पंतप्रधान कार्यालय
भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित समारंभात केलेल्या भाषणाची क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक
Posted On:
11 NOV 2025 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त थिंपू इथे आयोजित समारंभात केलेल्या भाषणाची काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत.
पंतप्रधानांनी एक्स माध्यमावरील संदेशात म्हटले आहे,
“काल संध्याकाळी दिल्लीत झालेल्या भयंकर स्फोटामुळे सगळ्यांनाच खूप दुःख झाले आहे. या स्फोटात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात पूर्ण देश सहभागी आहे.
तपास यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करतील असा विश्वास मी प्रत्येकाला देतो. या प्रकरणी दोषी असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही, प्रत्येकाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.”
"कल शाम दिल्ली में हुई भयावह घटना ने सभी के मन को व्यथित किया है। मैं पीड़ित परिवारों का दुख समझता हूं। पूरा देश उनके साथ खड़ा है।
मैं हर किसी को आश्वस्त करता हूं कि हमारी जांच एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएंगी। जो भी लोग इसके लिए जिम्मेदार हैं, उन्हें किसी भी कीमत पर नहीं बख्शा जाएगा।"
“भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या समारंभात भूतानच्या नागरिकांनी अनोख्या प्रार्थनेद्वारे आपण भारतासोबत असल्याचे दाखवून दिले. दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यक्त केलेल्या या भावना माझ्या सदैव स्मरणात राहतील.”
“भूतानमध्ये महामहिम चौथे राजे यांना जनतेकडून एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून गौरवले जाते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भूतानने प्रगतीच्या नव्या उंची गाठल्या आहेत.”
“भारत आणि भूतान यांच्यातील नाते अतिशय दृढ आणि ऐतिहासिक आहे, जे दोन्ही देशांतील विविध सहकार्याच्या क्षेत्रांत स्पष्टपणे दिसून येते.”
“ऊर्जा आणि कनेक्टिव्हीटी ही दोन अशी क्षेत्रे आहेत ज्यात भारत-भूतान सहकार्य अधिकाधिक दृढ होत आहे.”
* * *
सोनाली काकडे/सुरेखा जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2188972)
Visitor Counter : 11
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam