मंत्रिमंडळ
azadi ka amrit mahotsav

अयोध्या धाम येथे श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेबाबत मंत्रिमंडळाचा प्रस्ताव

प्रविष्टि तिथि: 24 JAN 2024 9:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जानेवारी 2024

 

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज अयोध्या धाम येथील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेबाबतचा ठराव मंजूर केला.

या ठरावाचा मजकूर पुढे दिला आहे:

माननीय पंतप्रधान, सर्वप्रथम, आम्ही, तुमच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचे सदस्य, राम लल्लाच्या मूर्तीची 'प्राणप्रतिष्ठा' करण्याबाबत तुमचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.

गेल्या पाच शतकांपासून भारतीय संस्कृतीने शतकानुशतके जपलेले प्रिय स्वप्न तुम्ही पूर्ण केले आहे.

पंतप्रधानजी, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनन्यसाधारण  महत्त्व आहे. 

यापूर्वी अनेक वेळा खरोखरच ऐतिहासिक निर्णय घेतले गेले आहेत. परंतु जेव्हापासून मंत्रिमंडळ व्यवस्था अस्तित्वात आली आणि आपण अगदी ब्रिटिश काळातील व्हाइसरॉयच्या कार्यकारी  मंडळाच्या वेळचा कालावधी गृहित धरला तरी, असा प्रसंग कधीही उद्भवला नाही.

याचे कारण 22 जानेवारी 2024 रोजी आपण  जे साध्य केले ते इतिहासात अद्वितीय आहे.

शतकानुशतकांनंतर असा क्षण आला आहे, म्हणून आपण याला अद्वितीय म्हणत आहोत. आहे. कारण आपण असे म्हणू शकतो की या राष्ट्राचा देह 1947 मध्ये स्वतंत्र झाला आणि आता त्याच्या आत्म्याचे पावित्र्य वाढले  आहे. यामुळे सर्वांना नितांत आध्यात्मिक आनंद मिळाला आहे.

आपल्या भाषणात आपण म्हणाला होतात की, भगवान राम भारताचे प्रभावही आहेत आणि ते (भक्तिमय) प्रवाहही आहेत तसेच ते धोरण आणि भाग्य दोन्ही आहेत.

आज, आपण राजकीय दृष्टिकोनातून नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून असे म्हणू शकतो की भारताच्या शाश्वत भक्तिमय प्रवाहाचा आणि विश्वावर प्रभाव टाकणारा आधारस्तंभ असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांच्या  प्राणप्रतिष्ठेसाठी नियतीनेच तुमची निवड केली आहे. 

खरोखरच, भगवान श्रीराम हे भारताचे भाग्यविधाते आहेत आणि आता भारताला हे भाग्य लाभले आहे.

प्रत्यक्ष, मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी देखील हा प्रसंग आयुष्यात एकदाच येणारा म्हणता येणार नाही, तर तो अनेक जन्मांतून एकदाच येणारा म्हणता येईल.

आपणा सर्वांचे भाग्य असे की या क्षणी आपण सर्वजण देशाच्या सर्वोच्च समितीत, मंत्रिमंडळात उपस्थित आहोत.

पंतप्रधानजी, तुम्ही या तुमच्या कृतीने या राष्ट्राचे मनोबल उंचावले आहे आणि त्याचा सांस्कृतिक आत्मविश्वास बळकट केला आहे.

या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासमयी देशभरातील लोकांत पसरलेली भावनिक लाट आम्ही यापूर्वी कधीही पाहिली नव्हती.

तथापि, आणीबाणीच्या काळात आपण लोकांमधील एकता ही एक जनआंदोलन म्हणून पाहिली होती, परंतु ती एकता हुकूमशाहीविरुद्धच्या प्रतिकार करण्याच्या चळवळीच्या रूपात निर्माण झाली होती.

आपण भगवान रामांसाठी पाहिलेला जनसागर  हा एका नव्या  युगाचा आरंभ झालेला दर्शवितो.

या देशातील लोक याची शतकानुशतके वाट पाहत होते आणि आज, भव्य राम मंदिरात भगवान रामाची प्राणप्रतिष्ठा केल्याने एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे. ही एक नवीन कथा मांडणारे जनआंदोलन देखील बनले आहे.

माननीय पंतप्रधान, जेव्हा विधी करणाऱ्याला परमेश्वराचा आशीर्वाद असतो,तेव्हाच इतका महान विधी साध्य होऊ शकतो.

गोस्वामी तुलसीदासजींनी लिहिल्याप्रमाणे: 'ज्याला श्रीरामांचा आशीर्वाद मिळतो, त्याच्यावर सर्वजण आशीर्वादाचा वर्षाव करतात.' म्हणजेच, ज्याला श्रीरामांचा आशीर्वाद मिळतो,त्याला सर्वांचे आशीर्वाद मिळतात.

पंतप्रधानजी, श्री राम जन्मभूमी आंदोलन हे स्वतंत्र भारतातील एकमेव असे आंदोलन होते ज्यामध्ये देशभरातील लोकांची एकजूट झाली होती. हे लोक आपल्यासोबत कोट्यवधी भारतीयांच्या दशकांपासूनच्या प्रतिक्षेला आणि भावनांना घेऊन आले होते.

तुम्ही 11 दिवसांचा धार्मिक विधी साजरा केला आणि भारतातील भगवान श्री राम यांच्याशी संबंधित पवित्र स्थळांवर भक्ती आणि तपश्चर्येसह राष्ट्रीय एकतेच्या भावनेत नवीन ऊर्जा आली. म्हणूनच, आम्ही केवळ मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणूनच नव्हे तर सामान्य नागरिक म्हणूनही तुमचे अभिनंदन करतो.

माननीय पंतप्रधान, जनतेकडून मिळालेल्या अपार प्रेमाचा आणि आपुलकीचा विचार करता, तुम्ही खरोखरच जनतेचे नेते आहात. पण या नवीन युगाच्या सुरुवातीनंतर, तुम्ही एका नवीन युगाचे अग्रदूत म्हणूनही उदयास आला आहात.

तुम्हाला आमचे अगणित वेळा अभिवादन आणि तुमच्या नेतृत्वाअंतर्गत  आपण आगेकूच करावी, आपल्या देशाने आगेकूच करावी  आणि भारत उंच भरारी घेवो या आमच्या शुभेच्छा.

हे मंदिर हजारो वर्षे अभंग राहील असे बांधले गेले आहे आणि तुम्ही तुमच्या भाषणात म्हटल्याप्रमाणे: “22 जानेवारीचा सूर्य एका दिव्य तेज पसरवत  उगवला आहे. ही केवळ दिनदर्शिकेवर लिहिलेली तारीख नाही, तर एका नवीन युगाची सुरुवात आहे. गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त झालेले, भूतकाळातील प्रत्येक जखमेतून धैर्य मिळवणारे राष्ट्र आता एक नवीन इतिहास घडवत आहे. आजपासून एक हजार वर्षांनंतरही, लोक ही तारीख लक्षात ठेवतील आणि त्यावर चर्चा करतील, हाच तो  क्षण आहे जो आम्हाला आमच्या  नजरेसमोर घडताना दिसत  आहे. हा सामान्य काळ नाही. हे कालचक्रावर पुसून न टाकता येणाऱ्या शाईने अनंत काळासाठी कोरले गेले आहे.

आणि म्हणूनच, आजच्या मंत्रिमंडळाला सहस्रकाचे मंत्रिमंडळ म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही.

यासाठी आम्ही सर्व तुमचे अभिनंदन करतो आणि एकमेकांना शुभेच्छा देतो.

 

* * *

आशिष सांगळे/संपदा पटगावकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2183077) आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam