पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली


पंतप्रधानांनी इजिप्तच्या राष्ट्रपती सिसी यांचे गाझा शांतता करारातील महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल अभिनंदन केले

परराष्ट्र मंत्री अब्देलअती यांनी पंतप्रधानांना त्यांच्या भेटीदरम्यान होणाऱ्या पहिल्या भारत–इजिप्त धोरणात्मक संवादाची माहिती दिली

द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांत साध्य होत असलेल्या प्रगतीबद्दल पंतप्रधानांकडून समाधान व्यक्त

प्रविष्टि तिथि: 17 OCT 2025 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर  2025

इजिप्तचे परराष्ट्र मंत्री डॉ. बदर अब्देलअती यांनी आज पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी गाझा शांतता करारात इजिप्तच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल राष्ट्रपती अब्दुल फत्तेह अल सिसी यांचे अभिनंदन केले. हा करार प्रदेशात कायमची शांतता प्रस्थापित करण्यास मदत करेल,अशी आशा व्यक्त केली. परराष्ट्रमंत्री अब्देलअती यांनी पंतप्रधानांना त्यांच्या भारत भेटीदरम्यान आयोजित होणाऱ्या पहिल्या भारत–इजिप्त धोरणात्मक संवादाची माहिती दिली.

पंतप्रधानांनी व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण आणि लोकसंबंध आदी  द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांत  होत असलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

शैलेश पाटील/राज दळेकर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2180474) आगंतुक पटल : 48
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam