पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली
Posted On:
11 NOV 2025 8:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिंपू येथे भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यांनी परस्पर हिताच्या क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. दिल्ली दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल भूतानच्या राजांनी शोक व्यक्त केला.
दोन्ही देशांमधील मैत्री आणि सहकार्याच्या दृढ संबंधांना आकार देण्यासाठी ड्रुक ग्यालपो (राजे) यांनी मांडलेल्या मार्गदर्शक दृष्टीकोनाबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. भूतानच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी भारत सरकारने दिलेल्या अमूल्य सहकार्याची राजांनी प्रशंसा केली.
दोन्ही नेत्यांनी भारतातून आणलेल्या भगवान बुद्धांच्या पवित्र पिपरहवा अवशेषांसमोर प्रार्थना केली. सध्या हे अवशेष ताशिछोदझोंग येथील ग्रँड कुएनरे हॉलमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. थिंपू येथे, पवित्र पिपरहवा अवशेषांचे प्रदर्शन आणि भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त भूतानने जागतिक शांतता आणि आनंदासाठी आयोजित केलेला जागतिक शांतता प्रार्थना महोत्सव, या दोन्ही गोष्टी जुळून आल्या आहेत.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि भूतान यांच्यातील गतिशील आणि परस्पर फायदेशीर ऊर्जा भागीदारीतील महत्वाचा टप्पा असलेल्या 1020 मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांगचू-II जलविद्युत प्रकल्पाचे संयुक्तपणे उद्घाटन केले. या प्रकल्पामुळे दोन्ही देशांच्या जनतेला मोठा लाभ मिळणार आहे.
यावेळी द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जा, मानसिक आरोग्य सेवा आणि आरोग्य सेवा या क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवरही स्वाक्षरी झाली. या प्रसंगी, भारत सरकारने भूतानच्या ऊर्जा प्रकल्पांच्या वित्तपोषणासाठी 4,000 कोटी रुपयांची सवलतीची कर्ज सुविधा देण्याची घोषणा केली.
सामंजस्य करार आणि घोषणांची यादी येथे पाहता येईल.(लिंक)
* * *
सोनाली काकडे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2188990)
Visitor Counter : 11
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam