडे फक्त केळ्यांची बाग लावता की मिश्र पिकं घेता?
शेतकरी – वेगवेगळ्या भागातली पिकं वेगवेगळी आहेत. आता आम्ही जीआय पीकंसुद्धा घेतो साहेब.
पंतप्रधान – अच्छा! म्हणजे तुम्ही इतरही पीकं घेता तर!
शेतकरी – आम्ही चार प्रकारच्या चहाची शेती करतो. प्रत्येकाला काळा चहा माहिती आहे आणि हा चहा यापासून बनवला आहे. आम्ही याला पांढरा चहा म्हणतो हा ओलाँग आहे. हा 40 टक्के आंबवलेला चहा आहे, ओलाँग चहा आणि हिरवा चहा.
पंतप्रधान – सध्या बाजारात पांढऱ्या चहाला खूप मागणी आहे.
शेतकरी – खरं आहे साहेब.
शेतकरी – वांगीपण नैसर्गिक शेतीतली आहेत.
पंतप्रधान – या हंगामात आंबे मिळतात का?
शेतकरी - हो मिळतात. आंबे मिळतात साहेब!
शेतकरी – बिन मोसमी आंबे...
पंतप्रधान – मग आत्ता या दिवसात त्यांना चांगली मागणी असते?
शेतकरी – शेवगा
पंतप्रधान – शेवगा!
शेतकरी – हो साहेब.
पंतप्रधान – तुम्ही शेवग्याच्या पानांचं काय करता?
शेतकरी – आम्ही शेवग्याच्या पानांची भुकटी करुन त्याची निर्यात करतो साहेब.
पंतप्रधान – या भुकटीला तर...
शेतकरी – खूप मागणी आहे.
पंतप्रधान – हो खूपच जास्त मागणी आहे.
शेतकरी – होय साहेब.
पंतप्रधान – कुठल्या देशांतून जास्त मागणी आहे?
शेतकरी – अमेरिका, आफ्रिकेतले देश आणि जपानमध्ये जास्त मागणी आहे. आग्नेय आशियातूनही बरीच मागणी आहे.
शेतकरी – खरं म्हणजे ही सगळी जीआय उत्पादनं आहेत. आम्ही इथं तमिळनाडूमधली 25 जीआय उत्पादनं ठेवली आहेत. कुंभकोणम विड्याचे पान, मदुराई मोगरा आणि हे पण मदुराईचं आहे साहेब. आणि इथली सगळी उत्पादनं...
पंतप्रधान – यांची विक्री कुठे होते?
शेतकरी – संपूर्ण भारतात विकली जातात साहेब. तमिळनाडूत यांचा वापर प्रत्येक सण समारंभात केला जातो...
पंतप्रधान – आमच्या काशीमधले लोक हे घेतात की नाही? ते तुम्हाला बनारसी पान देतात का?
शेतकरी – हो साहेब
शेतकरी – हे पळणी मुरुगा आहे...
शेतकरी – साहेब आमच्याकडे शंभरपेक्षा जास्त उत्पादनं आहेत. मधापासून ते ...
पंतप्रधान – आणि त्यांची बाजारपेठ?
शेतकरी – खूप मोठी आहे साहेब. मागणी खूपच जास्त आहे. आमच्या मधाला जगभरातून मागणी आहे.
शेतकरी – आमच्याकडे केवळ भातपिकाचेच हजारपेक्षा जास्त पारंपरिक प्रकार आहेत...किमतीच्या बाबतीत सांगायचं तर भरडधान्याइतकेच आहेत साहेब.
पंतप्रधान – भातपिकाच्या बाबतीत तमिळनाडूनं जे यश मिळवलं...
शेतकरी – हो साहेब
पंतप्रधान – जगाला अजूनही त्यामध्ये तमिळनाडूची बरोबरी करता आलेली नाही!
शेतकरी – ते खरंच आहे साहेब.
पंतप्रधान – हो तर.
शेतकरी – आम्ही भाताची, तांदळाची आणि त्यापासून बनवलेल्या इतर मूल्यवर्धित उत्पादनांची निर्यात करतो साहेब. ही सगळी उत्पादनं या प्रदर्शनात मांडली आहेत.
पंतप्रधान – शेतकऱ्यांची नवी पिढी याचं प्रशिक्षण घेतेय का?
शेतकरी – हो साहेब. आता शेतीचं शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
पंतप्रधान – त्यांनी शंका विचारल्या पाहिजेत. आधी कदाचित त्यांना समजणार नाही. पीएचडी मिळवलेली व्यक्ती हे काम करतेय! जेव्हा ते याचे फायदे लक्षात घेतात, तेव्हा तुम्ही त्यांना काय समजावून सांगता?
शेतकरी – सुरुवातीला लोक त्यांना मूर्ख समजत होते. पण आता ते महिन्याला 2 लाख रुपये कमवत आहेत. त्यांची कमाई जिल्हाधिकाऱ्यापेक्षाही जास्त आहे साहेब. आता लोक त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला लागलेत साहेब.
पंतप्रधान – म्हणजे आता सगळे जिल्हाधिकारी शेतीकडे वळतील…
शेतकरी – आम्ही आमच्या शेतांमध्ये 7000 शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं आहे. नैसर्गिक शेती योजनेअंतर्गत (टीएनएयू) मान्यता मिळालेलं हे शेतीचं आदर्श उदाहरण आहे. 3000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही आम्ही प्रशिक्षण दिलं आहे.
पंतप्रधान – तुमच्या मालाला बाजारपेठ मिळते का?
शेतकरी – आम्ही आमच्या मालाची थेट विक्री करतो आणि इतर देशांत निर्यात करतो. आम्ही मूल्यवर्धित उत्पादनंही तयार करतो खाद्य तेल, केसांचे तेल, खोबरं, साबण.
पंतप्रधान – तुम्ही बनवलेल्या केसांच्या तेलाची खरेदी कोण करतं?
पंतप्रधान – मी जेव्हा गुजरातमध्ये होतो, तेव्हा मी पशु वसतीगृहाची संकल्पना सुरू केली होती.
शेतकरी – हो.
पंतप्रधान – एका गावातलं सगळं पशुधन गावातल्या पशु वसतीगृहात ठेवलं जायचं.
शेतकरी – हो.
पंतप्रधान – त्यानंतर गाव एकदम स्वच्छ राहायचं आणि केवळ एक डॉक्टर आणि चार पाच लोक त्याची देखभाल करायचे. या पशु वसतीगृहाची व्यवस्था खूप छान ठेवली जायची.
शेतकरी – हे सगळं आम्ही मोठ्या प्रमाणात तयार करतो आणि जवळपासच्या शेतकऱ्यांना देतो.
पंतप्रधान – तुम्ही शेतकऱ्यांना देता. हे चांगले आहे.
* * *
शैलेश पाटील/सुरेखा जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2192432)
Visitor Counter : 7
Read this release in:
हिन्दी
,
English
,
Urdu
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam