पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस स्मृतीदिनानिमित्त शूर पोलीस कर्मचाऱ्यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
21 OCT 2025 11:10AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस स्मृतीदिनानिमित्त देशाच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे धाडस आणि बलिदान यांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. राष्ट्र आणि नागरिकांच्या रक्षणाप्रती त्यांच्या अढळ निष्ठेची नोंद पंतप्रधानांनी घेतली.
एक्स या समाजमाध्यमांवरून दिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले-
"पोलीस स्मृतीदिनानिमित्त, आम्ही आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्याला सलाम करतो आणि कर्तव्य बजावताना त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करतो. त्यांची दृढ निष्ठा आपले राष्ट्र आणि लोक सुरक्षित ठेवते. संकटकाळात आणि गरजेच्या वेळी त्यांचे शौर्य आणि वचनबद्धता कौतुकास्पद आहे."
निलीमा चितळे/विजयालक्ष्मी साळवी-साने/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2181100)
आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam