पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडानच्या 8 व्या वर्धापनदिनाचे साधले औचित्य
प्रविष्टि तिथि:
21 OCT 2024 12:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2024
भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या उडान (उडे देश के आम नागरिक) योजनेच्या 8 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे प्रमुख परिणाम देखील अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"आज आपण #8YearsOfUDAN साजरा करत आहोत, हा एक असा उपक्रम आहे, ज्याने भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणले आहे. विमानतळांची संख्या वाढण्यापासून ते अधिक हवाई मार्गांपर्यंत या योजनेने कोट्यवधी लोकांना विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याच वेळी व्यापार आणि वाणिज्य वाढवण्यावर तसेच प्रादेशिक विकासाला चालना देण्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. आगामी काळात आपण हवाई वाहतूक क्षेत्राला बळकटी देत राहू आणि नागरिकांसाठी आणखी चांगला संचारसंपर्क आणि आरामदायी सुविधांवर लक्ष केंद्रित करू.”
* * *
नेहा कुलकर्णी/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2184544)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Bengali
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam