पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या हस्ते 8 नोव्हेंबर रोजी “कायदेविषयक मदत वितरण प्रणालींचे मजबुतीकरण” या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेचे होणार उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
06 NOV 2025 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता सर्वोच्च न्यायालय येथे आयोजित “कायदेशीर मदत वितरण प्रणालींचे मजबुतीकरण” या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने (एनएएलएसए) तयार केलेल्या कम्युनिटी मेडीएशन ट्रेनिंग मोड्यूलच्या कार्याची सुरुवात करतील. याप्रसंगी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील.
एनएएलएसए ने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय परिषदेमध्ये कायदेविषयक मदत बचाव सल्लागार प्रणाली, पॅनेल वकील, निम-कायदेशीर स्वयंसेवक, स्थायी लोक अदालती तसेच कायदेविषयक सेवा देणाऱ्या संस्थांच्या वित्तीय व्यवस्थापनासारख्या कायदेविषयक सेवा चौकटीच्या महत्त्वाच्या पैलूंबाबत विचारविनिमय होईल.
* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2187075)
आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Malayalam
,
Assamese
,
Kannada
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu