पंतप्रधान कार्यालय
गुजरातमधील सूरत येथे भारताच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसोबत पंतप्रधानांनी साधलेला संवाद
Posted On:
16 NOV 2025 3:27PM by PIB Mumbai
बुलेट ट्रेन कर्मचारी: “बुलेट ट्रेन ही आपली ओळख आहे. मोदीजी, ही उपलब्धी तुमची आणि आमची आहे.”
पंतप्रधान: “तुम्हाला काय वाटतं? कामाची गती योग्य आहे का? तुम्ही ठरवलेल्या वेळापत्रकानुसार काम सुरू आहे का की काही अडचणी येत आहेत?”
बुलेट ट्रेन कर्मचारी: “नाही सर , कोणतीही अडचण नाही.”
पंतप्रधान: “तुम्ही काय सांगाल ?”
बुलेट ट्रेन कर्मचारी: “मी केरळची आहे. मी इथे सेक्शन-2 मध्ये, नवसारी येथे नॉइज बॅरियर युनिटमध्ये काम करते.”
पंतप्रधान: “आपण पहिल्यांदा गुजरातमध्ये आलात का?”
बुलेट ट्रेन कर्मचारी: “हो. मी इथे सेक्शन-2 मध्ये नॉइज बॅरियर फॅक्टरीतील रोबोटिक युनिटमध्ये काम पाहते. तिथे नॉइज बॅरियरचे जे रिबार्केज आहे त्याचे वेल्डिंग आम्ही रोबोटच्या सहाय्याने करतो.”
पंतप्रधान: “आपल्याला काय वाटते—भारतामध्ये पहिली बुलेट ट्रेन तयार करण्याचा भाग बनणे… याबाबत तुमच्या मनात काय विचार येतात ? तुम्ही आपल्या कुटुंबाला काय सांगता?”
बुलेट ट्रेन कर्मचारी: “मला वाटते की हा एक स्वप्नवत अनुभव आहे. मी करत असलेले काम भविष्यात खूप महत्त्वाचे ठरणार आहे. माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.”
पंतप्रधान: “बघा....जोपर्यंत मनात ही भावना तयार होत नाही की मी माझ्या देशासाठी काम करतो आहे, आणि देशाला काहीतरी नवं देत आहे, तोपर्यंत कामाला खरी ऊर्जा मिळत नाही.
ज्याने पहिला अवकाश उपग्रह सोडला असेल, त्यालाही अशीच भावना आली असेल… आणि आज शेकडो उपग्रह अवकाशात जात आहेत.”
बुलेट ट्रेन कर्मचारी : नमस्कार सर, माझे नाव श्रुती आहे. मी बंगळुरूची आहे आणि मी मुख्य अभियांत्रिकी व्यवस्थापक आहे. मी, आरेखन आणि अभियांत्रिकी नियंत्रण देखरेख करते. आपण म्हणालात, त्याप्रमाणे प्राथमिक योजना आणि अंमलबजावणी सर्वप्रथम केली जाते. त्यानंतर जसजसे अंमलबजावणीला सुरुवात होते तेव्हा प्रत्येक टप्प्यावर आम्ही त्याचे फायदे तोटे तपासतो, आणि जर आपल्याकडून ते होत नसेल तर ते का होऊ शकत नाही? त्यावर आम्ही उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतरही झाले नाही तर त्यासाठी कोणता पर्यायी उपाय आहे का ते आम्ही पाहातो, तो करून आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जातो.
पंतप्रधान : तुमचा हा अनुभव जर ध्वनिमुद्रित करण्यात आले तर ते एका ब्लू बुकप्रमाणे तयार होईल, त्यामुळे देशात आपण मोठ्या स्तरावर बुलेट ट्रेनच्या दिशेने वाटचाल करू शकतो. प्रत्येकाने नवीन प्रयोग करावे असे आता आम्हाला वाटत नाही. इथून जे काही शिकता आले, त्याचीच प्रतिकृती व्हायला पाहिजे. मात्र, असे का करायचे आहे याचे ज्ञान मिळवले असेल तर ती प्रतिकृती तेव्हाच निर्माण होऊ शकते. अन्यथा काय होईल के तसेच करून टाकतील. अशा प्रकारचे काही ध्वनिमुद्रित नोंद आपण तयार करून ठेवली तर भविष्यात विद्यार्थ्यांसाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. आयुष्य इथेच खर्ची घालतील, देशासाठी काहीतरी करून जातील.
बुलेट ट्रेन कर्मचारी: मला काही प्रसिद्धी नको, बक्षीस नको, प्रसिद्धी नको. केवळ देशाची प्रगती व्हावी, हीच माझी इच्छा आहे.
पंतप्रधान : वा!
बुलेट ट्रेन कर्मचारी: मोदीजी, आपली सर्व स्वप्ने साकार होवो, आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरो, देशाचे नाव उंचावत राहो, वारंवार होवो. बुलेट ट्रेन आहे आमची ओळख, बुलेट ट्रेन आहे आमची ओळख, ही मोदीजी आपली आणि आमची उपलब्धी आहे.
***
सुषमा काणे/गजेंद्र देवडा/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2190529)
Visitor Counter : 16