पंतप्रधान कार्यालय
आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत
पंतप्रधानांनी प्रशांती नीलायम येथे श्री सत्य साई बाबा यांना आदरांजली वाहिली
श्री सत्य साई केंद्रीय विश्वस्त संस्थेतर्फे आयोजित गोदान समारंभात पंतप्रधान सहभागी झाले
प्रविष्टि तिथि:
19 NOV 2025 3:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2025
साई रामचा दिव्य मंत्रोच्चार होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे पोहोचले आणि तेथील हार्दिक स्वागताचा त्यांनी स्वीकार केला.
पंतप्रधानांनी प्रशांती नीलायम येथील साई कुलवंत सभागृहात श्री सत्य साई बाबा यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर ते दर्शनासाठी ओमकार सभागृहाकडे रवाना झाले. याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की अशा पवित्र स्थळांना दिलेली भेट ही श्री सत्य साई बाबा यांच्या अमर्याद करुणेचे आणि मानवतेचे उत्थान करण्याप्रती त्यांच्या आयुष्यभराच्या बांधिलकीचे स्मरण करून देणारी आहे. श्री सत्य साई बाबा यांचा निःस्वार्थी सेवेचा संदेश लाखो लोकांना मार्गदर्शन करत आणि प्रेरित करत आहे, असे ते पुढे म्हणाले.
श्री सत्य साई केंद्रीय विश्वस्त संस्थेतर्फे आयोजित गोदान समारंभात देखील पंतप्रधानांनी भाग घेतला. या संस्थेने पशुकल्याणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करण्यासह अनेक कल्याणकारी उपक्रम देखील हाती घेतले आहेत. या समारंभाचा भाग म्हणून शेतकऱ्यांना गीर गायींसह इतर गायींचे दान देण्यात येत आहे. याप्रसंगी पंतप्रधानांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि ते म्हणाले की, आपल्यापैकी प्रत्येकाने श्री सत्य साई बाबांच्या आदर्शांना अनुसरत समाजाच्या कल्याणासाठी कार्य करत राहिले पाहिजे.
एक्स मंचावर लिहिलेल्या एका वेगळ्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“साई राम चे दिव्य पठण सुरु असताना, आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे पोहोचलो आणि स्नेहमय स्वागताचा स्वीकार केला.”
“प्रशांती नीलायम येथील साई कुलवंत सभागृहात श्री सत्य साई बाबा यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर दर्शनासाठी ओमकार सभागृहात गेलो. अशा पवित्र स्थळांना दिलेली भेट बाबांच्या अमर्याद करुणेचे आणि मानवतेचे उत्थान करण्याप्रती त्यांच्या आयुष्यभराच्या बांधिलकीचे स्मरण करून देणारी आहे. त्यांचा निःस्वार्थी सेवेचा संदेश लाखो लोकांना सदैव मार्गदर्शन करत आणि प्रेरित करत राहिला आहे.”
“श्री सत्य साई केंद्रीय विश्वस्त संस्थेतर्फे केल्या जात असलेल्या अनेक कल्याणकारी कार्यांसह, ही संस्था पशुकल्याणावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करत आहे. शेतकऱ्यांना गायी देण्यासाठी आयोजित गोदान समारंभात सहभागी झालो. खालील छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या गायी गीर गायी आहेत! श्री सत्य साई बाबा यांनी दाखवल्याप्रमाणे आपण सर्वजण आपल्या समाजाच्या कल्याणासाठी कार्य करत राहूया.”
* * *
गोपाळ चिप्पलकट्टी/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2191652)
आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam